मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री तुलसीदास चरित्र २

श्री तुलसीदास चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ ओवी ॥
शय्यासनी पाहून रमणी । मोद झाला तदीय मनीं ॥
मुखास मुख लावूनी । चुंबन घ्याया सरसावला ॥२१॥
बायको जागी झाली व निषेध-प्रदर्शक मुद्रेनें म्हणाली.

॥ पद ॥
बिलकुल तमने छोडि शरम ये नै थै सारी बात ॥ पियारे- ॥
मुतर-वानू पातर आछू वह है क्यो चहाते दिनरात ॥
(चाल)- छी! छी! छी!, थू! थू! थू!, ना सारी, रित तारी ।
नाख्यो जमाना रतिमा अमथा कछु नहि आखर हात ॥२२॥

॥ पद ॥
हड्डी, चमडा, मांस, रूधिरकी तन मेरी करो ख्याल ।
मै मट्टीकी पुतली छोडो सखा करो जगपाल ॥
बार बार नहि आवे नरतनु भजो जानकीनाथ ।
ऐसा जो तुम नही करे तो, काल करेगा घात ॥२३॥
हे बायकोचे शब्द ऐकून तुलसीदासाला उपरति झाली व आपली या विषयाच्या नादाने केवढी भयंकर चूक झाली आहे, हे त्यांस कळून आले.

॥ पद ॥
करूं काय हाय श्रीरामा! हें आयु व्यर्थचि गेलें ॥
सोडुनी तुला सुखधामा! मन माझे विषयी रतलें ॥
(चाल) सोडवी कोण मज आतां । तुजवाचूनि भविं रघुनाथा! ।
ना तुजसम जगिं कुणि त्राता ॥ पाहिजे अतां उध्दरिले ॥२४॥

॥ आर्या ॥
गृह, धन दारा, त्यजुनी गेला तप आचरावया तुलसी ।
सिंहाचा तो छावा शेळ्यांसंगे न राहि गोठयासी ॥२५॥
तुलसीदास वनांत तप करण्यास निघून गेले. तेथे,

॥ ओवी ॥
शौचविधीचे उर्वरित । जें राही उदक पात्रांत ॥
तें प्रत्यही एका वृक्षाप्रत । घालीत होते श्रीतुलसी ॥२६॥
त्या उर्वरित पाण्याने

॥ दिंडी ॥
तया वृक्षातलिं भूत एक होतें । तुष्टले तें सेवूनि त्या जलातें ॥
विरुप तनु ती सिंदूर भालभागा । नमुन बोले तुलसीस काहिं मागा ॥२७॥

॥ लावणी ॥
पाहून तया भूताला । मनिं खिन्न तुलसि जाहले ।
हें काय तपश्चर्येंचे । फल मशीं राघवा! दिले ॥
(चाल) आम्रार्थ आम्रा लाविला, परी त्याजला, कडू भोपळा ॥
फळ हे आलें । विपरीत बहुत जाहलें ॥
मोक्तीक लाभ व्ह्यायला । सागरी बुडी मारिली ॥
परि दैव साह्य तें नाहीं । हातास शिंप लागली ॥
(चाल) तसैच आज जाहलें, राम ना आले, भूत प्रगटलें ॥
अहा हत दैवा! भेटेल ताम केधवां ॥२८॥
है ऐकून भूत म्हणाले,

॥ ओवी ॥
भूत भविष्य वर्तमान । जाणतो अमुचा पिशाच्चगण ।
सांगतो युक्ति तुजलागून । जेणें राम भेटले कीं ॥२९॥

॥ दिंडी ॥
पुराणासी श्रीराम मंदिरात । प्रत्यहीं तो येतसे हनुमंत ॥
वेष घेउनिया वृध्द ब्राम्हणाचा । आधि येऊंन मागुती जाय साचा ॥३०॥

॥ श्लोक ॥
शरण त्वरित जा तूं त्यास जोडून हात ।
तुजसी रघुपतीला, भेटवी तो क्षणांत ॥
दशरथ तनयासी, प्रीय त्यावीण काहीं ।
जगतितलिं सुजाणा राहिलें जाण नाहीं ॥३१॥
तें ऐकून तुलसीदास दुसरे दिवशी पुराणास राममंदिरात गेले व भुताने सांगितलेल्या खुणावरून मारुतीस म्हणाले,

॥ पद ॥
कपिवरा, तुम्हा नच वरा, वेष हा खरा, सोंग दिसतें ।
खरी हिरकणी कुठें न लपते । हो, हनुमान ॥
हनुमान, प्रभुचे प्राण, आपण गुणवान, असें असतां ।
जगीं कां वृथा लपुन राहतां । हो, ना कळे ॥३२॥

॥ पद ॥
सीता शुध्दि कियी इसलिये बुढ्ढे हो गये क्या? ॥
द्रोणागिरीकू लाये इसलिये बुढ्ढे हो गये क्या? ॥
अहीमहीकू मारे इसलिये बुढ्ढे हो गये क्या? ॥
वा रामचरनकी सेवा कर बुढ्ढे हो गये क्या? ॥३३॥

॥ लावणी ॥
हनुमान वज्र देही की । आलि कुठून जरा आपणा ।
कासोटा लांब घातिला । पुच्छाचि मोडुनिया खुणा ।
(चाल) ज्या करांत द्रोणगिरी, घेउन अंबरी, मारुतापरी ।
आपण गेलात । आतां गमन काठी टेकित ॥३४॥

॥ श्लोक ॥
नमो वज्रदेही नमो हनुमंता । नमो वानरेशा नमो रामदूता ॥
नमो रूद्ररूपा नमो वायसूता । त्यजा ओखट्या वृध्दरूपास आतां ॥३५॥
मारूती प्रगट झालें पाहून तुलसीदास त्यांस म्हणाले, हे हनुमान!
मला राम दाखीव, मारुती म्हणाला, बरें आहे. मी उद्या तुला राम दाखवीन. तूं या रस्त्यावर येऊन बैस. इकडे रामारायाने बादशहाचा वेष घेतला व आपल्या सर्व सैन्यासह तुलसीदास जिकडे बसले होते, तिकडून ते जाऊं लागले.

॥ पद ॥
बादशहा दाशरथी राम जाहला ।
अंबारित बैसुनिया जाउं लागला ॥
(चाल) शेरवाणी मखमलिची अंगि घातली ।
हनुवटीस लांब दाढि बहुत शोभली ।
गुडगुडिची सटक सव्य हातिं घेतली ॥
‘ वानर ते अरब रीस झाले रोहिले ।
रक्तमुखी माकडां पठाण बनविले ।
मौलविच्या वेषा सौमित्रें वरियेलें ।
ज्ञानरवि मुनि वसिष्ठ काजि शोभला! ॥३६॥
या स्वारीने तुलसीदासाचे समाधान झाले नाही. तो मारुतीस म्हणाला, मला

॥ साकी ॥
दशरथजीके नंदन जिनकूं अस्तुरि जानकि माता ।
कौसल्याके पूत दयाघन, लछमनजीके भ्राता ॥
जोरत मै हूं हात । दिखावो धनुकधारि रघुनाथ ॥३७॥
याशिवाय कोणत्याहि रूपाने मला रामदर्शन नको आहे. ते ऐकून मारूती म्हणाला; अरे!

॥ आर्या ॥
तूं वाल्मिक पूर्वीचा तुझिया भेटीस आजपर्यंत ।
वृध्दाच्या वेषाने केलें वास्तव्य मृत्युलोकांत ॥३८॥
म्हणून तुला हा बादशहा कोण झाला, हे कळावयास पाहिजे होते. बरें असो. आतां तुला मी राम भेटवितो! हे बघ,

॥ श्लोक ॥
रघुवरा प्रभु जानकिजीवना! तुलासिसी झणिं द्या पद-दर्शना ।
म्हणुन मी करितों विनति भली । असशि तूं दुबळ्याप्रति माउलि ॥३९॥
अशी प्रार्थना मारूती करताच, राम प्रगट झाले. तें पाहून तुलसीदासास
फार आनंद झाला.

॥ पद ॥
कृपा करो रघुनाथ तुमारे पदपे नमाऊं सीर ॥
जनम लियोने पुनित कियो है अपने शरयु तीर ॥
शिवशंकर के प्रचंड धनुकू तुमने गून चढाया ।
निज शक्तिका प्रभाव रामा! बचपनमें बतलाया ॥
वधी त्राटिका चरणस्पर्शसे कियो अहिल्योध्दार ।
भक्तन-खातर नृपासिंगासन छोडदोयो घरदार ॥
आगे आप बिचमे जानकी पीछे लछमन भाई ।
तारे शवरी दंडक-बनमो जहां बहे गोदामाई ॥
पंपापे हनुमान मिले है बंदरकू नहि पार ।
जलाइ लंका सहपरिवारें कीयों रावण ठार ॥
सूर्यवंशी सम्राट प्रभो तुम सब भूपनके राजा ।
भरत लछ्मन चौरी उडावत आगे कपिकी फौजा ॥
पुरी अयोध्या धरी विमानी ऐसौ तुम दिलदार ।
दासगणु कहे करो सितपति मुझकूं भवनदी पार ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP