मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय २० खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय २० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत गणेशमुद्गकसमागमः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । अंगिरसाचें वचन ऐकून । मुद्गल पुलकित होऊन । विनययुक्त विस्मितमन । रोमांचयुक्त म्हणे त्यांसी ॥१॥ब्रह्मणस्पतीचे अवतार । माहात्म्ययुक्त अति थोर । सांग तें मजसी समग्र । क्रमशः मी भोजन त्यांना ॥२॥तेणें ब्रह्मभूय सिद्धी पावेन । अंगिरा म्हणे तें ऐकून । गणेशमहात्म्याचे अनंत पावन । अवतार अगणित वर्णावया ॥३॥वर्षशतांतीही कथन । अशक्य मजसी करण्य गहन । परी संक्षेपानें मी सांगेन । मुख्य मुख्य अवतार ॥४॥त्या गणेशाचे प्रख्यात । आठ अवतार असत । ब्रह्मधारक सर्वही पुनीत । क्रमशः तुज सांगतो ॥५॥वक्रतुंड अवतार मत्सरासुरहंता । सिंहवाहन तो ब्रह्मधारक उद्धर्ता । एकदंततार मदासुराचा संहर्ता । आखुवाहन जो असे ॥६॥महोदर मोहासुराचा अरी । आखुवाहन तो करी । ज्ञानब्रह्मप्रकाशन सत्वरी । ऐसें सांगती श्रुतिस्मृती ॥७॥गजानन लोभासुराचा हर्ता । सांख्यांना सिद्धिदाता । तोही मूषकवाहन भक्ता । रक्षीतसे सर्वदा ॥८॥लंबोदर क्रोधासुरा मारी । शक्ति ब्रह्मधारक असुरारी । आखुण तोही संसारीं । ऐसे जाण तूं मुद्लमुने ॥९॥विकटनामक विख्यात । कामासुरा जो जाळित । मयूरवाहन तो असत । सौरब्रह्मधर असे ॥१०॥विघ्नराजावतार जणात । ममतासुरा तो वधित । शेषवाहन असत । विष्णु ब्रह्मवाचक ॥११॥धूमरवर्णावतारात । गणेश अभिमानासुरा भारित । तो आखुवाहन स्मृत । शिवात्मा ख्यात संसारीं ॥१२॥ऐसे हे आठ अवतार कथिले । गणेशाचे अंश जे झाले । विनायक नामें ख्यात जाहले । भजनमात्रें संतोषती ॥१३॥ते आपुलाले ब्रह्म देती । स्वानंदवासकारी ते गणेश असती । स्वानंदी योगियांसी दिसती । ब्रह्म तेचि निःसंशय ॥१४॥त्याचे आठ अवतार । असती जगतीं विघ्नहर । स्वानंद भजनानें सत्वर । लीन प्रसन्न तेथ होती ॥१५॥हे सुपुत्रका माया लीन । स्वयं तेथ होऊन । संयोगें मौनभाव पावून । जनांसि समाधी लाभते ॥१६॥गणराजाच्या भजनें विनाशत । अयोगि मायाभेद जे भासत । परब्रह्म निवृत्ती प्राप्त । ब्रह्मणस्पति तोचि गणपति ॥१७॥योगात्मक गणेशान । योगरुपा शांती पावन । शांतिभेदांचे कथन । नानाविध केलें असे ॥१८॥शांतींत योगशांती । ऐसे रहस्य सांगती । योगाहून परम ब्रह्म जगतीं । अन्य कोणतें असेना ॥१९॥ही योगाची योगता । ब्रह्मप्राप्तीची महत्ता । ऐसें हे परम गुह्य तत्त्वतां । सांगितलें तुज संक्षेपें ॥२०॥गणेशा ब्रह्मनायका सर्वभावें । म्हणूनी तूं सदा भजावें । कृतकृत्य जगीं व्हावें । परमभक्त मुद्गला ॥२१॥मी गणेश तप आचरिलें । गणेशव्रत पूर्ण केले । तेणें मज प्राप्त झालें । मनोवांछित वरदान ॥२२॥अंगिरसा तुझ्या वंशात । गणेशभक्त जन्म घेत । आपुल्या भक्तीनें प्रख्यात । विशेष जगीं ते होतील ॥२३॥त्यांतही मुद्गल अत्यंत । गाणपत्य होईल निश्चित । मुद्गलासम भक्त । गणेशाचा जगीं नसेल ॥२४॥ऐसा भक्त अद्यापि न झाला । भावि काळांतही तोड न त्याला । भक्तराज जो ऐकला । परम पावन होईल ॥२५॥मुद्गलासी प्रणाम करितां । तैसेचि त्याचा स्पर्श लाभता । संभाषण दर्शन त्याचें घडता । उद्धरतील प्राणी जगीं ॥२६॥त्याच्या शरीरावरुन । वाहेल जो जगीं पवन । त्याचा स्पर्श घडता उद्वरुन । सर्व जंतू मुक्त होतील ॥२७॥मजला ऐसा वर देऊन । गणेश पावले अंतर्धान । तोच तूं मुद्गल महान । माझ्या वंशीं भूषण ॥२८॥धन्य माझा वंश झाला । गाणपत्य तुजसम ज्यांत जन्मला । नरकांतून तरण्याला । जंतूसी जो साहाय्य करी ॥२९॥तूं साक्षात् प्रतापवंत । गाणपत्य श्रेष्ठ सर्वांत । महायोगी होशील निश्चित । ऐसा वर माझा असे ॥३०॥मुद्गलासी ऐसें सांगून । अंगिरस उपदेशिती तत्त्व महान । एकाक्षर महामंत्र देऊन । कृतकृत्य त्यासी केलें ॥३१॥बाळा आजावि जाई वनांत । जें असेल उत्तम प्रशांत । गणेशाची आराधना उदात्त । तेथ करी महाभागा ॥३२॥तुझ्या तपानें संतुष्ट होईल । गणेश तुज दर्शन देईल । तेणें धन्यता लाभेल । गणेश सायुज्य लाभेल अंतीं ॥३३॥अंगिरसां विनयें प्रणाम करुन । वनांत गेले मुद्गल महान । महा अद्भुत तप आचरुन । प्रसन्न केलें गणेशाला ॥३४॥सांगोपांग एकाक्षर विधान । एकनिष्ठेनें आचरुन । एक अब्ज सहस्त्र संवत्सर पूर्ण । मुद्गलांनीं तप केलें ॥३५॥मूषकवाहन सिद्धिबुद्धिसमन्वित । चतुर्बाहु गणेश प्रकटात । प्रमोद आमोदादि असत । सभोंवतीं तयांच्या ॥३६॥ऐसा भक्तवत्सल गजानन । नानाभूषणयुक्त महान । महोदर एकदंत त्रिनेत्रधर पावन । चार आयुधें करीं जयाच्या ॥३७॥ज्याच्या हृदयप्रदेशीं विराजत । चिंतामणि जो भक्तियुत । ऐसा गजमुख प्रसन्नचित्त । म्हणे तेव्हां मुद्गलासी ॥३८॥महाभक्ता मुद्गला त्वरित । सांग तुझ्या मनींचें ईप्सित । एकाक्षर विधानानें तृप्त । परम संतुष्ट झालों असे ॥३९॥सूत म्हणती गणेशवाचन । ऐसें ऐकून करिती नमन । भक्तिपूर्वक हात जोडून । स्तुती करिती गणेशाची ॥४०॥यथान्याय गणेशाची पूजित । हृदयीं होत आनंदित । सर्वांग होय पुलकित । आनंदाश्रू वाहती ॥४१॥गद्गद स्वरें स्तुती करीत । पुनःपुन्हा प्रणाम करीत । मनीं भक्तिभावयुक्त । अंगिरस कुलदीपक ॥४२॥मुद्गल म्हणती वंश धन्य । जन्म, विद्या, ज्ञान धन्य । तप, तीर्थ माझें धन्य । प्रभू तुझिया दर्शनें ॥४३॥आज पृथ्वी झाली धन्य । पशुपक्षी लताही धन्य । ज्यांसि लाभलें दर्शन धन्य । गजानना तुझें येथ ॥४४॥ऐसी बहुविध स्तुती करीत । सर्व सिद्धिदात्या गणेशाची अविरत । स्वात्मनिष्ठ परम भक्तियुत । महामुनी मुद्गल ॥४५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते गणेशमुद्गलसमागमो नाम विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP