मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
कोडें - कृष्णा नवल कैसी परी । तूं...

भारुड - कोडें - कृष्णा नवल कैसी परी । तूं...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

कृष्णा नवल कैसी परी । तूं आत्मा एक चराचरीं । तेथें द्वेषेंसी कवणा हरी । कैसे मारिले दैत्य त्वां वैरी ॥१ ॥

कान्होबा सांग पां माझें कोडें । तुझें पुसतों तुझिया पुढें ॥ध्रु०॥

देहीं नख शिख अवघें एक । देहा रुतती नखें तीख । त्याच्या छेदनीं आम्हां सुख । तैसे मारिले अधर्मी देख ॥ २ ॥

तुज भेद नाहीं नरनारी । कैसे सोळा सहस्त्र तुझिया घरीं । तूं म्हणविसी बाळब्रह्मचारी । शेखीं जालासी कां परद्वारीं ॥ ३ ॥

हेम मृत्तिकेच्या घट श्रेणी । आंत भरलें निर्मळ पाणी । त्यांत बिंबोनि अलिप्त तरणी । तैशा भोगुनी बहु कामिनी ॥ ४ ॥

जग अवघें तुझिया कुशीं । रसना अंकित नव्हे म्हणविसी । रसस्वाद जाणें ज्ञानरासी ॥ ६ ॥

एका जनार्दनीं घेतिला थाया । तो संकल्पाची न ये आया । तेथें हारपली माझी माया । देहीं देहपण गेलें विलया ॥ ७ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP