मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय २९ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय २९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २९ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत महिमा आणखी सांगत । पुंड्र देशाचा राजा शास्त्रवेत्ता असत । नानाधर्मपर विचक्षण असत । नाम त्याचें सुग्रोव ॥१॥एकदां त्याच्या राज्यांत । अनावृष्टि घोर होत । मेघ जळ न वर्षत । अति दुःखित तो झाला ॥२॥इंद्राच्या तैसा वरुणाच्या अनुष्ठानीं । ब्राह्मणांसी त्यानें योजूनी । दक्षिणा देऊन द्विजां तो धनी । तोषविता झाला मेघपतीसी ॥३॥परी मेघ न वर्षत । पापानें त्याच्या प्रेरित । त्यायोगें अति दुःखित । जाहला तो सुग्रीव ॥४॥राज्य त्यागून विश्वामित्राप्रत । जाऊन त्यास प्रणाम करित । नंतर तयास विचारित । मेघवृष्टीचा उपाय तैं ॥५॥त्यानें राजानें ब्राह्मण । योजिले लिहून घेण्या तें पुराण । मुद्गल पुराण घेऊन । नंतर परतला स्वनगरासी ॥७॥समीपस्थ जनांसमवेत । तें पुराण तो ऐकत । तेव्हां वृष्टी उत्तम होत । मुद्गल वाचतां प्रारंभीं ॥८॥तें पाहून नृप विस्मित । सर्व लोकही हर्षयुक्त । पुंड्रनिवासी ते समस्त । गणेश्वरासी पूजिती ॥९॥भाद्रपद प्रतिपदेस सुरुवात । करून ऐके नृप आनंदयुक्त । सिद्धिप्रद हें पुराण अद्भुत । एक वर्षभर भक्तीनें ॥१०॥पुनः भाद्रपद मास लागत । शुक्ल पंचमीस पूर्ण होत । राजा पुनरपि प्रारंभ करित । मुद्गल पुराण श्रवणाचा ॥११॥शुक्ल प्रतिपदेस पुनः प्रारंभ करित । सुग्रीव तें नित्य ऐकत । आषाढांत अमावास्येस समाप्त । करितसे तो एकदां ॥१२॥श्रेष्ठ जनांसमवेत । वार्षिक क्रमें तो नृप ऐकत । प्रतिवर्ष महाभक्तियुक्त । सर्व नगर जनांसह ॥१३॥भक्तिभावें सारे गणेशास भजत । झाले दुःखविवर्जित । त्या राज्यांत वंध्यादोषयुक्त । कोणीही ना राहिला ॥१४॥न रोगशोकसंयुक्त । जैं सुग्रीव राज्य करित । सर्व संपत्तिसंयुक्त । लोक सारे तैं झाले ॥१५॥रोगदोषभावें हीन । भय सारें लय पावून । अन्तीं सर्वांसहित गमन । करी स्वानंदलोकासी ॥१६॥तेथ तो ब्रह्मभूत होत । निज लोकाप्रत जेव्हां जात । तेव्हां त्याच्या अंगावरून वाहत । वायू तो वाहे रौरवावरी ॥१७॥रौरव नरकस्थ पापी जन । पीडाहीन जाहले तत्क्षण । त्यांस घेऊन गेले गणेशगण । ब्रह्मीभूत त्यांसी करिती ॥१८॥तें पाहून यमादि विस्मित । मुद्गल पुराणास प्रशंसित । वार्षिक वाचनाचें फळ अद्भुत । सांगितले तुज सर्वसिद्धित ॥१९॥सुग्रीवाच्या देशांत । एक नर कुष्ठयुक्त । तो एकदां भावें जात । पुराणश्रवण करावया ॥२०॥वार्षिक वाचन प्रारंभ करित । नृप तैं तो ऐके नियमित । ऐकतां त्याचें कोड जात । जाहला अत्यंत हर्षित ॥२१॥आपुल्या पायांनीं तो परत । गेला आपुल्या घरीं मुदित । स्वकार्य करी तो प्रेमयुक्त । इच्छित भोग सारे भोगिले ॥२२॥अंतीं गजाननाकडे जात । ब्रह्मीभूत तो होत । श्रवणफल ऐसे असत । विविध जन तरून गेले ॥२३॥येथें अखिल भोग भोगून । जाहले अंतीं स्वानंदांत विलीन । वर्षशतांनीं परिपूर्ण । कथन हें न होणार ॥२४॥म्हणॊनि मुद्गल पुराण श्रवण फल । कथिलें संक्षेपें वर्षश्रवण विमल । केवळ ऐकतां हें वार्षिक सफळ । मनोरथ समस्त होतीं ॥२५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्ष मुद्गलसंवादे वर्षेण मौद्गलश्रवणमाहात्म्यवर्णंनं नामैकोनत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP