मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ७ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत तत्त्वकृतस्तुतिवरप्रदानम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । पार्वती म्हणे तेव्हां वचन । हें सर्व तुम्हांपासून हर्षोत्फुल्ल मन । माझें झालें या वेळीं ॥१॥पुनः पुन्हा गणराय कथामृत । सांगावें देवा हे पुनित । जें ऐकतां होत । श्रोता पावन भक्तीनें ॥२॥पुरुषप्रकृती उभय मिळोनी । सृष्टी कैसी रचिती म्हणोनी । गणेश निजानंदी जाता तेथोनी । तें सर्वही सांगा मज ॥३॥मुद्गल म्हणती पार्वतीचें वचन । ऐकून शंकर प्रसन्न वदन । रसयुक्त रम्यपावन । कथा सांगे गणरायाची ॥४॥शंकर म्हणती पार्वतीसी । ऐक देवि कथानकासी । धन्य तूं पावन अससी । आदरें विचारिला प्रश्न हा ॥५॥गणेश होता अंतहित । प्रकृति पुरुष प्रेमयुत । स्वसामर्थ्ये एक होत । परस्परांवरी आकृष्ट तें ॥६॥तपाचरणें वर देऊन । मोहवी पुरुषार्थ दाखवून । नाना भावार्थ ते शोभन । प्रकृति आपुल्या सामर्थ्ये ॥७॥प्रकृती नाना वैभवयुक्त । पुरुषोत्तमास पाडी मोहांत । पूर्णभावें अधीन होत । प्रकृतीच्या तो तेधवां ॥८॥महामायेस पाहून । महात्मा पुरुष संमोहित मन । हावभाव युक्त उन्मन । भक्तींने तिच्या तोषला तो ॥९॥सप्तात्मक वीर्य तिच्यांत । सहसा पुरुष करी निक्षिप्त । तेणें ती गर्भवती होत । तेज वाढलें अमर्याद ॥१०॥उदरीं गर्भ वाढत । आपुल्या तेजें तो संयुक्त । प्रदीर्घ कालांतरें होत । पुत्रजन्म मोदकर ॥११॥त्या पुत्राचें नाम महान । तेजोमय तो पावन । सर्वांतर्यामि महत् तत्त्व म्हणून । सार्थनाम जाहला ॥१२॥समाधिपूर्वक जाणावा । महान् अंतरात्मा बरवा । सर्व तत्त्वांत श्रेष्ठ जाणावा । हृदयीं अधिष्ठान तयाचें ॥१३॥त्या महताने निर्मिला । अहंकार रुप पुत्र भला । तो पुढे त्रिविध जाहला । भिन्न मूर्ती प्रतापवान ॥१४॥मी सर्वत्र वसत । मम आधारें हें चालत । ऐशी वृत्ती सदा असत । म्हणोनि अहंकारनाम त्याचें ॥१५॥बाह्यभावें झाला स्थित । सर्वत्र सर्वराट् तो असत । महताचें जें जें इच्छित । तें तें करण्या सज्ज झाला ॥१६॥त्रिविध झाला तो गुणयुक्त । सात्त्विक राजस तामस होत । ऐक शिवे अहंकार स्थित । तीन शक्तींनी युक्त म्हणोनी ॥१७॥सात्त्विक ती ज्ञानशक्ती । तिनें भाव जागृत होती । राजसी ती क्रियाशक्ती । तिनें कार्य होत असे ॥१८॥तामसी ती द्रव्यशक्ती । देहरुपा जीस म्हणती । त्यांतील प्रथम तामसी शक्ती । बोलावी प्रथम विश्वयोनी ॥१९॥तिनें शब्दरुप निर्मिलें । त्यातून आकाश निर्माण झाले । आकाशें नंतर निर्मिलें । स्पर्शाचे भाव तेव्हां ॥२०॥स्पर्शानें वायू निर्मिला । महा बलयुक्त तो जाहला । वायूनें नंतर रुपाला । तेजरुपा निर्मिलें ॥२१॥तेजापासून रसाची उत्पती । रसापासून जळ निर्मिती । पाण्यापासून गंधोत्पत्ती । गंधातून भूमी जन्मली ॥२२॥ऐसी तमोगुणमयी अद्भुत । सृष्टी तेव्हां उत्पन्न होत । तन्मात्र भूतसर्गही संजात । पंचपंचात्मक तेव्हां ॥२३॥पंचभूतात्मक देह दिसत । सर्वत्र तेव्हां विनिर्मित । राजस शक्ती तें अद्भुत । पांच इंद्रियें क्रियारुप ॥२४॥पंच ज्ञानेंद्रियें ज्ञानरुपधर । जिव्हा चक्षू त्वचा अपर । नासिका कर्ण पर । ऐसी हीं पांच जाणावी ॥२५॥हातपाय गुद वाक्युक्त । लिंग पंचम ज्यात असत । ऐश्या कर्मेंद्रिय होत । सर्व क्रिया प्राण्यांच्या ॥२६॥प्राण व्यान अपानक असत । उदान समान वै राजस समस्त । पंचप्राण तेजोयुक्त । ऐसे ग्रंथीं कथिलें असे ॥२७॥सप्तधातू विभाग करित । क्रियारुप म्हणोनी म्हणत । ऐसी ही राजसी शक्ति असत । रहस्य प्रिये जाणावें ॥२८॥सात्त्विक मायेनें निर्मित । इंद्रियांचे देव पुनीत । दिशा वायु वरुण कीर्तित । अश्विन देव सूर्यही ॥२९॥ह्या ज्ञानेंद्रियांच्या देवता । ग्रंथांत असती ख्याता । अग्नि विष्णु प्रजापालनकर्ता । इंद्रमित्र तो पांचवा ॥३०॥ह्या कर्मेंद्रियांच्या देवता । ग्रंथांत असती परिकीर्तिता । सात्त्विक सृष्टि युक्ता । दशदेव स्वरुपाची ॥३१॥ऐशा तत्त्वरुप आदि देवता । ग्रंथांत उक्त ज्या आता । यथाविधी जरी जन्मता । ज्ञानहीन जाहल्या ॥३२॥सृष्टि रचना करुन न शकती । ते आदिदेव निश्चिती । म्हणोनी उपदेश करिती । ज्ञानप्रदानार्थ तयांना ॥३३॥प्रकृति पुरुष उभय देती । ॐ गं ॐ हा मंत्र अति प्रीती । अनुष्ठानविधीनें प्रचोती । गणपति मंत्राची ह्या म्हणती ॥३४॥ते आदिदेव तेथेच स्थित । महातप सर्वही आचरित । तेणें संतुष्ट होत । गणवल्लभ गणेश तें ॥३५॥त्यांच्यापुढें प्रकट होत । त्यांस पाहून ते हर्षित । स्तोत्र रचून स्तुति करीत । तत्तदेव गणेशाची ॥३६॥नमन वक्रतुण्डासी । तैसेचि भक्तसंरक्षकासी । सर्वाधीशा गनपतीसी । अव्यक्तासी व्यक्तरुपा ॥३७॥सत्य असत्य तूं असत । सम-विषम तूंच होत । ऐशा विघ्नेशा तुज नमित । भक्तिभावें पुनःपुन्हा ॥३८॥आत्मा अनात्मा तूंच अससी । निर्गुण गुणरुपही होसी । नामरुपधर तूंच अससी । नामरुपविहीन तूंची ॥३९॥अनंत उदरसंस्थ अससी । नाना भोगकर दिससी । भोगहीनही तू अससी । सर्वत्र स्वानंदाधिपति तूं ॥४०॥माया धरा नमस्कार । मायाहीना प्रणाम नमर । मायिकांसी मोहकर । सर्वज्ञा तुला नमस्कार ॥४१॥सर्व सिद्धेश्वर अससी । सिद्धपति तूं भाससी । सिद्धिहीन सिद्धीशा तुजसी । नमस्कार वारंवार ॥४२॥जगन्मय जगद्हीन । कर्म फलदाता महान । कर्मरुपा तुजसी नमन । कर्महीना तुलाही ॥४३॥ज्ञान्यांसी ज्ञानदाता जगतीं । ज्ञानहीन ऐसीही ख्याती । ससंवेद्य चतुर्विधमय भूतीं । चतुर्विध विहीन तूं ॥४४॥पाशांकुशधरा एकदंता । अभयमुद्रा तूं दाखविता । भक्तांची होसी सुखदाता । प्रणाम तुला पुनः पुन्हा ॥४५॥चतुर्भुज तूं जगतीं । सुपासारखे कान असती । दोन्द वाढोनी तुझी महती । एकदन्ता जगीं झाली ॥४६॥मोठयांत मोठा तूं अससी । लहानांत लहान तूं होसी । गजमूख देवा ब्रह्मा तुजसी । ब्रह्मणस्पते नमस्कार ॥४७॥ब्रह्मदाता ब्रह्म जगती । तुझी स्तुती करावी किती । अपार गुणराशी ही कीर्ती । गणेशा नमन शतशः तुला ॥४८॥ऐसी स्तुती ऐकून । गणेश संतुष्ट होऊन । विनमर ऋषींस बोले वचन । पुढिले अध्यायीं वर्णिले तें ॥४९॥इति श्री ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन् मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते तत्त्वकृतस्तुतिवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP