मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
मी वचनि विकली जाइन तुमच्या करी

सगनभाऊ - मी वचनि विकली जाइन तुमच्या करी

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


आवचिता राज अंबीरा दृष्टी पाहिला ॥

न्याहाळुनिया पाहते चंद्र जसा उगवला ॥ध्रु॥

तुम्ही सर्व गुणसंपन्न माझे गुणनीधी ॥

मजविसी कल्पना नका धरू चित्तामधी ॥

मी दासि पदरची चरण लागन अधा ॥

मसि का बोलाना वेळ आहे की सुधी ॥

तुम्ही बौध्य रूपिका वसता हारल्या बुद्धी ॥

चेतला मदन आग जाली शरीरामधी ॥

तुम्ही मुंज गुलछानाबाद आढळला मला ॥न्याहाळुनि ॥१॥

मी दासि पदरची लोळन चरणावरी ॥

मी वचनी विकली जाइन तुमच्या करी ॥

केसाने कापला गळा फेकलिस सुरी ॥

भाल्याचि जखम मज लागुन गेली उरी ॥

जे कर्णे तेच करावे सांगते तरी ॥

वचनाचे सचि कळुन आला आजवरी ॥

तुज पापी रकूरी जाले भोग भोगिला ॥

आसो कर्णेच होते कसा डाग लाविला ॥२॥

ऐकुन घे नारी हासुन बोले साजना भरमाची मुठ तू नको दाउस फोडून ॥

आम्ही कोण कुठिल राहणार सांगतो खूण ॥

बाळपणी खेळ खेळत होतो हवसन ॥

हे अशा रीतीने वागत होतो जपून ॥

कर शेवट नारी धरी तू अमुचे मन ॥

बळकग धरिला पदरास हाच दाखला ॥

जसा मोहना राणिने बटाऊ हाती घरीला ॥३॥

लागता हातास हात चंचळ कामीना ॥

घाली जव्हार अंगावर पिंजर्‍यातील मैना ॥

वेणी मुद राखडी मुधी घोस माईना ॥

लाल गुंजावाणी डोळे जसे नयना ॥

तटतटित कंचुकी नेसुन शालू जुना ॥

पतीसंगे चारी प्रहर केली कर्मणा ॥

गुणी सगन भाऊ हरीपद चरणी रंगेला ॥

रामा म्हणे नारी शरण जावे विठ्ठला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP