मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री कबीर चरित्र ३

श्री कबीर चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग दुसरा )

कमाल चरित्र

॥ आर्या ॥
अवतीर्ण कलिंत झाले जगदुद्धारार्थ श्रीशुकाचार्य ।
गंगेंत शुक्तिपुटकीं, म्हणति जगीं ज्या कबीर ते आर्य ॥१॥

॥ दिंडी ॥
कबिर जन्मापासून पूर्ण ज्ञानी । जशी साखर जन्मतां गोड जाणीं ॥
रवी येतां उदयास तयासंगें । प्रभा येई, राही न जशी मागें ॥२॥

॥ ओवी ॥
त्या ज्ञानरूपी पल्वलांत । कमाल नामें कमल सत्य ।
भक्ति - मकरंदासहीत । उदय पावतें जाहलें ॥३॥

॥ पद ॥
आलीं खेळाया मुलें तीं । आलीं खेळाया ॥
श्रीमंताचीं, बघुन पातला कमाल ते ठायां ॥
( चाल ) घ्या मला खेळण्या तुम्हि अपुल्या भीतरीं ॥
मी लहान वयानें आहें तुमच्यापरी ॥
एकट्या मला हो करमत नाहीं घरीं ॥
आलों धांवुनिया, म्हणुन हो, आलों धांवुनिया ।
इच्छा माझी पूर्ण करा मी लागतसें पायां ॥४॥
मुलें म्हणाली,

॥ कटिबंध ॥
नच मुला तुं आमुच्यापरी, कुठें तव शिरीं, टोपी भरजरी,
कडीं तीं करीं, सांग अम्हांला । आहे कुठें केशरी उटी तुझ्या अंगाला ॥
आहे कुठें कानिं चौकडा, चढावू जोडा, पायिं फ़ांकडा,
तसा बर तोडा, मुद्या त्या बोटीं । वा सूत अंगिं केल्यास वजा लंगोटी ॥
त्यांतून आहेस ओंगळ, अंगिं तव मळ, नको येउं बळं, आमुच्यामाजीं ।
शोभेल पायसाजवळ कशी वद कांजी ॥५॥
यावर कमाल म्हणाला -

॥ श्लोक ॥
हीं भूषणें खचित वेसण मीपणाचीं
पावाल हो तिजमुळें समता पशूंची ॥
त्यागा म्हणून झणीं वेसण ही मुलांने ! ।
ना व्हा द्विपाद पशु कीं तुम्हि बालकांनो ॥६॥

॥ पद ॥
नहीं इनोंसें काम । हमारा भूषण राजाराम ॥
रामही टोपी, राम अंगोठी, राम चौकडा भाई ।
रामनामकी उटीं बदनकू क्या आती खुष बोई ।
रामही रोटी लागत मिठ्ठी, राम पुलावा भाई ।
रामनामका प्याला पिलावे मुझकू कबीर साई ॥ वाहवा ॥
रामही दस्तर, रामही थाली, करे न किंमत कोई ।
रामनामका बडा दुशाला ओडनेकू है भाई ॥ ॥ वाहवा ॥
भक्तिहाटमें राम मिलत है, करो खरेदी कोई ।
दासगनु कहे देनेवाला बैठा कबीर साई ॥ वाहवा ॥७॥

॥ ओवी ॥
ऐकून कमालाचें भाषण । वैकुंठीं हंसला नारायण ।
धरणीधरें तें पाहून । प्रश्न केला प्रभूसी ॥८॥

॥ दिंडी ॥
जगन्नाथा, कां हास्य आज केलें । मनाजोगे असें काय घडून आलें ? ॥
सर्व अवतारीं हर्ष तुम्हां ऐसा । जाहलेला दिसला न श्रीनिवासा ॥९॥
यावर श्रीरामचंद्रप्रभू म्हणतात,

॥ आर्या ॥
द्वापार - कृत - त्रेतायुगीं माझे भक्त फ़ार जरि झाले ।
कलियुगिंच्या संतांनीं परि निज कृत्यें तयांस लाजविलें ॥१०॥
“ लक्ष्मणा ! तुला काय सांगूं ? मागें वेळोवेळीं माझे भक्त होऊन गेले. पण या कलियुगींच्या भक्तांनीं त्या सर्वांना खालीं पहाण्यास लावलें यांत संशय नाहीं.

॥ लावणी ॥ ( गेलिं मायपिता तीं )
दिधला तो श्रियाळें पुत्र आपुला मला ॥
ना अधिक त्यांत, सत्त्वास भूप जागला ॥
राज्याची धरुनिया आस आले शरण ।
सुग्रीव बंधु वालिचा नि बिभीषण ॥
मम भक्त म्हणून मिरविला जरी कीरटी ।
उपटिली सुभद्रा बहिण माझि धाकुटी ॥
( चाल ) मम संग घडावा म्हणुनि राधिका जाण । आलि शरण ।
मार्कंडेयें केलें चुकवाया आपुलें मरण । मम भजन ॥
मिळविलें बसाया ध्रुवें अचलसें स्थान । मजपून ॥
त्या भक्तिरूप सरितेस कलिंत लोटला ।
निष्काम अहेतुक प्रेमपूर तो भला ॥११॥
श्रीमंतांची मुलें कमालाचें भाषण ऐकून म्हणाली,

॥ दिंडी ॥
द्राक्षें आंबट म्हणुनिया जाय कोल्हा । शिखंडीनें निंदावें पद्मिनीला ॥
तसें वैभव वाटतें भिकार्‍यासी । तुच्छ साखर नावडे मर्कटासी ॥१२॥

॥ श्लोक ॥ ( वसंततिलका )
धिक्कारिला कबिर - बालक बालकांनीं ।
आश्चर्य काय त्यजिल्या मणि कुक्कुटांनीं ॥
साहे न हंस - सहवासचि वायसास ।
वाराह सेवितिल का मलयानिलास ? ॥१३॥
पुढें एक दिवस -

॥ आर्या ॥
कक्षे झोळ्या कफ़न्या भगव्या त्या पायघोळ अंगांत ।
कंठीं माळा रुळती आले कबिराश्रमाप्रती संत ॥१४॥

॥ पद ॥
कछू कमाई कर ले, भाई ॥ध्रु०॥
लागा हुबा है दुकान संतका रामनाम है लड्डू ।
लेनेकू ये टका न लगता जलदी भर ले ॥१॥
साथ न आवे सुन्ना - चांदी - पाच - हिरा और मोती ।
जबलग जिंदातबलग इनकी संगत है बेकामी ॥१३॥

॥ श्लोक ॥ ( भुजंगप्रयात )
पितापुत्र लोटांगणीं त्यास आले ।
करूनी बहूमान गेहांत नेलें ॥
दिवाळी गुढीपाडवा आज ईद ।
अलि, लागतां हे गृहा संतपाद ॥१६॥
कमाल आपल्या आईस म्हणतो -

॥ पद ॥ ( संतपदाची जोड )
माइ, करवा थाट । बहु तो ॥ध्रु०॥
संत जेवितां होइल सोपी । वैकुंठींची वाट ॥१॥
उजळुनि दीप काढि रांगोळ्या । मांडि बसाया पाट ॥
दासगणु म्हणे दाशरथीचे । संत हेचि जगिं भाट ॥१५॥
हें ऐकून आई म्हणाली -

॥ पद ॥
करेगा क्या, बच्चें इनसान करूंगीं मैं यही आभिमान ॥
कमाला, तुम सुनो मेरी बात ।
होना जान है खुदाके हाथ । करे रघुनाथ ॥१८॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
सद्बुद्धि जागृत किती मम लेकराची ।
ना शोभते खचित मी जननी तयाची ॥
भर्ता मदीय जगतीं तव दास रामा ।
ऐसें वदून करि रूदन तेथ रामा ॥१९॥
आई रडत आहे असें पाहो कमाल म्हणाला -

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
नको रडुस माई अतां । घाल चुलीला पेटण ।
देह झिजवूं संतांसाठीं । देतो पाणी मी आणुन ॥२०॥

॥ पद ॥ ( अजि अक्रूर हा )
चुल पेटवुनी काय करूं मी बाळा ! ।
ना धान्य खचित स्नेहाळा ॥
जरि म्हणशिल तूं आणुन पाजूं नीर ।
आणण्या न तीहि घागर ॥
( चाल ) जसें द्यावें तैसें घ्यावें ।
ना दोष कुणा लावावे ।
स्वानंद चित्त ठेवावें ॥
असें बोलुनि ती कुरवाळुनि मुख - कमला ।
धरि पुत्ररत्न हृदयाला ॥२१॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
गृहिणी गृहांत कमलेसम लागताहे ।
मी ना म्हणून तशि वाटत दु:ख पाहें ॥
माझ्यामुळेंच पतिच्या करिं ती नरोटी ।
आली असे, अशि तुझी जननी करंटी ॥२२॥
हें पाहून कमाल म्हणतो,

॥ पद ॥ ( तोचि म्हणावा जगिं संत )
तोच करंटा जगिं साचा । मंगल नामावली प्रभूची ॥
ज्याची जपत ना कधिं वाचा ॥ध्रु०॥
( चाल ) धनिका म्हणती भाग्यवान् जरी ।
परि या जगतीं तोच भिकारी । नरकिं पचे तो यमदरबारीं ।
नको नको तो संग आपणा अधमाचा ॥२३॥

॥ आर्या ॥
रामनाम धन भरिलें मनपेटीसी झटून तुम्हि अंगें ।
इहलोक हाट न त्याचा, रत्ना घेतील गाढवें कां गे ? ॥२४॥

॥ कामदा ॥
बसुन मागिं मी शालु काढितों । विकुन त्याजला धान्य आणितों ।
त्यजुं नको धिरा, थांब तोंवरी । घालु साधुंना भाजिभाकरी ॥२५॥

॥ पद ॥ ( टप टप टप )
काढिसी कशाचा वद जाउन शेला ।
ना तंतु सुताचा निजसदनीं उरला ।
धनहिनता विधीनें बघ लिहिलि रे भाळा ।
धिग् धिग् जगतीं जिणें अपुलें रे बाळा ॥२६॥

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
असें जननि बोलतां पिटि कमाट भाला करें ।
रमारमण राघवा करुं मि काय आतां बरें ? ॥
उपोषित जरी गृहिं त्वदिय हे हिरे राहती ।
तरी कमलजावरा कुठुन मोक्ष येतो हातीं ॥२७॥

॥ ओवी ॥
कमालाचें ऐकतां रुदन । आला कबीर धांवून ।
दु:खाचें काय कारण । म्हणून विचारी तयासी ॥२८॥

॥ आर्या ॥
द्रव्यें, धान्यें वस्त्रें संतांची आपण ती करूं सेवा ।
यासाठीं ते हरिलें हा त्या प्रभुचा प्रसाद मानावा ॥२९॥

॥ दिंडी ॥
हाटिं वत्स रे ! चाल शीघ्र जाऊं ।
करुनि खटपट घेउनी शिधा येऊं ॥
वेळ झाला बहु संत ते भुकेले ।
यामिनीचें द्वयप्रहर भुक्त झाले ॥३०॥
वर गेले व या गणिकेला साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, “ बाई !

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
प्रचुरतर तमानें धुंद झाल्या दिशाही ।
किर किर किर शब्दें ओरडे यामिनी ही ॥
जन वश रमणीला कुंभकर्णाचिया रे ।
सकल खचित झाले पट्टणीं येधवां रे ॥३१॥

॥ पद ॥
समय नसुनि पातलों मी त्वदिय मंदिरीं ।
घडला हा मंतु खचित गे क्षम करी ॥
मजला वा मम पुत्र ठेव चाकरी ।
वढुन असें गणिकेचे पाय तो धरी ॥३२॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
गणिकेनें तें ऐकून । अभिमानें तुकाविली मान ।
पुसे कबिरालागुन । ‘ काय सेवा करशिल तूं ? ’ ॥३३॥

॥ दिंडी ॥
सदन झाडुनि घालीन सडा बाई ।
दळण दळुनी स्वयंपाक करिन पाहीं ॥
धुणेंपाणी करुनिया तुझे पाय ।
चुरिन रात्रीं मानून तुला माय ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP