मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ४ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ४ Translation - भाषांतर ॥ गणेशाय नमः ॥ तपःप्रभावें भक्तिभावें प्रकट । गजानन जेव्हां पुढयांत । त्यास पाहून अयोग हर्षित । उठून प्रणास करी तयासी ॥१॥तदनंतर गणेशासी पूजून । नाना उपचारें भक्तिबावपूर्ण । पुनरपि त्यास वंदून । विघ्नेशास स्तवी कर जोडूनी ॥२॥शांतिस्वरूपासी सुशांतिदासी । वाणीमनहीन । तयासी । ढुंढे वाणीमनयुक्तविचारीसी । योगासी योगाधिपते नमन तुला ॥३॥वाणी मनोयुक्तच नससी । गणेशा विश्वरूपा कैसें स्तवूं तुजसी । नित्यासी गणेशाची । योगासी योगाधिपते नमन तुला ॥४॥वाणीमनोहीन तुज म्हणत । संयोग मय कदा नसत । योगरूपा परी तुज नमित । योगा योगाधिपते नमन तुला ॥५॥तुझ्यापासून प्रसूत । महानुभावा ब्रह्में विश्वें सतत । तुझ्यांतच लीन अभिन्न होत । योगासी योगाधिपते नमन तुला ॥६॥नित्य अयोगासी निवृत्तिदासी । मायाविहीना गणाधिपासी । वाणीमनोहीनत्वें सुलभ्यासी । योगास योगाधिपते नमन तुला ॥७॥स्वानंदरूपासी सुशांतिदासी । सिद्धिबुद्धिसाहाय्यें खेळकरासी । वाणीमनोहीन निजात्मलभ्यासी । योगासी योगाधिपते नमन तुला ॥८॥अव्यक्तासी साहजासी । मोह्हीनासी सदाशिवासी । त्रैविध्यनाथासी नेतिकर्त्यासी । योगासी योगरूपा नमन तुला ॥९॥सामान्यरूपासी त्रयीमयासी । द्वंद्वप्रकाशासी विष्णूसी । आनंदनाथासी सुखेळकासी । योगासी योगाधिपते नमन तुला ॥१०॥आत्मस्वरूपासी भानूसी । अमृतस्थयोगें लभ्यासी । भेदविहीनांसी जीवासी । योगासी योगाधिपते नमन योगाधिपते नमन तुला ॥११॥नाना प्रभेदांत तन्मयासी । सर्वस्वरूपासी शक्तीसी । आनंत्यभावें सुमोहदासी । योगासी योगाधिपते तुज नमन ॥१२॥साक्षिस्वरूपासी । सांख्ययोगलभ्यरूपासी । सदात्मसंस्थासी बोधहीनासी । योगासी योगाधिपतीसी नमन ॥१३॥परात्परासी बोधस्वरूपासी । संस्थाविहारकर्त्यासी । सदापालकभावधरा त्रैधिध्यनाथासी । योगासी योगाधिपते नमन ॥१४॥महोदरासी सोहंस्वरूपासी । चिन्मयासी मोहयुक्तासी । मोह्हीनासी देहिस्वरूपासी । योगासी योगाधिपते नमन ॥१५॥विहारकर्त्यासी बिंदुप्रचुरासी । चतुष्पदासी चतुर्विध प्रभावासी । आनंत्यतत्वासी देहभोक्त्यासी । योगासी योगाधिपते नमन ॥१६॥तुर्यात्महेहासी लयात्मकासी । कालस्वरूपासी गणेश्वरासी । नादात्मकासी त्रिदेहगासी । योगासी योगाधिपते तुज नमन ॥१७॥आनंदकोशात्मकस्थितासी । प्राज्ञासी सौषुप्तमयासी । नित्येश्वरासी प्रचारीसी । योगासी योगाधिपते तुज नमन ॥१८॥सर्वांतरस्थासी सूक्ष्मकासी । स्वप्नप्रचुरासी तैजसासी । हिरग्यगर्भासी प्रचारीसी । योगासी योगाधिपते । नमन ॥१९॥स्थितासी अन्नमयासी । विश्ववैश्वानरासी । त्यांच्या प्रचारीसी स्थूलस्वरूपासी । योगासी योगाधिपते नमन ॥२०॥जागृद्स्थासी विश्वद्वैविध्यमयासी । नानांडरूपासी खेळकासी । शक्तीसी धात्यास हरीसी । योगासी योगाधिपते नमन ॥२१॥हे गणेशाधिपतीचे कलांश । विघ्नेश्वर ते गणेश । तूं न यांच्या सहितईश । योगासी योगाधिपते तुज नमन ॥२२॥कैसें नाथा स्तवावें तुजसी । गणेशरूपा संयोगहीनासी । अयोगहीना मी तुजसी । तादात्म्यरूपा तुष्ट होई ॥२३॥योगासी योगाधिपतीसी । नमन गणेशा तुजसी । मुद्गल म्हणे दक्षासी । अयोग ऐसी स्तुती करी ॥२४॥गणेशासी प्रणाम करित । कर जोडूनी उभा राहत । गणाधीश घनगंभीर म्हणत । वर माग तूं महाभागा ॥२५॥जें जें तुझें मनोवांछित । तें मी देईन भक्तितुष्ट । या स्तोत्रानें मीं प्रसन्नचित्त । योग शांतिप्रद हा असे ॥२६॥जो हें वाचित अथवा ऐकत । त्यास नानासिद्धि लाभत । जें जें इच्छित तें तें देत । मी या स्तोत्राच्या पाठकासी ॥२७॥मजला हें प्रीतिकर होईल । भक्तिभावप्रद अमल । एकवीस दिवस एकवीस वेळ । वाचील त्यासी दुर्लभ सुलभ ॥२८॥ऐसें बोलून गणेशान । देई त्या गणाधिपास आलिंगन । अयोगरूपा हर्षसंपन्न । केलें त्यानें त्यावेळीं ॥२९॥तदनंतर अयोग वंदित । गणाध्यक्षा होऊन विनीत । भक्तिसंयुक्त म्हणत । रोमांचिततनू आनंदानें ॥३०॥जर तूं ढुंढे भक्तिमोहित । वर देण्या तरी भक्ति दे मजप्रत । तुझ्या पादयुगाची अविरत । पूर्णयोगस्थ मज करी ॥३१॥सुखयुक्त स्वरूपस्थ द्यावें । नाथा मजसी उद्धरावें । आनंदाच्या अनुभवें । धन्य मजला करावें ॥३२॥अयोगगणराजाचें ऐकून वचन । गणेश म्हणे तथाऽस्तु वरदान । तदनंतर अंतर्हित गजानन । अयोग अनन्यमानस ॥३३॥ह्रदयांत स्थापून गजानन । अंतीं योगमय होऊन । मोक्षनायका करी प्रसन्न । ऐसें हें अयोगवृत्त असे ॥३४॥ऐसें हें सर्वं चरित । सांगितलें संक्षेपें तुजप्रत । म्हणून तूं भक्तिसंयुत । भज तूं त्या गणराजासी ॥३५॥ऐसें मुद्गल त्या दक्षास सांगत । जेणें यज्ञ पूर्ण होईल त्वरित । अंतीं होशील योगयुत । ब्रह्मभूत तूं होशील ॥३६॥आज्ञा देई मी जाईन । तुझ्या आतिथ्यें प्रसन्न । रहस्य गणनाथाचें पावन । सकल तुजला सांगितलें ॥३७॥याहून अन्य न कांहीं असत । परम वेदादि संमत । जो हें वाचीत अथवा ऐकत । त्यास शुभ प्राप्त होई ॥३८॥अंतीं योगमय होऊन । गणपात्मक भावें प्रसन्न । राहील तो आनंदमग्न । गजाननाच्या कृपेनें ॥३९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे योगचरिते नवमे खंडे पूर्णयोगचरितवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP