मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सा...

अभंग ६२ - पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सा...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सांगीतलीसेअवधारी ॥ मगशेषाद्रीपर्वतावरी ॥ गरुडशिखरीउभाअसे ॥१॥

धन्यधन्यहासोपान ॥ धन्यसमाधीसंपूर्ण ॥ प्रत्यक्षयेउनीनारायण ॥ अभयदानदीधलेसे ॥२॥

अनंतवैष्णवप्रेमळ ॥ दिंडीपताकाटाळघोळ ॥ रामकृष्णनामसरळ ॥ भक्तसर्वकाळनाचती ॥३॥

दिव्यविमान उतरले ॥ देववर्षतीसुमने ॥ इंद्रचंद्रदेवगण ॥ लोटांगणेघालिती ॥४॥

समाधिसुखाचाआनंद ॥ आंगेकरीतसेगोविंद ॥ कथासांगितलीअभेद ॥ श्रोतेसन्निधसकळी ॥५॥

म्हणतीधन्यहासोपान ॥ दैवीपुरुषचतुरानन ॥ संतमहंतवैष्णवप्रमाण ॥ रामकृष्णगाताती ॥६॥

नामाम्हणेदेवराव ॥ मनोरथपूर्णकरूनसर्व ॥ अपारगुणकीर्तिलाघव ॥ नकळेमावकोणासी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP