मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय १७ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय १७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १७ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः । मुद्गल म्हणती दक्ष प्रजापतीस । ऐसें सर्व गणेशरहस्य सुरस । सांगितलें तुज भक्तास । संक्षेपानें शुभप्रद ॥१॥म्हणून आतां गणाध्यक्षाचें भजन । करी तूं दक्षा एकमन । तेणें सर्व ईप्सित लभून । धन्य कृतकृत्य होशील ॥२॥यज्ञध्वंसाचा शोक न करी । गणेशभक्ती तुज उद्धरी । ऐसें बोलून मंत्र एकाक्षरी । देता झाला तयासी ॥३॥सूत म्हणे शौणकासी । विधियुक्त विधानें त्या मंत्रासी । स्वीकारी दक्ष त्या वेळेसी । पूजिलें मुद्गलास तयानें ॥४॥मुद्गलयोगी स्वस्थानाप्रत । जाण्या जाहले तैं उद्यत । त्याच वेळीं प्रकटत । गणाध्यक्ष तेथें शुभप्रद ॥५॥मूषकावरी संस्थित । सिद्धिबुद्धींच्या सहित । पाशांकुशरदयुक्त । अभयमुद्रा धारक प्रभु ॥६॥गजमुख रक्तवस्त्र नेसलेला । भूषणें सुंदर सजलेला । शेष नाभीवरी जाच्या रुळला । प्रमोदादि गण सेविती ॥७॥त्रिनेत्रधर एकदन्त । लंबोदर परात्पर वरिष्ठ । ऐशा गजानना पाहून हर्षित । दक्ष मुद्गल जाहले ॥८॥उभे राहून प्रणाम करित । द्विरदाननास त्या स्तवित । दक्ष तैसा मुदगल घालित साष्टांग नमस्कार तयास ॥९॥तेव्हां अति हर्षभरित । रोमांचित शरीर आनंदाश्रुयुक्त । दक्ष म्हणे भक्तिसंयुक्त । गणेशासी वचन ऐसें ॥१०॥गजानना तुझें प्रत्यक्ष दर्शन । होऊन झालों मीं धन्य पावन । वेदांत गोचर तूं ब्रह्मरूप सनातन । सर्वभावें पाहिलें तुज ॥११॥धन्य मीं हे मुद्गल योगी धन्य । उत्तम पुराण हें धन्य । ज्यायोगे परात्पर तूं शोभन । विघ्नेशा मज लाभलासी ॥१२॥मुद्गलांनीं मज सांगितलें । भक्तिअधीन गजानन भले । त्या वचनाचें सत्यत्व अनुभविलें । आज प्रत्यक्षप्रमाणें मीं ॥१३॥मुद्गलांच्या भक्तीनें मोहित । येथ आलास त्वरित । तुझ्याहून श्रेष्ठ वाटत । त्यामुळें आज मुद्गल मला ॥१४॥ऐसें जोवर दक्ष बोलत । तोवरी भक्तीरूप उत्पन्न होत । त्त्यायोगें तो विह्रल नाचत । भ्रांत धुंद होऊनियां ॥१५॥विघ्नेश्वराचें सत्कारकृत्य विसरला । आनंदें नाचू लागला । मुखानें जयघोष चालला । जय हेरंब जय विघ्नेश ॥१६॥जय गणेश मूषकध्वज । जय गजानन परेशान मूषकध्वज । जय लंबोदर जय विश्वतेज । जय गजानन श्रीगजानन ॥१७॥ऐसा जयजयकार करित । आनंदाश्रू वाहती अविरत । दक्ष देहभान विसरून नाचत । इतुक्यांत सर्व देव आले ॥१८॥शिव विष्णु प्रमुख सुरेश्वर । गजाननाचा लाभून समाचार । भृगुमुख्य मुनिवर । नारदादी सुरषीं ॥१९॥शुकादी सनकादी कपिलादी । महामुनी आले उदारधी । वसू साध्य रुद्रादी । गंधर्व अप्सरा त्याही आल्या ॥२०॥अश्विनीकुमार शेषादि नाग । पर्वत नायक सिद्धचारण उरग । असुर धर्मपालक विद्यावर सर्वग । कामधेनू विप्र असंख्य ॥२१॥ते सर्व गणराजास नमिती । चित्तीं त्याच्या हर्ष अती । स्तुतिस्तोत्रें ते गाती । आपणास धन्य मानिती ते ॥२२॥तेव्हां तो मुद्गल योगी विस्मित । पुराण श्रवणाचें फल पाहून होत । दक्षाची समाधी भंग करित । त्यास जागृती आणितसे ॥२३॥दक्ष तेव्हां हर्ष आवरून । यथाविधि करी गणेशपूजन । तदनंतर देवेश्वरां विप्रां योग्यांस पूजून । प्रणाम करी गजानना ॥२४॥साश्रुनेत्र तो स्तवन करित । भक्तिनम्रकंधर भक्त । त्याच्यासह देवविप्रादि स्तवित । परमेश्वरा त्या गणेशासी ॥२५॥गणेशा सर्वात्म्या तुज नमन । भक्तिमोहें मोहात्मका वंदन । महेशादि देवांनीं स्तुता अभिवादन । शुकादिसेव्या नमन तुला ॥२६॥अयोगासी संयोग धारीसी । गजाननासी परशुपाणीसी । गदाधरासी शंखधरासी । विघ्नेशा तुज नमो नमः ॥२७॥परेशासी महाविघ्नविदारकासी । अनाथासी सनाथासी । हेरंबासी महोदरासी । स्वभक्तसंस्थतत्परा तुज नमन ॥२८॥अभक्तांचें काम नाशिसी । सदा सुशांतिपद भक्तासी । ब्रह्मेशासी सदा स्वानंदवासीसी । सिद्धिबुद्धिवराअ तुज नमन ॥२९॥मूषकध्वजासी दितिपुत्रासी । दैत्यमस्तक धारीसी । कंठाखाली देवशरीरांसी । सुरासुरा तुज नमन असो ॥३०॥योगासी सर्वात्मक सर्वपूज्यासी । मायाव्यांना मोहकरासी । मायाप्रचालकासी सुसिद्धिदात्यासी । धर्मस्थपाला तुज नमन ॥३१॥शूलपाणीसी अनंतलीलाकरासी । मायेनें क्रीडाकरासी । सदा योगस्वरूपासी । भक्तिभावप्रदा तुज नमन असो ॥३२॥भक्तिप्रियासी पूर्णासी । भक्तवत्सलासी विघ्नेशासी । किती वर्णावें आम्हीं तुजसी । म्हणून केवळ नमन । करितों ॥३३॥देवा विघ्नेशा मजवरी । मुद्गलशिष्यावर दया करी । भक्तिलालस दास उद्धरी । ऐसी प्रार्थना ऐक माझी ॥३४॥ऐसें बोलून करी वंदन । प्रजापति दक्ष नम्र होऊन । त्याच्यामागून अभिवादन । देवविप्रादिक सारे करिती ॥३५॥ते त्या परात्परापुढेंलोटांगण । दंडवत घालिती भक्तिपूर्ण । दक्षास वरती उठवून । गणाधीश त्याला म्हणती ॥३६॥दक्षा मुद्गला स्वभक्तांस पाहत । भक्तपालक तैं आनंदित । म्हणे प्रजानाथा माग त्वरित । वर जे तुझ्या ह्रदयस्थ ॥३७॥ते सारे तुज देईन । तुझ्या भक्तिभावें मीं प्रसन्न । या पुराण श्रवणें पुण्य लाभून । स्तोत्र तूं हें उत्तम रचिलें ॥३८॥हें तूं रचिलेलें स्तोत्र शोभन । भुक्तिमुक्तिप्रद महान । या स्तोत्रपाठकास देईन । जें जें वांछील तें तें सदा ॥३९॥ब्रह्मपद सुशांतिदायक । हें स्तोत्र भक्तिवर्धक । महाप्राज्ञा हें होईल पावक । माझी प्रीति वाढवील ॥४०॥गणेशाचें ऐकून आश्वासन । दक्ष हर्षभरित करी वंदन । भक्तीनें मान वाकवून । गणेशासी प्रार्थितसे ॥४१॥गणेसा वर देण्या आलास । तुझी उत्तम भक्ती या भक्तास । देई आणिक मज कायास । सांग मजला आज्ञेनें ॥४२॥तें ऐकून गणनाथ म्हणत । त्या भक्तिप्रियाचें जाणूत मनोरथ । हृष्टरोमा महामुनींचे ह्रद्गत । ओळखूण तेव्हां वर देई ॥४३॥माझी भक्ति अत्यंत । तूं करशील जगांत । दक्षा यापुढें प्राज्ञ यथार्थ । होशील भक्त तूं थोर ॥४४॥आतां यज्ञ करी जो उद्ध्वस्त । पुनरपि शंभूच्या सान्निध्यांत । तुज कांहीं कष्ट प्राप्त । शापप्रभावें यापूर्वीं ॥४५॥परी आतां आशीर्वचन । देतों तुजला कृपा करून । लाभो तुजला सुख शोभन । योगशांतियुक्त होई ॥४६॥नित्य मज तूं भजशील । सर्वमान्य सर्वमुख्य होशील । ऐसें बालून गणेश तत्काळ । मौन धरिंते जाहले ॥४७॥दक्ष हर्षभरित मन । यज्ञ करी उत्तम शोभन । गणाध्यक्षा प्रथम पूजून । नंतर पूजी शंभूआदीसी ॥४८॥मुनी नागादिकांस पूजित । नंतर तयास निरोप देत । मुद्गल विप्रेशास भक्तियुक्त । मनोभावें पूजितसे ॥४९॥रोमांचित काया होऊन । दक्ष दक्षगणाग्रणी बोले ववन । काय देऊ गुरुदक्षिणा तुजलागून । महायोग्या मज क्षमा करी ॥५०॥मी शिष्य तुझा विनत । माझें हें शरीर समर्पित । तुझ्या पादपद्यीं भक्तियुक्त । पूजा प्रमो ही स्वीकारावी ॥५१॥तदनंतर मुद्गल अभिनंदन । करिती दक्षाचें मुदितमन । त्याचें प्रेस स्वीकारून । आपुल्या आश्रमीं परतले ॥५२॥गाणपत्यांनीं सेवित । गणपप्रिय ते महाभक्त । ऐसें हें दक्षचरित । महात्म्यासह सांगितलें ॥५३॥मुद्गलाचेंही हें श्रेष्ठ चरित । सर्वसिद्धिप्रद पुनीत । सूत म्हणती शौनकाप्रत । मुद्गलपुराण पूर्ण कथिलें ॥५४॥हें पुराण योगभावित । सर्वमान्य सर्वसंशयनाशक असत । पुराणश्रवणाचें फळ श्रेष्ठ । तेंही तुजला सांगिलें ॥५५॥या पुराणाचें करून श्रवण । दक्ष दक्ष झाला पावन । आतां मीं करितों गमन । आश्रमासी माझिया ॥५६॥विप्रनायका आज्ञा द्यावी । आणखी काय इच्छा पुरवावी । कोणती हितवार्ता करावी । सांग स्वामी सांप्रत ॥५७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणें नवमे खंडे योगचरिते दक्षसिद्धिप्राप्तिवर्णनं नाम सत्प्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP