मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
वासुदेव - कर जोडोनि विनवितो तुम्हां...

भारुड - वासुदेव - कर जोडोनि विनवितो तुम्हां...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


कर जोडोनि विनवितो तुम्हां । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ।

नको गुंतू विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१॥

नरदेह दुर्लभ जाणा । शतवर्षांची गणना ।

त्यामध्ये दु:ख यातना । तुम्ही आठवा मधुसूदना ॥२॥

नलगे तीर्थांचे भ्रमण । नलगे दंडण मुंडण ।

नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदना ॥३॥

हेचि माझी विनवणी । जोडितो कर दोन्ही ।

शरण एका जनार्दनी । तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी ॥४॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP