मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय २८ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय २८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मत्सरासुरचेष्टितकथनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । देव कश्यपादींसी शरण जाती । दैत्यांसी करणी त्यास सांगती। विहवल भयभीत होते चित्तीं । प्रार्थना करिती नम्रपणें ॥१॥दुष्टें मत्सरें जिंकिले देव । अपवाद नसे त्या वासव । इंद्रा पकडुनी नेता कीव । आमुची कोण करणार? ॥२॥कश्यपा तूं आमुचा पिता । मुनिशार्दूला राखी आतां । भयविहवलां जीवनाश दुःखितां । सोडवी मत्सरापासून आम्हां ॥३॥देवांचे वचन ऐकून । वसिष्ठादी मुनींसह गमन । केलें ब्रह्मलोकीं तत्क्षण । कश्यपें शवृद्धीसाठीं ॥४॥सत्यलोकांत जाऊन । ब्रह्मदेवांसि भेटून नमन । विविधपरींची स्तुति करुन । करांची ओंजळ जोडून म्हणे ॥५॥मत्सरानें देववर जिंकिले । इंद्रासही पकडून नेलें । देव लोकीचें राज्य घेतलें । स्वामित्व आतां त्या दैत्याचें ॥६॥त्या परमदारुणा दंडावें । देवदैत्यांचे स्वपद त्यांसी द्यावें । स्वामी जगन्नाथा ऐसें करावें । तुजविण अन्य गती नसे ॥७॥तूंच आमुचा त्राता । तूंच आमुचा रक्षणकर्ता । त्यांच्या या करुण वचनां ऐकतां । द्रवलें चित्त पितामहाचें ॥८॥प्रजानाथ बोले देवऋषींसी । ऐका असुरांच्या रहस्यासी । शिववरानें प्राप्त तयासी । अजेयत्व सर्वलोकींचें ॥९॥म्हणोनि मीं असमर्थ असत । विष्णूस शरण जाऊया त्वरित । तुम्हा सर्वां समवेत । बोलून ऐसे निघाला ॥१०॥देवमुनींसह प्रजापती । जाऊन वैकुंठलोकाप्रती । नमस्कार करुन स्तुती । करिता झाला विष्णूची ॥११॥हे पालका विष्णुदेवा । आमुचा वृत्तान्त ऐकावा । इंद्र देववर सोडवावा । मत्सरासुरें त्यांसी पकडिलें ॥१२॥युद्धांत सारे देव पराजित । महाविष्णो आपण स्वस्थचित्त । पालक सार्या जगाचे तात । रक्षण आता करावें ॥१३॥विष्णु तेव्हां उत्तर देती । ब्रह्मदेवाची ऐकून उक्ती । प्रजापते मज न शक्ती । मत्सरासुरा जिंकण्याची ॥१४॥तो दैत्यपुंगव झाला मत्त । शिवाच्य वरदानें विश्वांत । म्हणुनी शरन जाऊया त्वरित । शंकरासीच निःसंशय ॥१५॥ते सर्वांसी मान्य झालें । सारे कैलासावरी गेले । शंकरा वंदून विष्णू म्हणाले । ऐका प्रार्थना शिवशंभो ॥१६॥शूलपाणे जगन्नाथा नमन । शंभो सर्वसाक्षी तुज वंदन । भगवंता महादेवा नमन । भक्तिपूर्वक आमुचें ॥१७॥राजसरुपें तूच निर्मिसी । म्हणोनी तूं ब्रह्मा अससी । तूंच पालक विष्णुरुप होसी । रुद्रस्वरुपीं संहर्ता ॥१८॥पंचमुखा योग्या योग्यासी । निर्गुणा निरुपा ब्रह्मभूतासी । नमन आमुचें तुजसी । मत्सरासुरें केला आकान्त ॥१९॥त्यानें सुरऋषींस पीडा दिली । समस्त पृथ्वी जिंकली । इंद्रासी पकडून स्थापिली । प्रभूता आपुली स्वर्गांत ॥२०॥आम्हीं सारे भयभीत । आलों शरण तुला आर्त । देवदेवेशा संरक्षणा त्वरित । करी श्रेष्ठा देवपालका ॥२१॥विष्णूचें वचन ऐकून । शिव चिंतायुक्त उन्मन । म्हणे विष्णुमुख्यांस त्या वचन । दैत्यास त्याच मीच वर दिला ॥२२॥त्याच्या उग्र तपें संतुष्ट झालों । महादुर्लभ वर देऊन चुकलों । आतां जनार्दना कष्टी झालों । तरी अशक्य दैत्यनाश ॥२३॥विषवृक्ष जो मीच वाढविला । तो तोडणें शक्य न मजला । तेव्हा देवेशा उपाय तुजला । अन्य सुचे का विचार करी ॥२४॥शिवांचें वचन ऐकून । विष्णु परमकंपित म्हणती तत्क्षण । दुःखपूर्ण हृदयीं होऊन । शंकरा तू कर्ता अकर्ता ॥२५॥तूं ऐसे विपरीत वदसी । आम्हीं काय करावें या समयासी । आता राहूं कैलासीं । तुझ्या सन्निध महादेवा ॥२६॥आम्हीं दैत्यवश कैसे राहूं । वैकुंठादि लोकांसी कैसे जाऊं । तुझ्या सान्निध्यांतच पाहू । जीविताचा वनवास ॥२७॥वैकुंठ सत्यलोक जिंकील । मत्सर सुखें तेथ राहील । परी येथ कैलासीं न येईल । भक्तिभावामुळें तुझ्या ॥२८॥विष्णु वचन ऐसें ऐकून । शिव निश्वासयुत बैसला उन्मन । मत्सराची कृती महान । ऐक दक्षा दुर्दम्य ॥२९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुरनोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते मत्सरासुरचेष्टितं कथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP