मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय २६ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय २६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २६ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती शौनकाप्रत । भीमनामा वैश्य अंग देशांत । महापापी सर्वधर्मविवर्जित । दर्शनें पुण्यनाश करी ॥१॥तो एकदां चौर्यास्तव जात । वनांत तेथ अवचित । राजर्षि विदर्भराज येत । सैन्य घेऊन आपुलें ॥२॥त्यास पाहून शस्त्रें टाकून भीम गेला वनांतरीं पळून । प्राणरक्षणार्थ बसला लपून । पुढें नवल एक वर्तलें ॥३॥मेधातिथि नाम ब्राह्मण । माघशुक्लप्रतिपदेस प्रारंभ करून । मुनिसहवासांत पारायण । मौद्गलाचें करूं लागला ॥४॥तेथ भीम वैश्य जात । पापरत तो त्या मुनीस पाहत । त्यांच्या जवळीं आश्रय घेत । शस्त्रवर्जित त्या वेळीं ॥५॥राजा तेथ नंतर येत । मुनिपुंगव मेधातिथीस नमित । नंतर सर्व मुनींस भावयुत । नमून परतला स्वस्थाना ॥६॥विदर्भपती तो भानु परतला । तो वैश्य मुनिवनांत झोपला । प्रातःकाळीं राजभयें आला । स्नान करून पुराणश्रवणा ॥७॥अन्य मुनिसमर्वत ऐकत । तो भीमवैश्यही पुराण विनीत । पुराणश्रवणें त्या दुरात्म्यांत । बुद्धिभेद त्वरित झाला ॥८॥तो तेथेंच राहून । विचार करी पापपरायण । म्हणे मीं वैश्य दुरात्मा अपावत । काय करावें आनंदानें ॥९॥पापी नर जाती नरकांत । यांत संशय कांहीं नसत । नरदेह लाभतां धर्म करित । तोचि मानव धन्य होतो ॥१०॥ऐसा विचार करून राहत । तेथेंच मौद्गल श्रवणीं रत । स्त्रीपुत्रांस त्यागून होत । गणेशलालस सर्वदा ॥११॥फाल्गुन पूर्णिमेस पूर्ण वाचन । पुराणाचें होऊन । मेधातिथि घाली ब्राह्मण भोजन । प्रतिपदेस हर्षानें ॥१२॥पारणा करून निरोप देत । सर्वांसी तो गणेशभक्त । नित्य गणेश्वरा भजत । भक्तिभावें संपूर्ण ॥१३॥भीम स्वगृहास परतून । पापकर्म सारें सोडून । कर्मी स्वधर्मयुक्त रमून । गणपतींत मग्न झाला ॥१४॥मौद्गल श्रवणानें सर्वपापवर्जित । होऊन धर्मशील तो होत । गाणपत्य महायश भक्त । मृत्यूनंतर गेला गणेशलोकीं ॥१५॥वैश्यज तो ब्रह्मभूत । झाला विघ्नेश्वरास पाहून तेथ । ऐसे नाना जन सतत । मौद्गलश्रवणें उद्धरले ॥१६॥ब्रह्मांत तन्मय झाले । पुण्याशील ते सगळे । तेथ कितीही वर्णन केलें । तरी तें अपूर्णचि वाटेल ॥१७॥या पुराणश्रवणासम अन्य नसत । पुण्यकारी या जगांत । हें सत्य जाण महामुने सतत । पुराणश्रवण फलप्रद सदा ॥१८॥ओमितिश्रीसदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्गलसंवादे माघादिसार्धमासे मौद्गलपुराणश्रवणमाहात्म्यवर्णंनं नाम षड्विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP