मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
होळी - देहचतुष्ट्याची रचोनि होळी...

भारुड - होळी - देहचतुष्ट्याची रचोनि होळी...

भारुड - होळी


देहचतुष्ट्याची रचोनि होळी ।ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी ॥ १ ॥
अझुनि का उगवलाची । बोंब पडू दे नामाची ॥ २ ॥
मांदी मेळवा संतांची । तुम्ही साची सोडवण्या ॥ ३ ॥
धावण्या धावती संत अन्तरंग ।संसार शिमगा सांग निरसती ॥ ४ ॥
एका जनार्दनी मारली बोंब । जन वन स्वयंभ एक झाले ॥ ५ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP