मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
राव सिदगाव करा

सगनभाऊ - राव सिदगाव करा

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


पंचानन बाधिनिचे ॥

पति पाहु तमाशा नाग तुम्ही नागनिचे ॥ध्रु॥

पाची पक्वान्न तयारित पुलावबाजी ॥

केळीच्या फुलाची भाजी ॥

सिदकाव करा गचीवर थंड हवा जी ॥

गरमागरम जेवा जी ॥

जहनेबादी पोषाख गुलाबी प्याजी ॥

गुडगी तंग वर काचा जी ॥

बोलणे आवडते लाहान खूरी ठेंगणिचे ॥१॥

राजसा मला द्या शृंगाराची पेटी ॥

आपल्या गळ्यातिल कंठी ॥

तरतरित कोरी शुभ्र खड्याची आंगठी ॥

सख्या घालिन मधल्या बोटी ॥

पेहरवा करिन मी आपला मोळा मर्‍हाठी ॥

नोकदार दक्षण धाटी ॥

साठ मार तडाखे पिस्तूल संगिनीचे ॥२॥

पुष्पराज माझा ऐकुन घ्यावा दोहोरा ॥

भोगिंद्रा भोग भवरा ॥

दिवसान दिवस रंग चढता निरा गहिरा ॥

झडते फैरावर फैरा ॥

तुम्ही नाद लुब्ध का भेदी इष्क कट्यारा ॥

समजून घ्या मग विचारा ॥ नित्य ख्याल तमासे अखंड रंगजीचे ॥३॥

धनि आप सुगर महाराज श्रेष्ठ राज्यांत ॥

या कलीमध्ये भगवंत ॥

ना मुराद गरिब आम्ही तुमचे अनाथ ॥

पायधूळ निर्जीव प्रेत ॥

आंगिकार माझा करा घ्या पोटात ॥ मस्तकी ठेवा हात ।

गाई सगन भाऊ तेज कांच बंद आंगणीचे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP