मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
धांवा - गांजितां प्रल्हादु । तुझा...

भारुड - धांवा - गांजितां प्रल्हादु । तुझा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

गांजितां प्रल्हादु । तुझा घेतला छंदु । त्याचा निरसिला बाधु । तैसा पावे तूं सन्निधु ॥ १ ॥

वेगीं येवो मुकुंदा । धांवे पावे गोविंदा । करी घेऊनियां गदा । छेदी सकाम बाधा ॥ २ ॥

दावाग्नी गोपाळ । वेढिले सकळ । ते त्वां गिळियेले ज्वाळ । तैसा पावे तात्काळ ॥ ३ ॥

गरुडा सांडोनी मागें । उडी घातली श्रीरंगें । गज उद्धरिला अंगें । तैसा पावे लागवेगें ॥ ४ ॥

दुर्वास भोजनीं । आला रात्रीं माध्यानीं । धर्मशापाची बाधणी । निरसली भेटी देउनि ॥ ५ ॥

भवभय अद्‍भुत । नामस्मरणे निरसे सत्य । एका जनार्दनीं प्रतीत । आम्हां नामस्मरणें ॥ ६ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP