मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
मय तो जोगिन होउंगी

सगनभाऊ - मय तो जोगिन होउंगी

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


दाद कोइ नही देता मय तो जोगिन होउंगी ।

राख लावा माझे आंगी ॥ध्रु०॥

हाल हाल फकीरी लेऊ धुंडत बन बन मे जाऊ ।

सख्याला दृष्टीने पाहू ॥

पितम प्यारे होगये न्यारे विडा कैसे देऊ ।

कोण्या समजुतीने समजाऊ ॥

हाल जंजिरा लेऊ बंद चोली कुबत्ती देऊ ।

आग्नाक्षा शरिरी लाऊ ॥

रैन चैन दिलख नख है मै ले उस भोगी ॥१॥

चार घडी दम पकडो शहरमे भेजो हलकारे ।

नगर धुंडून पहावे सारे ॥

बखत पडा है मुजपर रफिक लाना आजपुरे ।

नाही धिर विषयाचे वारे ॥

तिर कलिजा पार बलम मके जर बके मारे ।

असे द्रष्टा केले कारे ॥

छतीय भर भर आई आब मै बैठी बेतागी ॥२॥

ये बन डेसिर ताज लाज रखना मोतीवाले ।

अता मी त्राहि फार झाले ॥

आई मे हलके बाहेर कपडे उतारके डाले ।

चुडे फोडून तुकडे केले ॥

दोनो हातमे उंचे चिनीके भरभरके प्याले ।

असे द्रष्टा कारे केले ॥

सगनभाउचे ख्याल हरफ चमके समशेर नंगी ।

राख लावा माझे अंगी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP