मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ३९ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ३९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३९ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ नवमखंड श्रवण महिमान । सांगे सूत या अध्यायीं पावन । प्रल्हाद नाम योगपरायण । योगी मयूरेश भक्त होत ॥१॥तो एकदा स्वप्नांत । देवेशास मयूरावफ़्र स्थित पहात । सिद्धिबुद्धींच्या सहित । गजमुख तो भक्तवत्सल ॥२॥त्यास प्रणाम करून नाचत । आनंदाश्रू ओघळीत । महायश त्यास सांगत । मयूरेश वर मागण्या ॥३॥तो त्यास नमून हर्षयुक्त । विघ्ने शास प्रार्थित । देई भक्ति दृढ योगशांतियुक्त । हेंचि वरदान मगतों ॥४॥त्यांचें तें ऐकून वचन । तयास म्हणे गजानन । मुद्गलपुराणीं नवम खंड पावन । तो वाच तूं वाच तूं नित्य नेमें ॥५॥त्यायोगें योगींद्र वंद्य होशील । माझी दृढ भवित लाभेल । ऐसें बोलून महापति सबळ । मयूरेश अंतर्धान पावला ॥६॥तेवढयांत स्वप्न होऊन समाप्त । प्रल्हाद जागृत । मनांत अत्यंत विस्पित । मुद्गल पुराण शोधिलें ॥७॥त्यांतला नवम खंड लिहून घेत । भक्तीनें त्याचा पाठ वाचित । त्या पुण्याईनें लाभत । योगगीतार्थक योग ॥८॥तेव्हां अति मुदित होऊन । नवधा भजे गजानन । क्षेत्रसंन्यास घेऊन । नित्य वाची भक्तिभावें ॥९॥पाठ नवम खंडाचा करित । नित्य नेमें तो तेथ । एकदा दैत्येंद्रमुख्य सिंधु खंडित । क्षेत्रस्थ मूर्ति गणेशाची ॥१०॥दैत्यांनी तेथ स्थापिलि । सिंधु प्रतिमा तेथ पूजिली । प्रल्हाद मति तैं झाली । शौनका अत्यंत दुःखित ॥११॥क्षेत्रवासी जन सोडून । गेले मयूरक क्षेत्र तें पावन । पळाले भय वाटून । इकडे तिकडे दुःखानें ॥१२॥परी प्रल्हाद योगिवंद्य न जात । तेथेंच उपोषणपर बसत । क्षेत्रसंन्यासव्रत पाळित । मानसपूजा करी तेव्हां ॥१३॥विघ्नेश्वरास नैवेद्य दाखवित । त्याचें उच्छिष्ट नित्य सेवित । त्याचा दृढ आग्रह पाहत । मयूरेश तै तोषला ॥१४॥भक्ताच्या त्या ताळूंत । अमृत निर्माण करित । त्यायोगें त्यास तोषवित । ऐसा काळ बहु गेला ॥१५॥पुढें गणेश शिवपुत्र होत । सिंधु दानवाच्या वधार्थ । देवर्षि पूजित प्रसन्नचित्त । मयूरेश तो भक्तप्रेमें ॥१६॥त्या सिंधू मूर्ति फोडित । त्या मूर्तीत स्वयं प्रवेशत । त्यास पाहून पूजित । प्रल्हाद आनंदें योगिश्रेष्ठ ॥१७॥पारणा करी हर्षभरित । प्रत्यक्ष गणराज त्यास पावत । वरप्रद तयास म्हणत । माग वर जो ह्रदयस्थित ॥१८॥तो म्हणे तूं माझ्या सन्निध । राही सदा मयूरेशा निर्वेध । तुझ्या भजनीं मीं सुखद । मग्न निरंतर रहावें ॥१९॥ऐसें करी हेंच मागत । वरदान मी सांप्रत । ब्रह्माकल्पान्तीं ब्रह्मचि करित । प्रल्हादास मयूरेश ॥२०॥सन्निध त्याच्या राहत । ऐसा ब्रह्मप्रिय गण करित । दुसराही एक वृत्तान्त । तुज सांगतों शौनका ॥२१॥विश्ववामित्र महामुनि करी । पारायण । या नव मुद्गलम खंडाचें शोभन । सरडा एक तेथ येऊन । समीपस्थ वृक्षावरचा ॥२२॥ऐके न कळता तें पुराण । ज्वरपीडित्त होता दारूण । परी नवम खंडाचें होता श्रवण । श्रवणमात्रें ताप गेला ॥२३॥त्या पुण्य गौरवें भोंग भोगित । ऐहिक सारे जे ह्रदयस्थित । अंतीं स्वानंद लोकांत । जाऊन गणेश सायुज्य लाभला ॥२४॥गणेश्वरास तेथ पाहून । ब्रह्मीभूत तो झाला तत्क्षण । ऐसें नानाविध जन । ब्रह्मलाभ लाधले खंडश्रवणें ॥२५॥त्यांची गणती अशक्य असत । भुक्तिमुक्तिप्रद हा ग्रंथ । नवम खंड विशेष युक्त । गणेश ज्ञानाचें सार त्यात ॥२६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे दक्षमुद्गलसंवादे नवम खंडमाहात्म्यवर्णनं नामैकोनचत्वरिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP