मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
सुख असल्यावर दिना सारिखे...

सगनभाऊ - सुख असल्यावर दिना सारिखे...

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


सुख असल्यावर दिना सारिखे का भौती फिरते । घोकण्या करिते ॥

सवाई राजेंद्राला सख्याला नित्य आर्जि करिते । ह्रदई पदस्मरते ॥

सत्तेपुढे शहाणपण माझे काही चालेना ॥ म्हणे कामिना ॥

माझा केवा काय परंतू फटकुन राहावेना ॥ ऋताचा महिमा ॥

ऋतु प्राप्त जाहल्यावर तेव्हा तुम्ही राजिवनैना ॥ करून हर बहाना ॥

झटपट जाता निघोन नोक मारून पांचिप्राणा ॥ असे का सजना ॥

छेल बटाऊसाथी निघाली सति राणी मोहना ॥ शहर निमोना ॥

सारी अमदाबाद बघाया लोटली सैना ॥ इष्क नगिना ॥

तसी आवड रायाची असावी असुन मजवरते ॥ फार मी झुरते ॥

नासीवंत निसिद्ध शरीर चक्क महालमाडी ॥ वस्ती वाडी ॥

संपद संतत भरुन उरली सुंदर रथगाडी ॥ राहिना काडी ॥

पात्रा नाटकशाळा पसंत चातुर्य पवाडी ॥ गवई धाडी ॥

किर्त करून दावी ती रिझविती आणुन रसगोडी ॥ आखर उजाडी ॥

जन्माचे सार्थक उभयता पांडुरंग जोडी ॥ वारी आषाढी ॥

पाय उतारा येईन मागे पळभर ना सोडी ॥ मनाच्या ओढी ॥

जिवंत तोपर्यंत ईश्वरभजनी मन भरते ॥ भरून उरते ॥३॥

अहोरात्र अहो दिवस वेद करिती स्नानसंध्या ॥ जगदवंद्या ॥

आवरजुन पंचप्राण ईश्वरभजनी भरल्या नद्या ॥ गाळीव चांद्या ॥

साधन करून पाय जोडिले शरिराच्या गाद्या ॥ हाताच्या गिरद्या

मजवाणी कोणी दुःख भोगिले सुख भोगिती वाद्या ॥ रांडा सोद्या ॥

बाराच्या राशीचे सोने लोपेना मुद्रा ॥ पारखी भेद्या ॥

पुतळी आपला गुण टाकिना काय बोलु वाद्या ॥

जिवाच्या चिंध्या झाले तर राव कसे सोडिले धन पुरले उकरिते ॥ धावले पुरते ॥१॥

स्त्रीपुरुषाची जितकि लक्षणे माहित सुकुमार ॥ वृत्तांत सारा ॥

खेळ खेळुनि वेगळे खर्च करिता पुतळ्या मोहरा ॥ लालाच्या धारा ॥

आपण होउन कोणी म्हणती चाल बागात राजकुमारा ॥ बझरी फेरा

जेव्हा बलावू जाइल तेव्हा येती व्यभिचार ॥ कलिचा पहारा ॥

चंद्रवदन महियार फारसी वाचून पहा यारा ॥ भेद सारा ॥

प्रित ऐकता दुभग काळिज जिव प्याला वारा ॥ नको सौसारा ॥

सगन भाऊ म्हणे राज अंबिरा शोधुन पहा घरते ॥ सागरि भरते ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP