मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
जळ्या लागला काय हो वहेनी

सगनभाऊ - जळ्या लागला काय हो वहेनी

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


जळ्या भागला कायहो वहेनी ॥

सीन भाग गेला भावोजी पाहता नयनी ॥ध्रु०॥

पहिले वहिनीचे नाते ॥

हे बाळपणीचे होते साजणी ॥

माहेरचे माणूस येते ॥

बोलते भित भीत साजणी ॥

तोंडाउन फिरवी हात ॥

इष्काचा चेतला पोत साजणी ॥

चाल ॥ कंबर सोडा लावा घोडा वाडा आहे शेजारी ॥

आपले पतीची सेवा चाकरी करून येते माघारी जी ॥

स्नानासि उन उन पाणी भोजनासी पात्र भरूनि पाठविते ॥१॥

पतिरायाचे चोरीन ॥

मी बंदोबस्ती करीन अहो सजणा ॥

लागली असेल भूक-ताहन ॥

मी आप हस्ते वाढीन अहो सजणा ॥

मजवरती पंचप्राणा ॥

आता करा भोजन अहो सजणा ॥

चाल ॥ जेउन बोला रत्न अमोला मजला काय काय आणले ॥

गुजराथीचे अचूक लेणे डागिने चांगले जी ॥

पांघराया चुनडी बडणी नेसाया रंगी फुटाणी घे साळू ॥२॥

बिंदि टीका सीसफूल ॥

बाळ्या बुगड्या काप अनी ॥

मोल साजणी ॥

मोत्याचे पेंडे पाहाल ॥

सरीवरती मीन्याचे वेल साजणी ॥

चाल ॥ छंदफंड डागिणे बुंद आज गेंदपरी घालावे ॥

रूळ साखळ्या घालुन हळू हळू चार कदम चालवे जी ॥

बोला तोंड भरूनी कमरबस्ता सोडुनी मी येतो ॥३॥

आता बनलिस रंग बाहारीची ॥

हिरकणी केली गारिची साजणी ॥

मला सांग खबर माहेरीची ॥

बातमी शहर पुण्याची साजणी ॥

पुरवावी हाऊस नारीची ॥

तुम्ही आपल्या प्राणप्यारीची साजणी ॥

चाल ॥ रत्न भूपती झाली भ्रांति धावा करिते क्षण ॥

चंद्राकडे पाहा सूर्याकडे पाहा काय तरि तेज तीक्ष्ण जी ॥

गाई सगनभाऊ रंगेला सुलतानी असमानी जन म्हणती ॥

जळ्या भागला कायहो वहेनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP