मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
मगसकळप्रेमपुतळे ॥ बैसलेम...

अभंग ७ - मगसकळप्रेमपुतळे ॥ बैसलेम...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


मगसकळप्रेमपुतळे ॥ बैसलेमाजीब्रह्ममेळे ॥ तेथे नामावचनबोले ॥ स्वामीप्रती ॥१॥

वोळले चैतन्यसतरावे ॥ पूर्णनामवोघविठ्ठलेदेवे ॥ पव्हेघालुनिज्ञानदेवे ॥ जडतारिलेकीर्तने ॥२॥

नामा म्हणेस्वामीसर्वज्ञ ॥ परीआमुचेनमनिमग्न ॥ चरणरजेपापभग्न ॥ पवित्रजाहले ॥३॥

तरीस्वामीराजा विनंती ॥ परियेसींगामाझीपुढती ॥ अळंकापुरी होती ॥ कवणीयेयुगी ॥४ ॥

हेसांगिजेजीसमर्था ॥ कवणक्षेत्रकवणतीर्था ॥ येथेक्षेत्रज्ञहासर्वथा ॥ कवणधर्मअसे ॥५॥

तूआत्मारामसंपन्न ॥ जुनाट नारायण ॥ तुजप्रतीहेवचन ॥ नसाहेमाझे ॥६॥

कासवीचातुषारगाढा ॥ तैसातुझापवाडा ॥ हे पुसणेकोणचाडा ॥ तेतूचजाणसी ॥७॥

नामा उभातिष्ठतप्रेमे ॥ संतदाटलेसप्रेमे ॥ तेतेअनुक्रमे ॥ देवसांगतसे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP