मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
मज पापिणीची दृष्ट सख्याला...

सगनभाऊ - मज पापिणीची दृष्ट सख्याला...

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


मज पापिणीची दृष्ट सख्याला लागल गे बाई ॥

सीताकांत रघुनाथ पती मज जन्मावर देई ॥ध्रु०॥

अधिच रंग सावळा करुन पोषाख भरजरिचा ॥

मुखी सूर्याची कळा जसा का पुतळा मदनाचा ॥

राज बनसी बावरा मुशाफिर अमदा नगराचा ॥

ती उपमा शोभे रायाला सत्य वचनाचा ॥

छेल बटाऊ मोहोना राणी जोडा इष्काचा ॥

तशी प्रित उभयता आनंद चित्ताचा ॥

मिच अशी दैवाची पार मज भाग्यासी नाही ॥१॥

आम्हि कुळीच्या स्त्रिया जातिवंताच्या गुणगहिना ॥

चित्ता जोगा पति राज बनसी राजिवनयना ॥

पट्टराण्या भवताल्या मध्ये मी चंचल मृगनयना ॥

एताजाता कवळून धरता मैलागिरि चंदना ॥

चौ प्रहराचे चार करून शृंगार मनमोहना ॥

उभी राहाते सन्मुख मनासी आनंद माईना ॥

माझ्या मनची आवड सख्याची होऊ काही उतराई ॥२॥

मान्यमान्यता करून मोहिले त्या पतिरायाला ॥

प्रित ठेवाल की मजवर लागेन तुमच्या पायाला ॥

नेणतपण आलडपण बसो उभयता न्हायाला ॥

हात टाका छातीवर लुब्धेत तुमच्या पायाला ॥

करा चुनडी पोषाख शुभ्र पातळ नेसायाला ॥

माझ्या मनची आवड असावी पतिच्या शेवेला ॥

मी आपला जिवप्राण करिन खुरबान या ठायी ॥३॥

नाना परिचे विलास करि ते त्या रंगमाहालात ॥

कवटाळून सजनाचा धरिला एकान्ती हात ॥

जाईजुई मोतिया शेज पुष्पाची खुष वक्त ॥

करून सोला श्रृंगार कपाळी कुंकू शोभत ॥

वचनी गोउन सजण भोगिला मोत्याची जात ॥

स्वरूप पतिचे चांगले मिळाले जोतिस जोत ॥

सगनभाऊ कविराज नित्य प्रसंगात गाई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP