मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
चांदण्यातील विरह

सगनभाऊ - चांदण्यातील विरह

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


पडले शुभ्र चांदणे काय मी करू ॥

अशा चांदण्यामधे नाही पाखरू ॥ध्रु॥

स्वच्छ आज प्राणसखे केले स्नानगे ॥

शुद्ध सेज केली लाउन पंचप्राण गे ॥

सद्धटाव पाहुन हरली भूकताहान गे ॥

खुल्या चांदण्यामधे एकली फिरू ॥१॥

शशीप्रती प्रार्थना करित बरे ॥

तेज तुझे पाहुन माझा प्राण घाबरे ॥

दया करिल प्राणसखा भेटवाल त्वरे ॥

गच्चीवरून उडी टाकीन कशास्तव ठरू ॥२॥

वाट पाहु पाहु नेत्र श्रमले आता ॥

मायबहिणी जवळ नाही आणिक हा पिता ॥

दुःख कोणा सांगू आता जन्म की वृथा ॥

गिरीकंदरी भटकत फिरू ॥३॥

दिडप्रहर रात्र झाली तेरावी घडी ॥

सखा उठून पाहती द्वारि छबेला गडी ॥

उपचारे घेऊन गेले मंचकावरी ॥

छंद नव्हे फंद सगनभाऊला स्मरून ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP