मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
नवीन आलिसं पहाण्यांत

सगनभाऊ - नवीन आलिसं पहाण्यांत

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


पाहिलेस नेत्राने जरासे कुच ठेवशील उघडे ।

इच्छा आमची पूर्वी फिरून आम्ही न येऊ फांकडे ॥ध्रु०॥

नवरत्‍नामधि चंद्र पाहिला तेजस्वी आनवा ।

नवीन आलिस पाहण्यात शेहेर पुण्यामधि बुट नवा ॥

आम्ही आपुल्या चित्तांत इच्छीतो ताहे सारिखा जवा ।

तु अज्ञानामधे तुझी खुण ही ठाऊक तुच्छा जीवा ॥

तुसि करावा इष्क आता तू दे शकुन उजवा ।

तोंड भरून गोड बोल जैसा निरशा दुधाचा स्त्रवा ॥

तिसरा महिना भरत आला श्रम करिता माशुकडे ॥१॥

उत्तरसी प्रति उत्तर व्हावे निजलीस का जागी ।

बौध्यरूपी बोललिस नसावी चतुराई आंगी ॥

काय आम्ही बोललो मनन कर मैंदपणा त्यागी ।

परमेश्वरे दिधले हात पाय मग का व्हावी पांगी ॥

प्रित करावी चतुर गुणस्त गुणरस रंगी ।

अमृत फळ त्यागुन शुद्ध खातीस पिकली वांगी ॥

तुझ्या दिलाची गोष्ट राग नको येउ देऊ गडे ॥२॥

धर्मन्याय सांगितला ऐकता चित्ती हर्षावे ।

मान्य करून उपचारे गुणिचे गुण घेत असावे ॥

कल्पवृक्ष पाहुन शितळ छायेखाली बसावे ।

त्यातील सारांश तो सुज्ञानांस पुसावे ॥

शिजवुनिया शरीरास आपुल्या अहो प्राण विसावे ।

तेव्हा आपण एकवेळ प्राण मित्रावर रुसावे ॥

पायाशुद्ध स्त्रियाची लक्षणे सांगितले उघडे ॥३॥

माझी एक विनंती ऐकुनि घ्यावी मजसाठी ।

आसे नवे आसे वर्तावे सांगितल्या गोष्टी ॥

संतोष मजला झाला हे गुण आहेत तुझे पोटी ।

प्रित साधी लोभ विनोद की घडून येईल दृष्टी ॥

हे उत्तर भंगील हा दोष ज्याचा त्या कडे ।

सगनभाऊ म्हणे सुखी असावे सोन्याचे चुडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP