TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । महार...

भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । महार...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - जोहार

जोहार मायबाप जोहार । महार मी कायापुरीचा । जन्मोजन्मीं वेसराख्या । आहे या गांवीचा ॥ध्रु०॥

कायापूर कसबे लांबी साडे तीन गांव । तीनशें साठ पेठा तेथें नांदतो उमराव ।

चौदा चौक दहा रस्ते बसविले अपूर्व । दिधली धन्यानें सनद जिवाजीपंताचे नांवें ॥ १ ॥

शिवाजीपंतानें जिवाजी ठेविला दिवाण । सहा षड्‌विकार मिळाले त्यासमान ।

तुम्ही सर्व ऐका तुम्हांसी सांगतों खूण । आपआपणा मधीं मिळुनी खाती भोंदून ॥ २ ॥

कामाजी कोतवाल यानें नागविलें बहुतांशीं । हरिहरांची अब्रू घेतो भय नाही त्यासी ।

जमदग्नी दुर्वास नाडिले महा महा ऋषी । क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यांसी ॥ ३ ॥

लोभाजी चौधरी याला पैशाची हांव । अहंकार पाटील त्यांसी कांपतो सर्व गांव ।

दंभाजी नाईक सर्व करिती हावहाव । दया नाहीं रयतेवर केला उजाडचि गांव ॥ ४ ॥

जिवाजीपंतास हिशोबा द्या अवघा झाडा । नाहीं तर त्याचें पायीं घाला अनुहात खोडा ।

तरीच मायबाप हा गांव नांदेल बरा । एका जनार्दनीं पाय सद्‍गुरूचे धरा ॥ ५ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:39.8970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लखोटा-लखोटा फुटणें

  • लखोटयांत पत्र असतें. तेव्हां बंद लखोटा फोडल्यावर आंतील बातमी कळते. यावरुन ज्ञात होणें 
  • स्पष्ट होणें. ‘ माझ्या भावी आयुष्यक्रमाचा लखोटा अजून फुटावयाचा आहे ! ’ -उग्र १.१. 
RANDOM WORD

Did you know?

देवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site