मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
लग्न - एका जनार्दनाचे लग्नसिद्धी...

भारुड - लग्न - एका जनार्दनाचे लग्नसिद्धी...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

एका जनार्दनाचे लग्नसिद्धीसी । घटितार्थ पहावया मिनले चवदा । भुवनांचे ज्योति ज्योतिषी ॥ १ ॥

योग तोही एक तीथ तीहि एक । राशी तेंही एक नक्षत्र तेंही एक । सद्‍गुरुचरणीं एकाएक तोही जाला ॥ २ ॥

वर्ष तेंही एक मास तोही एक । बारा योगे पाहतां एकाएक जाले ॥ ३ ॥

घटिका तेहीं एक पळ तेहीं एक । शोधितां सूक्ष्म एका एकचि जाले ॥ ४ ॥

पहातां जनीं जनार्दनीं उभविली गुढी ॥ ५ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP