मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । मी क...

भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । मी क...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

जोहार मायबाप जोहार । मी कसबे कायापुरीचा महार । या गांवचा कारभार उठावणीस आणिला की जी मायबाप ॥ १ ॥

कसबे कायापुर शहर । शंभर खेडें दहा बाजार । परि या अहंकार पाटलाचा कारभार । कांहीं धड नाहीं की० ॥ २ ॥

मनाजीपंत कुळकर्णी गिरस्त । कामक्रोध देसाई जबरदस्त । धन्यासी पोंचत नाही रस्त । मधींच वस्त लुटिती की० ॥ ३ ॥

बुधाई आवा पाटलीण जरा । देती टाकडा टुकडा चारा चुरा । परि या म्हातारीच्या कारभारा । कोण मानितो की० ॥ ४ ॥

एक धनी नाहीं मेले । जागोजागीं तकूब जाहले । भ्रमाजीबावा घाईस आले । कुडवाड रस्ते की० ॥ ५ ॥

हरीपंतानें कौल द्यावा । शिवाजी बाजीनें लुटून न्यावा । यमाजी कोतवाल यांनीं दंड द्यावा की० ॥ ६ ॥

म्हणोनी मच्छराव कूर्मराव आले । वर्‍हाबाजी दडाले । धरत्री बुडती की० ॥ ७ ॥

नरसोबापा तापाड । हिरण्यकश्यपा दिधली थोबाड । वामनोजी बुवा लहान वाड । परी थोरासी न गणिती की० ॥ ८ ॥

परसोजी बुवा रागांत शिरले । एकवीस वेळां क्षेत्र मारिले । अखेर अमोद विघ्न बसविलें । रामाजी घुसले जग फिरूं की० ॥ ९ ॥

कृष्णाजीपंत कारकून भले । ते बायकामुलानींच भुलविले । ख्याल तमाशे फार केले । अखेर आमदाणींतच गेले की० ॥ १० ॥

बौधाजीबुवा जंगली राजा । कलंकोजी बुवाचा मोठा आवाजा । त्यानें घोडा केला ताजा । फिराद दुरदुर केली की० ॥ ११ ॥

मनीजीपंत ठाणेदार जाड । मुलुख अवघा केला उजाड । दाही पेट्यांचा बाजार जड । उच्यापतीखालीं बेजार केला की० ॥ १२ ॥

चरणपेट्यांची हाल पैल मोडली । सुराबाजीची चऊ उडाली । कर्णपुरी बधीर झाली । मार मारुनी की० ॥ १४ ॥

शेसफुल खालवले राट । मांड्यापुरास घासन दाट । लिंगपेटा भनभनाट । बोचरा केला की० ॥ १५ ॥

टेरीवाडी टांचापूर । एके ठायीं न होती दूर । आतां गांडापुरानें टाराटूर । करोनी काय होते की० ॥ १६ ॥

दाढापुर बत्तीस पेट । कटकटीमुळें उपटलें बेट । गांव नाशापूर हनुवट । खलबता पळाव्या करीत की० ॥ १७ ॥

कंबर बाजीस दाटी भारी । हलकल्लोळ बकापुरी । तळांत गांव टेक न धरी । कामीटगांव कमजोर झालें की० ॥ १८ ॥

सर्वांगनें केली पळती । आपान पेट्यास पडली वोढनी । धुरळे उडती की० ॥ १९ ॥

फारदापूरक निट पेट । टेक वाट झाली सपाट । गुडघापूर कोपरगांव नीट । कुठवर सोसेल की० ॥ २० ॥

वाटवोडी हालवली देठ । नागीन पेट्याचे उकललें बेट । कंठ सरोवर राट । कांपे थरथरा की० ॥ २१ ॥

जीवन झरीस पडली आट । वांचे गांवचें उकललें बेट । चांदपूर तीन वाट । पळावया खलबत करीत की० ॥ २२ ॥

येथें वसूल बाकींत राहिलें काय । हिशोबाचा नाहीं ठाय । जिवाजीपंतानें पसरले पाय । मज नफरासी बोल नाहीं की० ॥ २३ ॥

एका जनार्दनीं जोहार । मी धन्याचा राबता महार । झाडीन साहेबाचा दरबार । निवालों खाऊन की जी मायबाप ॥ २४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP