मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
मनात हसले ग बाई हसले

सगनभाऊ - मनात हसले ग बाई हसले

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


मनात हासले ग बाई हसले ॥

जाणूनबुजून फसले ॥ध्रु०॥

लुगडे निरीत फिटले ॥

भ्याले तोंडाले पाणी सुटले ॥

मलखांबासी झटले ॥

मिठी उभयतांचे खटले ॥

सोने आगीत आटले ॥

काम शरीरी समधी मिटली ॥

दोही मांडिच्या मध्ये डसले ॥१॥

इष्कयार मतवाले ॥

दरदी शांती सुख मन धाले ॥

जहरी विषाचे प्याले ॥

किति तरी सोस जखमी भाले ॥

होती किल्यावर हल्ले ॥

खबुतर लोटन घेती पल्ले ॥

उरी गेंद रसरसले ॥२॥

भर नवती छातीवर गोला ॥

मद कांडे चरकी गाळ ॥

खेळी मेळी गंजिफा चाळा ॥

खुबसुरत चित्रशाळा ॥

पापणी लवती माझा डोळा ॥

रणामधे समशेर चमके चपळा ॥

रंगमहालामधे बसले ॥३॥

प्रेमरसाची गोडी ॥

आकासी आंबा पिकला पाडी ॥

द्रव्य नको रथ गाडा ॥

बागबगीच्यामधि फुलझाडी ॥

रंगरस गाती धाडी ॥

नारेळी फणसी ताडी माडी ॥

गुणी सगन भाऊचे मसले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP