TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
कोल्हाटीण - आनंदी सद्‍गुरु पूर्ण परात...

भारुड - कोल्हाटीण - आनंदी सद्‍गुरु पूर्ण परात...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - कोल्हाटीण

आनंदी सद्‍गुरु पूर्ण परात्पर अभेद नमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठाव तेणें मज दाखविला ज्ञानांजन घालूनि प्रवृत्ति मार्ग खुंटविला । पूर्ण बोध पाठविला ॥ १ ॥

कोल्हाटीण झाले बाई मी कोल्हाटीण झाले ॥ध्रु०॥

प्रवृत्तीचे वस्त्र फेडुनी सुखा सुखी रिझलें । परात्पर पर पुरुष पाहूनि त्यापाशीं मी गेलें । अंग संगती करून त्याचें सुख म्यां हरविलें । अधरामृत म्या सेविलें । कोल्हाटीण झालें ॥ २ ॥

आशा मनशा तृष्णा ह्या तिन्ही मेळविल्या रांडा । भाव चोहटा वेळू तेथें लावियेला झेंडा । करून उलट प्राणाचा क्रोध तो मारिला मेंढा । ब्रह्मरंध्री मिसळलें आला अमृत लोंढा । मग तो अहंकार मेंगा त्यांनी या भुलविलें सोंगा ॥ को० ॥ ३ ॥

मागें सारून कामें मारिली उफराटी उडी । भ्रांति लुगडें फिटुनि गेलें काया झाली उघडी । पूर्ण अनुभव कळुनी त्यासी मांडिली फुगडी । मदन मोहना दादुला घेउन झाले ते हिजडी ॥को०॥ ४ ॥

परद्वार म्यां केलें जन्मसार्थक झालें । पंचवीस दादुले हातीं धरुनी उठविले । अंतरगृह सावलींत येऊनि निश्चळ बैसलें । एका जनार्दनीं एकी एकपण मुरालें । जन्मजरामरण हरलें ॥को०॥ ५ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:10.8200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो

  • आईबापांच्या हाती फक्त जन्म देण्याचे आहे, पण मनुष्‍याची कर्तबगारी त्‍याचे स्‍वतःवर अवलंबून आहे. जन्म दैवाधीन० पहा. 
RANDOM WORD

Did you know?

Is there any reference in Vedas or puranas for eating non-veg food?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.