मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
ये मन मोहना

सगनभाऊ - ये मन मोहना

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


भोग्या भवरा का करितो आमुचा मारा रे ॥ध्रु०॥

ये मन मोहना पाहिलास पुरता चवनारे ॥

ऐक जीवना याणे खोडिलास हिरवा दवनारे ॥

भरली पबना कसी उतरू राजीवनयनारे ॥१॥

अरे महाशंखा मारिलास विषयपंखा ॥

काढलीस आग का लई जालीस सुक्ष्म आलंकारे ॥

वाजवू डंका आज होईना लढई झुणकारे ॥

धर्मशिळेवर पाय ठेवीता दाहा शरीरा का करितो ॥२॥

स्वप्नी वचका परक्याचा बसतो दचका रे ॥

कंबर लचका करिन करी कान्हा डूचकारे ॥

घेऊ गालगुचका उपटिन शेंडीचा बुचका रे ॥

हाती घ्या दर्पण का जाहलास करडे भवरारे ॥

का करितो ॥३॥

नकली वकलाभोवताली करितो नकला रे ॥

अंबा पिकला आत रेषाचा खुण भकला रे ॥

दुर्गुण शिकला गुणी सज्जन पाहुन झुकला रे ॥

सगन भीऊचे गुण भरपुर सीवरा भीवरा रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP