मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
जाळा वाचुन कड येईना

सगनभाऊ - जाळा वाचुन कड येईना

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


माया नाही लोभ नाही ऐसी का गे सरस्वती ॥

नाही लागत साजण हाती ॥ध्रु०॥

मन इच्छेचे भोजन पात्री दीप तस्तामधी मालवे ॥

शरीर काळीज कालवे ॥

डावी पापणी लवता राहिली उजवी बाही पापणी लवे ॥

कर्म घेते हेलावे ॥

थटकारून किलबिलाट करता तांबर भोवती तोलावे ॥

कसुन कटोरे खोलावे ॥

माझे काळे पोळे करता सुंदर येती काकुळती ॥१॥

निजणे बसणे आसले तर आसो ॥

नसले तर नसो देवा रे ॥

पोटांत सुटले हे वारे ॥

बारेदरी केदार इच्छीले होईन एकदा बरभार ॥

जडो सख्यासी वेव्हार ॥

पतीचे दिल चित्ती दिले सोडखत दुसरी पाहिली आरबारे ॥

कापुन घेइन तलवारे ॥

माझ्या प्रितीवरी बिजली पडली खाउनि निजते आकुती ॥२॥

आस्त्रीचा तळतळाट कठिण स्त्रिहत्या वाईट मोठी ॥

कोण म्हणेल वार्ता खोटी ॥

धमकाउनि सांगा बायांनो कैकाची गेली पागोटी ॥

तुमची होईल गुरगोटी ॥

हे कळकटल्या आंगाचे रांडरू जग म्हणवी बाबर होटी ॥

काय पडलीस काळी सठ्ठी ॥

निंद ही रांड सवत माझी तोंडात पडो इच्या धुळमाती ॥३॥

जाळा वाचुन कड येईना मायावाचुन कोण रडत ॥

जखमी मानुस तरफडत आता अंत का पाहाता माझा सांग हितगुज आवडत ॥

उतरा नदी पाणि चढत ॥

करुना कर शब्द बोलून आले शयनी दुडदुडत ॥

हाती आले खाते बुडत ॥

सगनभाऊचे गुण ऐकुनिया ॥

उड्या घालती आतीरती ॥

मुलखावर ज्याच्या किर्ती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP