मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
सखा रुसला जाते घरी

सगनभाऊ - सखा रुसला जाते घरी

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


कुठे गुजराथ कुठे शहर पुणे ख्याती करी ॥

सय झाली असेल सखा रुसेल जाते घरी ॥ध्रु०॥

याच्या किर्तिचे पत्र मला आले होते ॥

काय सांगु तुम्हा सांगा आम्हा भले होते ॥

काल रात्री स्वप्नात धनी निजले होते ॥

नजर नजराने शरीर गेंद दिल्हे होते ॥

मला मांडीवर घेऊन जणु न्हाले होते ॥

प्रेम प्याले रसभरीत गोड प्याले होते ॥

अन्न भुल मला तैसी मला भुल पडली ॥

वचन दिल्हे होते जाते सये झडकरि ॥१॥

नजर काय नेऊ नेते नजर नेत्र दोन्ही ॥

भेट झाल्यावर पुढे ठेविन कुच दोन्ही ॥

त्याचे चरणावर शीरकमळ जोडून पाणी जाजपरीयंत खात आलो अन्न पाणी ॥

सुररण सुरफंदी मतवाला आमचा धनी ॥

बालोबाल करीन खुश तृप्त नेत्र दोन्ही ॥

जेजूरीचा राव मल्हार आमचा धनी ॥

आली गोड ध्वनी जाते सये जलद करी ॥२॥

घाट कुसराचा वाट तळकोकणची ॥

झाडी करि दाट एकसरे बनबनची ॥

वसई सुभा सितळ मार्ग तरी दातरची ॥

चला उतरूनीया वस्ती केले माहीमची ॥

चिंचणीतारापुर उंबरगाव दमनची काय तारीफ सांगावी दोन्ही किल्ल्याची ॥

नगर घनदेवी नवसरी दादासाहेबाची ॥

प्रथम मुजरा करू पुकार बडोदे नगरी ॥३॥

तप्ती वांगदेव सुरत शहर बाजुला ॥

कुच करुनि दरकुच आलो भडोचला ॥

तेथे आदी माया नरमदा ही संताला ॥

भावे करुनि वंदुनि जीव संतोषला ॥

मीयागांव सोडून मार्तंड जेजुरीला ॥

एक रात्र तेथे कर्मिली श्रम हरिला ॥

माझी आर्जी जाउन सांगा दादासाहेबाला ॥

चिठी झाप्याची घ्यावी जलद कृपा करी ॥४॥

राव समशेर बहाद्दर का आया हालकारा ॥

चलो याद किया साहेबने ललकारा ॥

परिजात करिन कुल ज्वाहार नग सारा ॥

सब दख्खनके लही जा कछु लग प्यारा ॥

नीगा होती की सात धनी लेऊ मुजरा ॥

बिर बडोदा देखनकु खडा जग सारा ॥

कडे तोडे पोषाख दिये नाव तेरा ॥

सगन भाऊ कहे यमा की छेब न्यारी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP