मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
माझी ओटी भराग

सगनभाऊ - माझी ओटी भराग

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


पत्र लिहू नका जाते का जाते सये वाट करा रे ॥

येथुन त्वरे माहेरासी हेची मागणे तुम्हासी माझी वोटी भरा गे ॥ध्रु०॥

फळशोभन केल्यास जाले महीने साहा गे ॥

आसे आनंदात स्वामी माझे दिवस दाहा गे ॥

पुढे जायाचे ठरले बसुन नवती पाहा गे ॥

असी बोलली सख्यास राघू गृहीच राहा गे ॥चाल॥

कारे धरियली उदासी फोडुन टाकीन मस्तकासी ॥

नाही ठरत जरा रे ॥१॥

मला विसरी पाडून घात केला कसा गे ॥

तुम्ही जातीवंताच्या स्त्रीया खाली बसा गे ॥

झाला वर्तमान स्वस्थपणे निवळ पुसा गे ।

हारणी चुकली कळपात धुंडित दाही दिशा गे ॥चाल॥

राघोविण सखियासी अन्नपाणी गोड जहाले लागत नाही जरा गे ॥२॥

या मागे पत्र लिहीले होते काय त्यासी गे ॥

एक मास दिवस पति राज गृही नाही आले रे ॥

बरे दिसत नाही खरेच आता मरण आले रे ॥

प्राण वाचवा असी मुक्त बहुत बरी रे ॥चाल॥

प्रश्न पुसा ब्राह्मणासी द्रव्य देऊनी विषशी उठा त्वरे जलदी करा रे ॥३॥

विप्र बोले जा शरण तु अंजनीसुता रे ॥

राम करिल तुझी शांती नको करू शोक व्रथा रे ॥

चार योजन पतीजवळ आले हर्ष चित्ता रे ॥

आज सोन्याचा दिवस चढल रत्न हाता रे ॥चाल॥

सगनभाऊच्या कवनासी सगर चाहाती राजबनसी रसीक गोड सीरा रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP