मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय १९ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय १९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १९ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ पुराणश्रवणाचा विधि सांगत । नंतर सूत शौणकाप्रत । शुचि स्वधर्मनिष्ठ भक्त । राहतसे एकभुक्त परायण ॥१॥ब्रह्मचर्य त्या अवधींत । पाळून भूमीवरी झोपत । अनृतादिक त्यागित । सर्वही सम्यक् समहित ॥२॥हविष्यान्न सेवून । ऐकावें हें पुराण मनोरम । गणेशसन्निध वा वनीं जाऊन । अथवा आपुल्या घरांत ॥३॥हें मुद्गल पुराण संपूर्ण । ऐकावें होऊन योगभक्ति परायण । कामनायुक्त वा निष्काम मन । ऐकावें हें नियमानें ॥४॥त्यास त्वरित फळ होत प्राप्त । जेथ महामति वक्ता सांगत । हें पुराण तेथ श्रद्धायुक्त । ऐकावें हें उत्तम पुराण ॥५॥ब्राह्मण क्षत्रिय अथवा वैश्य । त्यानें ऐकावें हें स्ववश्य । ब्राह्मणद्वारे परवश्य । शूद्राने हें ऐकावें ॥६॥भाद्रपद शुक्ल प्रतिपदेस । आरंभ करावा सुरस । चार दिवसांत विशेष । पारायण ऐकावें उपवास करून ॥७॥अथवा माघ मासांत । तैसेंचि ज्येष्ठ महिन्यांत । पारायण एका महिन्यांत । मौद्गलाचें ऐकावें ॥८॥अथवा भाद्रपद मासांत । शुक्लप्रतिंपदेस प्रारंभ करित । आश्विनी पूर्णिमा दिनीं करित । कांहीं साधक समाप्ति ॥९॥ऐश्यापरी माघांत वा ज्येष्ठांत । दीड महिन्याच्या काळात । ऐकावें मौद्गल पुराण भावयुक्त । सर्व भावपरायणांनी ॥१०॥अथवा भाद्रपद शुक्ल प्रतिपदेच्या दिनीं । प्रारंभ अति सुरस करूनीं । मौद्गल पुराण एक वर्षभर अनुदिनीं । ऐकावें गणेशभक्तानें ॥११॥पुनः भाद्रपद महिना लागेपर्यंत । ऐकावें एकभुक्त राहून पुनीत । प्रतिपदेस निराहार राहत । चतुर्थी तिथीपर्यंत ॥१२॥पंचमीस मौद्गल पूर्ण करून । करावें नरें उद्यापत । यापरी करितां श्रवण । सदा फल लाभेल ॥१३॥त्याचा विधि सांगेन । मंडप बांधावा विस्तीर्ण । तोरणादींनी शोभा वाढवून । आधी गणेश्वर पूजावा ॥१४॥तदनंतर या ग्रंथाचें पूजन । मुद्गल शुकादि योग्यांचें आराधन । वाचकांस शुक्र मुद्गल मानून । पौराणिकास पूजावें भावयुत ॥१५॥तदनंतर श्रोतृगणाचें पूजन । करून प्रार्थावें स्नेहयुक्त मन । पौराणिकमुखें तदनंतर श्रवण । करावें हें उत्तम पुराण ॥१६॥अर्थानुसंधानें ऐकावे । हें मुद्गल पुराण आघवें । सर्वार्थनिपुण त्यायोगें व्हावें । सर्वसिद्धियुक्त सदा ॥१७॥चार दिवसांत पारायण । तें अर्थ न सांगता नुसतें वाचन । सर्वसिद्धिप्रद जाण । श्रवनाचेंही फल थोर ॥१८॥नित्य उत्सव संयुक्त । धर्मपरायण वसत । नाना दानें देऊन देत । ब्राह्मणादींना भोजन ॥१९॥बुद्धिमनें गणेशप्रीतिस्तव । करावें हें सर्व । आपणांस धन्य मानून अपूर्व । ऐकावें पुराण उत्तमोत्तम ॥२०॥पुराण पारायण होत समाप्त । तेव्हां गणेश्वरासी पूजित । पुराण ग्रंथही भक्तियुक्त । राजोपचारांनी आनंदें ॥२१॥तदनंतर पुराणिकाचें पूजन । तोषवावें त्यास देऊन धन । रत्नदानादींनीं प्रसन्न । तयास प्रार्थना करावी ॥२२॥स्वामी तुम्ही तारिलेंत । पुराण वाचन करून सांप्रत । मीं जाहली कृतकृत्य अत्यंत । तुमच्या चरणांच्या दर्शनें ॥२३॥ऐसी प्रार्थंना करून । पुनरपि त्यास वंदून । आणि दक्षिणा देऊन । सर्व उपस्थित तोषवावे ॥२४॥तदनंतर त्यांस निरोप देऊन । पुराणिकास घरी नेऊन । अन्य श्रोतृवृंदास भोजन । ब्राह्मणांसहित मोदकांचें द्यावें ॥२५॥तदनंतर त्यांस नमून । जो पारणा पूर्ण । तो ईप्सित सारें लाभून । अंतीं ब्रह्ममय होतो ॥२६॥अथवा हें मौद्गल पुरण । नित्य आदरें ऐकावें पावन । इच्छेनुसार भोजन । करावें श्रोत्यानें त्या वेळीं ॥२७॥ब्रह्मचर्यविहीन । तरी भक्तिभावसंपन्न । तो भक्त गणेशप्रीती लाभून । पावेल सर्वसिद्धि परम ॥२८॥अकिंचनही जो ऐकेल । भक्तिभावें पुराण हें निर्मल । यथाशक्ति विधानें करील । तोही पूजाहि उपचार ॥२९॥शमी मंदार दूर्वा वाहून । जो करीतसे पूजन । त्यास सर्व फळ लाभतें जाण । विधि वाचून जें मिळे ॥३०॥जेवढें ज्याचें वैभव असत । तेवढेंच पूजनादिक करित । त्यानेंही होत सुप्रीत । विघ्नेश्वर सर्वप्रदायक ॥३१॥श्लोकार्ध वा श्लोकांचें ऐके एक पद । मुद्गल पुराणाचें तो धन्य विशद । यांत नसे संशय कांहीं ॥३२॥संपूर्ण पुराण करी श्रवण । जो श्रद्धायुक्त पावन । त्याचें विप्रेशा जीवन । संपूर्ण सफळ होत असे ॥३३॥त्यास केवढा अधिक लाभ प्राप्त । याचें वर्णन अपर्याप्त । नित्य भक्तीनें जो ऐकत । त्यास सर्वसिद्धि लाभे ॥३४॥त्याच्या दर्शनमात्रें तरती । सर्व प्राणिमात्र जगतीं । जैसा गणेश्वर देव निश्चिती । तैसाचि श्रोता होतसे ॥३५॥ब्रह्मीभूतसम प्राज्ञ वसत । या भूमिमंडळीं आनंदांत । ऐसा हा श्रवणविधि आख्यात । पठणाचाही शौनका ॥३६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणो पनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रें पुराणश्रवणादिविधिवर्णंनं नाम एकोनविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP