मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
नवी होती का जुनी होती?

सगनभाऊ - नवी होती का जुनी होती?

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


कसुन मारिला बाण भेदला जाण या जिव्हारी ॥

मी कमान मुळतानी वान हा कळला वेव्हारी ॥ध्रु०॥

पडत झडत आज आला कोणीकुन उतरला चेहरा ॥

चोरटी पाउले वोळखली बराचतिचोरा ॥

बारा द्वारा फिरून आला की येकीवर फेरा ॥

लटपटींत पगडीचा पेच घामेजला घे वारा ॥

चौकड्याचे मोती विष्कळति सईलावल्या तारा ॥

भीगबाळीचा लोलक ढळला तुझीया सुकुमारा ॥

नवीच होती का जुनीच होती तुमची कूवारी ॥१॥

काळ्या सावळ्या गोर्‍या भुरक्या लहान खुर्‍या ढुंगण्या ॥

झडा पडून घेरतील सख्या कोवळ्या बारिक चिमण्या ॥

एकमेकीला वर्म समजला लावतील फुणग्या ॥

आहे स्वरूपाची हाण बसावे तशा गाळीत थीणग्या ॥

भरपुर भरल्या भरून उरल्या दाण्याच्या कणग्या ॥

ह्या रांडा घरघाल्या जैशा शेतावर बणग्या ॥

लोणकडे शुद्ध नाही कडूपणाची मवारी ॥२॥

हिरवी पिवळी लाल काजळी कोरी ताजी घडी ॥

नग्न करून नेशिवता आनंदे घालितात फुगडी ॥

हर्षाने बोळविता देउन द्रव्याची गठडी ॥

मला बातमी कळली तुमची प्राण जीवाचा गडी ॥

दो घटकेचे सुख शेवटी मी पडले उघडी ॥

प्रीत घरोघर नाहि लुटून खातील सीरची पगडी ॥

लुटून फस्त करतील नेतील पलंगाच्या नवारी ॥३॥

मर्जी रक्षून बरीच बोलतीस घेतलीस झडती ॥

इष्काची समशेर असली पेशवे लढती ॥

पंचप्राण अर्पिले आमुचे केव्हा दोष हरती ॥

तुझ्या मनामधे सवाई दौलत जास्त असो वदती ॥

ईष्कामधि तू धुंदफूंद आरक्त नेत्र चढती ॥

मग मस्तक ठणकत समजल्यावर निचींत पडली ॥

कवळ सेंग चवळीची कोण सेविता गवारी ॥

सगनभाऊ म्हणे समजल तर घर राखा वेव्हारी ॥

कसुन मारला बाण भेदल जिव्हारी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP