मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
भगवंतम्हणेनामयासी ॥ तूयथ...

अभंग ६५ - भगवंतम्हणेनामयासी ॥ तूयथ...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


भगवंतम्हणेनामयासी ॥ तूयथार्थबोलिलासि ॥ क्षणक्षणाआठवमानसी ॥ नपडेविसरमजसी ॥१॥

आवडीभक्तीज्ञानवीतरागी ॥ ज्ञानदेवयुगायुगी ॥ नदेखेसकळब्रह्मांडजगी ॥ मजलागीखंतीवाटे ॥२॥

उद्धवचरणावरीठेवुनीमाथा ॥ एकविनंतीपरिसावीजगन्नाथा ॥ तुज अंतरीचेसांगसमर्था ॥ कृपावंतास्वामिया ॥३॥

निवृत्तीज्ञानदेवसोपानासी ॥ तिघाबैसविलेसमाधीसी ॥ मुक्ताबाईचीस्थितीकैसी ॥ तीसांगावी ॥४॥

म्हणेविठोजीतूकायनेणसी ॥ प्रीतीकरूनिआम्हापुससी ॥ तरीऐकास्तुतीह्रषीकेशी ॥ ऐसेउघडतुजसीबोलतो ॥५॥

निवृत्तीचाकर अभयशिरी ॥ सत्यसनातननिर्धारी ॥ महाकल्पाच्याअंतावरी ॥ देह अवसरीठेविला ॥६॥

तववरीबाईचेशरीर ॥ चिरकाळनिरंतर ॥ मुक्ताबाईब्रह्मणीसाचार ॥ जाणनिर्विकार उद्धवा ॥७॥

देवगणबैसवूनीविमाना ॥ गेलेआपुलियाभुवना ॥ सकळमाहामुनिस्थाना ॥ हरिचरणावंदोनी ॥८॥

म्हणतीसर्वभाग्यकेव्हडे ॥ जिहीकेलेब्रह्मांड उघडे ॥ संवत्सरगावीवाडेकोडे ॥ देखिलेरोकडेसकळी ॥९॥

निवृत्तिनाथपायाळपूर्ण ॥ ज्ञानदेवज्ञानांजन ॥ सोपानदेवब्रह्मजाणोन ॥ जिहीनिधानजोडले ॥१०॥

शुद्धभक्तिभावज्ञान ॥ जोडिलाविठोबानिदान ॥ तेथींचेविभागीसंपूर्ण ॥ प्रेमजीवनवोसंडत ॥११॥

वैष्णवमहंतासीकुरवंडी ॥ मुक्ताबाईओवाळूनसांडी ॥ सद्भाव उभारिलीगुढी ॥ आनंदपरवडीनाचती ॥१२॥

नामाम्हणेपंढरीसी ॥ स्वामीचालिलेशीघ्रगतीसी ॥ सवेभक्तमांदीसरसी ॥ नामवाचेसीगर्जती ॥१३॥

ऐसेयाचेचरित्रजोआवडीऐके ॥ तोयाभक्ताबरोबरीतुके ॥ भोगीवैकुंठनिजसुख ॥ स्वयंसुखबोलली ॥१॥

धन्यधन्यतोपुंडलीकभक्त ॥ जयाकारणेहरीतिष्ठत ॥ ऐसे पवाडेगर्जत ॥ जगतारितनामेकरुनी ॥२॥

जन्मोजन्मीसभाग्यहोती ॥ तयालागीनिजपदप्राप्ती कदाकाळीपुनरावृत्ती ॥ नयेमागुतीसंसारी ॥३॥

नामाम्हणेनामस्मरण ॥ तुटतीप्रपंचधरणबंधन ॥ सुखापावतीनिधान ॥ समचरणदेखिलिया ॥४॥

॥समाप्त॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP