मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
नाव तुझे जयना

सगनभाऊ - नाव तुझे जयना

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


नयनकुरंग फिरंग लखाके जस कराडचे मनोरे ॥

कुच तनु रे ॥ध्रु॥

नाव तुझे जयना ऐकिली इष्कबाज खेळसणी ।

आलो बांधोन पैना सोडिले जोतपुर भाळवणी ॥

चंचल मृगनयेना कर काही नैनाची मेळवणी ।

करते मुकाम हुकुम असेल तर शितळ होय, तनु ॥कुच तनु ॥१॥

जोतपुरचे लाल पंची आलो लालडी हुडकाया ।

लुटू दे नगद माल चढू दे झेंडा लाव भडकाया ॥

आरक्त लोचन लाल भरली छाती आली तडकाया ।

ताट अरून डोळ्यासी हार आले खुपती काहाड कणु रे ॥ कुच तनुरे ॥२॥

क्या कहते हो रंगबाज गबरु मै तो इष्क की मारी ।

ये बंह्मनके राजसाहेब रखो हुरमत हामारी ॥

रखो जरा शिरताज तबसे आखा खुसी तुमारी ।

रात होने देव बात बनेगी इतनी आर्ज सुनो रे ॥३॥

सूर्य अस्तमान झाल्यावर करती रोषनाई ।

आपले वचन प्रमाण पावली नवखंडची जानाई ॥

चढू दे इष्क कमान भोगा नाही माझी मनाई ।

रत्न सगन भाऊ किर्ती जयाची नभमंडळी धनु रे ॥ कुच तनुरे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP