मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
कशि जाउ सखे यात्रेला

सगनभाऊ - कशि जाउ सखे यात्रेला

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


मी सवासिनी कसी जाऊ सखे यात्रेला ॥

लुब्धले तुझ्या सुरतेला कसे करू ॥ध्रु०॥

तुझ्या आधी जाईन पंढरीला चुरसा चुरसी ॥

आंगणात झाले दुरसी कसे करू ॥

लोका ज्या पाहुन स्त्रीया तिला फुरफुरसी ॥

मनच्या मनात चुरमुरसी झुरझुरू ॥

बोलण्यामध आटापेनास बोलुन उरसी ॥

हा मिथ्या वाद तू करसी फिरफिरू ॥

ह्या आहेत चाली तुमच्या ठाउक पहिल्या स्वामीराया ॥

जा पंढरीस द्या गोष्टी सोडून दुरल्या स्वामीराया ॥

आम्ही स्त्रीया जात छळनुक करिते मैत्रेला ॥१॥

जे होयाचे ते होऊ दोघे जाऊ ॥

अंतरले बापभाऊ तुजवीन ॥

दोघाचे दोन घोडे सजउन घेऊ ॥

पंढरपुर विठल पाहू विनऊन ॥

तु कळलीस बे वचनी माया लाऊ ॥

तुझी क्रिया नाही शुद्ध राहू म्हणऊन ॥चाल॥

इमान देऊन वचनात गोविले मजला ॥

राजस वदने ॥

तुझ्यापायी म्या संसार आवघा तुजला ॥

राजस वदने ॥

कोण घटका लागली म्हणुन जिव रझला ॥

राजस वदने ॥

एक दिवस नाहि टिकणार तुझ्या खात्रीला ॥२॥

सखी सांगे सख्याप्रति आर्जवून मर्जी ॥

मी नव्हे मतलब गर्जी जावलागी ॥

या शहर पुण्याच्या स्त्रिया गोड वर वर जी ॥

हात फिरविल तोंडावर जी पुढे बगा ॥

हा भरमाचा भोपळा आहे आजवर जी ॥

न कळे फुटेल हा गरजी पुढे दगा ॥चाल॥

या काळी प्रीत चालवणे तुजला आमची प्रियकर राघु ॥

पुढे बग न कोणी मिळेल तुला फुकाची ॥

प्रियकर राघु ॥

राहिली क्रिया फेरफार गोष्ट लाखाची ॥

प्रियकर राघु ॥

या कर्मे लागेल बट्टा कुळगोत्रेला ॥३॥

रतु चौथा दिवस प्रातःकाळी न्हाऊ ॥

खुषबोई अत्तर लावु राजसा ॥

अनुभवे एकविचारे उभयता येऊ ॥

दरकुच पोहचले जाऊ सा दिवसा ॥

केले चंद्रभागेचे स्नान क्रिया घेऊ ॥

तुळसी पत्र बेल वाहू विठ्ठला ॥

रावळांत जाऊन अर्ज विनंती केली ॥

प्रियकर राघु ॥

कवी सिद्धनाथ म्हणे आशा पूर्ण झाली ॥

प्रियकर राघु ॥

गुणी सगनभाऊचे कवन चंद्री नेत्रेला ॥

म्हणे बिबन या यात्रेला ॥

जिवलगा ॥

मि शीवनासी कशी जाउ सखे यात्रेला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP