मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने| श्री कबीर चरित्र १ श्री दासगणु महाराजांची आख्याने श्रीनरहरि अवतार श्रीनरहरि अवतार ( संक्षिप्त ) श्रीवामन अवतार श्रीवामन अवतार ( संक्षिप्त ) श्री परशुरामावतार श्रीरामजन्माख्यान श्रीहनुमानसेवा १ श्रीहनुमानसेवा २ श्री कृष्ण लीला १ श्री कृष्ण लीला २ हरण १ हरण २ हरण ३ गर्वहरण १ गर्वहरण २ जन्म - कथा १ जन्म - कथा २ चरित्र १ चरित्र २ जन्म - चरित्र श्रीमल्हारी अवतार चरित्र १ चरित्र २ चरित्र ३ चरित्र १ चरित्र २ चरित्र ३ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र १ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र २ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ३ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ४ श्रीजालंदरनाथ चरित्र १ श्रीजालंदरनाथ चरित्र २ चरित्र १ चरित्र २ चरित्र ३ चरित्र ४ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र २ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र १ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र २ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ३ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ५ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ६ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ७ श्रीसांवतामाळी चरित्र १ श्रीसांवतामाळी चरित्र २ श्री भक्त गोराकुंभार चरित्र १ श्री भक्त गोराकुंभार चरित्र २ श्री संत जनाबाईचें चरित्र १ श्री संत जनाबाईचें चरित्र २ श्रीनरहरी सोनार चरित्र १ श्रीनरहरी सोनार चरित्र २ श्री माणकोजी बोधले चरित्र १ श्री माणकोजी बोधले चरित्र २ श्री माणकोजी बोधले चरित्र ३ श्री माणकोजी बोधले चरित्र ४ श्री कबीर चरित्र १ श्री कबीर चरित्र २ श्री कबीर चरित्र ३ श्री कबीर चरित्र ४ श्रीलाखाभक्त चरित्र १ श्रीलाखाभक्त चरित्र २ श्रीलाखाभक्त चरित्र ३ श्रीरोहिदास चरित्र १ श्रीरोहिदास चरित्र २ श्रीरोहिदास चरित्र ३ श्रीरोहिदास चरित्र ४ श्रीसंत सेना न्हावी चरित्र १ श्रीसंत सेना न्हावी चरित्र २ श्रीसंत सेना न्हावी चरित्र ३ श्रीसंत सेना न्हावी चरित्र ४ कान्होपात्रा आख्यान १ कान्होपात्रा आख्यान २ कान्होपात्रा आख्यान ३ कान्होपात्रा आख्यान ४ श्री संत दामाजी चरित्र १ श्री संत दामाजी चरित्र २ श्री तुलसीदास चरित्र १ श्री तुलसीदास चरित्र २ श्री तुलसीदास चरित्र ३ श्री तुलसीदास चरित्र ४ श्री तुलसीदास चरित्र ५ श्री कबीर चरित्र १ श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे. Tags : akhyandasganusantआख्यानदासगणुसंत श्री कबीर चरित्र १ Translation - भाषांतर ( भाग पहिला ) ॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥महापुनित क्षेत्र तें कलियुगांत वाराणशी ।तिथें वसत तो शिरीं विलसतो जयाच्या शशी ॥अशा पुनित पट्टणीं यवनवंशिं जो जन्मला ।कबीर म्हणती तया बुधशिरोमणी जो भला ॥१॥॥ लावणी ॥ ( भला जन्म )कबीरसम ती कबीरकांता जोड न ज्या वधुवरां ।जडावाच्या कोंदणीं जैसा हिरा ॥शांत दांत नांदतीं उभयतां क्रोध न ये ज्यां जरा ।जोडिला रामसखा सोयरा ॥( चाल ) दारिद्र्य जयाला गांजित नानापरी ॥ना मूठपस जोंधळे जयाच्या घरीं ॥जेवण्या परळ मातीचि जला घागरी ॥ऐशी विपत्ती कुठवर वानूं थकली माझी गिरा ।कवन करि गणू सिनेच्या तिरा ॥२॥॥ पद ॥ ( धोंडे पुजिता का )कमाल नांवाचा । झाला पुत्र तयां साचा ॥सद्भक्तीची कमाल केली सागर ज्ञानाचा ॥कोश शांततेचा पुतळा प्रति वैराग्याचा ॥रसना रतली अक्षय नामीं ध्यास राघवाचा ॥३॥॥ आर्या ॥ऐसे त्रिवर्ग साधू अणिमागरिमादि जोडिती हात ।परि ना पर्वा ज्यां बा अधिदैवत राम जानकीनाथ ॥४॥॥ ओवी ॥मोमीनपणाचा व्यवहार । शेले विणीतसे कबीर ।मागीं बैसतां साचार । भजन करी रामाचें ॥५॥॥ श्लोक ॥ज्ञानेश, सोपान, निवृत्तिनाथ ।मुक्ता नि ते नामदेवादि भक्त ॥काशीप्रती पातले एक वेळा ।विश्वेश विश्वंभर वंदण्याला ॥६॥॥ पद ॥ ( नृपममता )घनदाट भरलि ती काशी । ना पडे संत दृष्टीसी । एकही ॥ना कुणी विचारी त्यासी । जन लुब्ध बाह्य रंगासी । सर्वही ॥( चाल ) ज्ञानेश, नाथ निवृत्ति उपाशीं फ़िरती, अचंबा करिती,बघुन जगतासि । पावला रविं अस्तासी ॥तेधवां॥७॥॥ ओवी ॥तैं निवृत्तिनाथांनीं । पाहिलें समाधि लावुनी ॥कीं या पुनीत पट्टणीं । कोण आहे हरिभक्त ॥८॥॥ अभंग ॥ऐसें कळलें तयांप्रत । येथें कबीर नामें भक्त ॥चला जाऊं त्याचे घरीं । सेवुं प्रेमाची भाकरी ॥जरी जातींचा यवन । परि आहे तो ब्राह्मण ॥गणु म्हणे जातगोत । पहाती ना भगवद्भक्त ॥९॥॥ श्लोक ॥कबीराश्रमीं संतमांदी मिळाली । तयांनीं मुखें गर्जना थोर केली ॥कबीरा ! अम्हां घालनें अन्न बापा ! । क्षुधेच्या झणीं वारि दु:सह्य तापा ॥॥ ओवी ॥कबिरें तें ऐकुन । केलें संतां साष्टांग नमन ।गृहामाजीं आणून । सन्मानेंसी बैसवीले ॥११॥घरांत येऊन कबीर बायकोस म्हणाले कीं -॥ दिंडी ॥शिधा संतांसी आज द्यावयातें । काय आहे गेहांत सांग कांते ! ॥वदे साध्वी ‘ कांहीं न गृहामाजीं । कशी राखिल श्रीराम लाज आजी ? ’ ॥॥ पद ( मित्रा मम जन्म ) ॥सोडुं नको धीर परी जोडितें करा ।जाउन मी येतें हाटीं गणूगंभिरा ॥उसनवार वा उधार आणितें शिधा ।संतसाधू यापरी न भेटती कदां ॥१३॥॥ आर्या ॥आज्ञा पतीची घेउन ती साध्वी शीघ्र पातली हाटीं ।रक्षण तिचें कराया परमात्मा धांवला तिच्या पाठीं ॥१४॥॥ अभंग ॥जाउनिया दुकानासी । सती बोले हो प्रेमेंसी ॥आठ दिवसांचा करार । मागे सामान उधार ॥वाणी बोले हें ना घडे । काय घेऊं तुमचें पुढें ? ॥तुम्ही भणंग भिकारी । जिते असून मेल्यापरी ॥१५॥॥ ओवी ॥परी पाहून तुजप्रती । दया उपजे मज चित्तीं ॥मान माझ्या वचनाप्रती । दिधल्या देईन शिधा मी ॥१६॥॥ लावणी ॥तूं सगुण सुरुप सुंदरी कुणाची ग तरी ।तुज पहातां ग मजला झाली, स्मरव्यथा हरी लौकरी ॥नाहीं गोठपाटल्या करीं तुझ्या गडे, जरी ॥किति गोंडस कर तव बाळे, नागीण जशीं का परी ॥तुज देतों पैठणी जरीबुट्याचि ग खरी ।हा टाकी घोंघडा वेडे ! तूं बांड नगरभिंगारी ॥एक रात्र मशीं रति करी पलंगावरी ॥मढवीन तुला सोन्यानें तूं धनिण येथली खरी ॥वाचेनें वदुन यापरी अतुर अंतरीं ।गेला होऊन वेडा वाणी, गणुदास कवन हें करी ॥१७॥॥ पद ॥ ( मित्र मम )ऐकुनिया वणिजवचन बोलली सती ।आणुं नको पाप असें बा कदां चित्तीं ॥या नादें नागवले लोक ना मित्ती ।नाहिं बरा विषयछंद सूज्ञ सांगती ॥१८॥॥ लावणी ॥नको सांगुस मज या कथा किं भाकड वृथा ।हा तरुणपणाचा वेडे ! न ये बहार पुन्हा मागुता ॥मी वृक्ष, माधवी लता होय तूं आतां ।मी चंद्र, रोहिणी तूं हे, ना करी अवज्ञा वृथा ॥म्हणे होय, मजसिया हंसुन पाहीं ना रुसून ॥शांतवूं पंचबाणाला, उभयतां पलंगीं बसून ॥दारिद्रयपंकिं या फ़सुन नको राहुं बसून ।तुज आली घडी ग सोन्याची, गमविं ना उगी ही रुसून ॥१९॥ N/A References : N/A Last Updated : August 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP