मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय १४ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय १४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत गणेशप्रादुर्भावः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । शिव म्हणती पार्वती सांगेन । ऐक जें चरित्र अद्भुत महान । गणेशमाया मोहेंकरुन । मोहितांचे चरित्र हें ॥१॥शिवाचें वचन ऐकून । विष्णू ब्रह्मदेवा सांगे वचन । वर माग ऐसा जेणें करुन । शंकर होईल पुत्र तुझा ॥२॥शिव होता तुझा पुत्र । तो होईल माझा पौत्र । आपणा उभयतांचे सुपात्र । सफल होईल मनोरथ ॥३॥विष्णूचें वचन ऐकत । विधी शंकरासी म्हणत । माझा पुत्र तूं होई सुहित । हाचि वर मी मागतसें ॥४॥विष्णु ही संमती देत । तेव्हा शंकर तथास्तु म्हणत । ब्रह्मदेवा भालापासून पुनीत । रुद्ररुपें मी जन्मेन ॥५॥तुझ्या अंशापासून । ऐशा प्रकारें मी प्रकटेन । विधीमाधव संतोषून । शंकरा प्रार्थिती स्नेहानें ॥६॥भावपूर्वक त्यासी म्हणती । पाहावें आमुचें ऐश्वर्य जगतीं । निरनिराळे भावभक्ती । तेणें संतोष आम्हांसी ॥७॥तेव्हां महादेव पहात । ज्ञानचक्षूनें ऐश्वर्य अनन्त । विधिमाधवांचे त्यासी सांगत । अपार शाश्वत महिमा तुमचा ॥८॥आपण तिघे ईश्वर प्रख्यात । त्या वेळीं दिवाकर उपस्थित । तेजोराशी सदात्मा समाहित । म्हणे स्मरण कां मम केलें ॥९॥मी स्नेहपूर्वक येथ आलों । तुमच्या आदरें तोषलों । सांगावें वांछित प्रसन्न झालों । तेव्हा तीन देव त्या सांगती ॥१०॥हे प्रभो प्रसन्नभावें दाखवावें । ऐश्वर्य आपुलें अतुल आघवें । तेव्हां सूर्यदेव संतोषले । दाखविती स्वरुप तेजोमय ॥११॥चराचरमय महान । सूर्यतेजें निष्प्रभ होऊन । विधि माधव शंभू उन्मन । भांबावे दृष्टी तयांची ॥१२॥ते तिघे पाहूं न शकत । ज्ञानदृष्टीनें तें पाहत । चराचराच्या आधाराप्रत । प्रार्थिती विनमर स्नेहभावें ॥१३॥अपाररुप तुझें उज्ज्वल । परी तें पाहण्या नसे बल । सौम्य रुप तव अमल । धारण करी पूर्वीचें ॥१४॥तेव्हा सौम्य रुप धारण करित । सूर्यास ते तीन देव म्हणत । तुमचा पाहू शकलों न अन्त । आतां आमुचेंही ऐश्वर्य पहा ॥१५॥सूर्य संतुष्ट होऊन । ज्ञानदृष्टीनें तें पाहून । त्यांचें ऐश्वर्य अति महान । प्रणत होऊन म्हणाला ॥१६॥तुम्ही तिघेहि महान । तुमचें रुप अनंत पावन । अद्भूत ऐश्वर्य बलवान । पाहिलें मी प्रत्यक्ष ॥१७॥तरी आपण सर्वही भगवंत । सनातन समभावें युक्त । न्यूनाधिक कांहीं नसत । ऐसा सिद्धान्त हा माझा ॥१८॥त्याच समयीं शक्ती प्रकटात । मोहिनी परा ती विचारित । माझें स्मरण कां केलेत । सांगावें प्रसन्न मी आहे ॥१९॥तेव्हां ते चार देव सांगत । स्नेहभावें जे होते युक्त । महादेवी ऐश्वर्य अद्भुत । किती तुझें तें दाखवावें ॥२०॥आपुलें स्वरुप दाखवी शक्ती । स्थूलसूक्ष्म युक्त जें जगतीं । चराचरमय सुंदर अती । पाहून भरांती चार देवां ॥२१॥ते चारही शरण जात । शक्तीस तेव्हां ते म्हणत । तव रुप असे अनन्त । मूळ रुप धारण करी ॥२२॥आमुचेंही ऐश्वर्य पहावें । आम्ही कैसे तें जाणावें । त्यांचें भाषण ऐकून स्वभावें । ज्ञानदृष्टी लाविली ॥२३॥तेव्हां त्यांच्या रुपाचा अंत । शक्तीस जेव्हां न लाभत । त्यांच्यापुढें ती प्रणत । अंत न लागे रुपाचा ॥२४॥आपण सारे ईश्वर । पूर्णभावयुत महात्मे उदार । समान आपण न अंतर । असे आपणा पाचांत ॥२५॥आपणांहून समर्थ देव । कोण असेल याचा ठाव । न लागे निश्चित हा चित्तीं भाव । गणेशमाया प्रभावानें ॥२६॥परस्परांसी म्हणती भरांत । वेद म्हणती प्रभू एक असत । सर्वत्र तरी आपण समस्त । कोणापासून जन्मलों ॥२७॥कोण असे आमुचा प्रभू । शास्त्रसंमत जो विभू । विवाद चाले तें स्वयंभू । आद्यज्ञान विसरले ॥२८॥गणेशाचें मूळ ज्ञान विस्मृत । वरती खालीं शोध करित । तैसेचि भटकती दश दिशांत । परी कांहीं त्या न दिसे ॥२९॥तेव्हां ते पंच देव एकत्र स्थित । योगमार्गे चित्तीं ध्यात । तेव्हां अभेदस्वरुपें रमत । एकीभूत योगभावें ॥३०॥शांति तयासी होत प्राप्त । तेव्हां योग्यांचे ध्येय त्या दिसत । उत्तम रुप ज्याचें युक्त । स्वरुप गणराजाचें ॥३१॥विराजले गणेश हृदयांत । चतुर्भुज त्रिनेत्र शुंडादंडयुक्त । शूर्पकर्ण वक्रतुंड एकदन्त । महोदर रक्तवर्ण ॥३२॥महाकाय सिंदूरालिप्त । किरिटादी भूषणें शोभित । नाभिशेष सिद्धिबुद्धियुत । विभूतींनी तुला दिलेला ॥३३॥चिंतामणि पूर्ण हॄदयांत । मणी तो शुभ धारण करित । पंचदेव तें झाले विस्मित । भक्तानुग्रहा पाहून ॥३४॥प्रसन्नवदन तो आविर्भूत । शंकरांच्या हृदयीं प्रकटत । शंभू त्यासी तें विचारित । हे प्रभो कोण आपण? ॥३५॥शांतियोगें संप्राप्त । ब्रह्मपती परम तूं वाटत । सांगावें महाभागा त्वरित । स्वरुप नाम आपुलें तूं ॥३६॥मी न जाणतो तत्त्वता । तव रुपनामाची महत्ता । ऐसी प्रार्थना ऐकतां । काय म्हणाले गणराज ॥३७॥तें पुढिले अध्यायीं सांगत । शंकर प्रियेसे भक्तियुत । ऐकतां समाधान चित्तांत । उपजेल भाविकाच्या ॥३८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते गणेशप्रादुर्भावो नाम चतुर्दशोऽध्याय समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP