मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
ऐसेपरिसलेविठ्ठले ॥ तवरुक...

अभंग २१ - ऐसेपरिसलेविठ्ठले ॥ तवरुक...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


ऐसेपरिसलेविठ्ठले ॥ तवरुक्मिणीनेविनविले ॥ याचेकरीजोजेम्हणितले ॥ हाकारिजेपुंडरीक ॥१॥

धन्यधन्यधरातळी ॥ जायालोकालोकवनमाळी ॥ वैष्णवीपिटिलीटाळी ॥ जयजयशब्देकरूनिया ॥२॥

गरुडासीसांगेकेशव ॥ कैसायासीभेटेलज्ञानदेव ॥ पुंडरीकासीजाउनीसर्व ॥ वृत्तांतसांगेयेथींचा ॥३॥

तेणेनमस्कारूनिहरी ॥ निघालापक्षाच्याफडत्कारी ॥ भेटलापुंडरीकाझडकरी ॥ यथाविधीसांगीतले ॥४॥

पुंडरीकविस्मितचित्ती ॥ म्हणेधन्यधन्यज्ञानमूर्ति ॥ ज्याकारणेवैकुंठपती ॥ अलंकापुरीसगेले ॥५॥

धन्यधन्यविठोबाचे चरण ॥ धन्यधन्यमाझेनयन ॥ धन्यनामाऋषीसंपन्न ॥ विभक्तसखामाझा ॥६॥

मगगरुडासीपुसिले ॥ ज्ञानदेवाहाकारिले ॥ दिव्यविमानीबैसविले ॥ चलाम्हणितलेअळंकापुरीसी ॥७॥

नामाअसेखेदकरित ॥ केशवतयाससंबोखित ॥ तुम्हादोघांचाएकांत ॥ माझेनिसंगेपुरेल ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP