TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
महारीण - स्वामीनीं मजवर पूर्ण कृपा...

भारुड - महारीण - स्वामीनीं मजवर पूर्ण कृपा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - महारीण

स्वामीनीं मजवर पूर्ण कृपा केली । पंच हजार दौलत दिधली । म्हणोनि कायापुरीं वस्ती केली । प्रिया राणी भेटली की जी मायबाप ॥ १ ॥

प्रिया महाराणी मीच महारीण । सकळ जमेदार माझे आधीन । माझेपुढें न चले कवणाचें वचन । धर्म नगरीचे लोक गांजिले की जी मायबाप ॥ २ ॥

माझेमुळें मसुदी मातले । नाईकवाडे लावालाव करूं लागले । शेटे महाजन उन्मत्त जाहले । मेहेत्र्यानें जन गांजिले । आत्म्यांत की जी मायबाप ॥ ३ ॥

केसापुरचे लोक सांडिली उरी । बागाईत जिराईत नाहीं काळीवरी । उरली पांढरी सांगावी की जी मायबाप ॥ ४ ॥

नयिनाबाजीची दृष्टी गेली । येतां जातां भ्रमिष्ट झाली । भय हाकिमाचे की जी मायबाप ॥ ५ ॥

नाकेगांव धाकेच पळालें । तोंडापूर लबलबा करू लागलें । बत्तीस शिरांचे लोक पळाले । कसाड बाजार झाला की जी मायबाप ॥ ६ ॥

मग बहु बळ हातगांवींचे । पाठ पोट उदरा गतींचें । मग तेथे खाणें दिजे दिवाळ हाकिमाचें । निघूं पाहे की जी मायबाप ॥ ७ ॥

शिष्टणापूरचे लोक फळफळां मुतूं लागले । मुर्चुदाबादेचें सुख सांडलें । अखंड खिडकी मोकळी पडली उठूं पळूं लागले । धीर धरवेना की जी मायबाप ॥ ८ ॥

मांडवगड चढावयाची शक्ति राहिली । ढोंगळापुरचीं मेटे बसलीं । चरण गांवींची चाल राहिली की जी मायबाप ॥ ९ ॥

आतां दया करी गुरुराया । एका जनार्दनीं लागे पायां । पतनाजातील लया । तुझे कृपेंकरून की जी मायबाप ॥ १० ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:55.9900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रग

  • स्त्री. 
  • इंगा ; नांगा . 
  • ईर्षा ; मिजास ; मस्ती ; जोर ; गुर्मी ; ताठा ; मग्रुरी . मराठ्यांची रग जिरविल्याशिवाय तें गप्प बसावयाचे नाहींत . ( क्रि० धरणें ; बाळगणें ; येणें ; मोडणें ; जिरविणें ) 
  • उत्साह ; जोर ; सहनशक्ति . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.