मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
शकुनवंतीची याचना

सगनभाऊ - शकुनवंतीची याचना

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


तू रत्न माझे गूणी सद्‍गुणी बाळपणीचा गडी ॥

इष्कबाज जहराची पूडी ॥ध्रु०॥

रत्‍नागर सागरा आगरा मम कंठीचा मणी ॥

आहे पण जाणेल तो तन्मणी ॥

प्रित परीक्षा करून बोलते सतगतीत होउनी ॥

बसावे स्वस्थ सिंहासनी ॥

पंचाक्षरी सारखे बरोबर सांगावे साजणी ॥

घडल असले पुरवीचे ऋणी ॥चाल॥

तुम्ही सुखसागर मी स्मरते इंद्रायणी ॥

तुम्ही लाल गौर मी तुमची मृगलोचनी ॥

तुम्हि बाच्छाय मी आलबी चंद्र वदनी ॥

तुम्हि चंद्र मी चांदणी उभयताहि सोन्याची घडी ॥

सुफळ जाउ द्या उजवी गूढी ॥१॥

आरक्त नेत्र नका करू मी तुमची शकुनवंती ॥

प्रित आक्षरे धरावी चित्ती ॥

प्रधानकन्या पुत्र सावकाराचा लक्ष्मीपती ॥

नगर पुण्यशहर चंपावती ॥

शिरच्छेद करावा हुकूम राजाचा निश्चीती ॥

वजिरकन्येसी दुति सांगती ॥चाल॥

पुरुषाचा वेष जाले स्वार तुरुंगावर ॥

त्या रणांगणी घुसली जाउन सुंदर ॥

पी पाणी सख्या पाहुन घे डोळेभर ॥

राजा म्हणे प्रधानपुरुष का स्त्री सांग आवडी ॥

खोंचला प्रधान मनि चरफडी ॥२॥

तिसरी विनंती कसी महाराजा सांगे सख्याला सखे ॥

प्रित लेले मजनुसारखे ॥

धर्माची प्रित नव्हे पाक मोहंबत सत्ता सारखी उभयता अपले घर्चे सुखी ॥

नित्य काळ बागामधे जावे त्रयोदश विडे मुखी ॥

मुखोवटा सूर्यबिंब लखलखी ॥चाल॥

तक्ता गुलाल खूष रंग पाहुन ठरियेले ॥

कौतुक पहायासी नगरलोक भरियेले ॥

थाट करून लैलैसे पाचारिले ॥

वृत्तीला मोहिले दुजेपण काय त्याजमधे गोडी ॥

किर्त अपकिर्त जगी केवढी ॥३॥

चौथी विनंती कसी महाराजा नाही तुम्ही ऐकिली ॥

प्रित माझी स्वामिनी पाहिली ॥

भ्रतारा आधी भोग देइन म्हुन राजकन्या बोलली ॥

वांज पुत्रास भांक दिधलीत अश्वीनीवर स्वार पतीबरोबर दोघे चालली ॥

टेकडीवर कोपी पाहिली ॥चाल॥

कुळदैवत माझे पतिरायासी म्हणत क्षण एक ठरा दर्शन येते घेऊन ॥

पति पाहातो आली सख्याला भोग देउन ॥

सगनभाऊ म्हणे रामा मनाच्या आनंत तरंग बोढी ॥

करा वीठ्ठल पंढरिचा गडी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP