खंड ९ - अध्याय ३८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ धूम्रवर्ण चरित श्रवणाचें महिमान । या अध्यायीं सूत करिती कथन । वरंततु नामक मुनि महान । नानाविध तपश्चर्या करी ॥१॥
परी त्या तपांनीं न लाभत । शांति सत्यार्थें तयाप्रत । नश्वर विश्व जाणून होत । ब्रह्मपर तो वरतंतू ॥२॥
तेथ पौलस्त्य मुनिश्रेंष्ठ येत । त्यास पाहून प्रणाम करित । विधियुक्त पूजून जेऊं घालित । हर्षभरें परम पावन तो ॥३॥
नंतर विनवी तयासी । तूंअ साक्षात योगिवंद्य अससी । महापुण्यानें मजसी । पादपद्य तुझें दिसले ॥४॥
आतां शांतिप्रद योगाचें कथन । करी जेणें शांति लाभूत । नश्वर सर्व सोडून । शांतिलालस मीं असे ॥५॥
विश्रवा म्हणे तयासी । ब्रह्मज्ञानाविण नरासी । शांति न लाभें म्हणून तुजसी । प्रथम सांगतों ब्रह्मलक्षण ॥६॥
वेदांत ब्रह्म वर्णित । नानाविध भावें तें ख्यात । त्यांचा पति गणाधीश असत । ब्रह्मणस्पति नाम त्याचें ॥७॥
त्या विधानें भजावें । तरीच शांतिसुख लाभावें । विश्व हें शरीर ध्यावें । गजशिर त्याचें ब्रह्म जाण ॥८॥
त्यांच्या योगे हा गजमुख होत । सिद्धिबुद्धिपति साक्षात । स्वानंदवासकाळी ज्ञात । गजानन हा धूम्रवर्ण ॥९॥
वर्ण जेथ धूम्रयुक्त । मज सहित । मुनिश्रेष्ठा होत । म्हणून धूम्राक्षर हा ज्ञात । ब्रह्मभूयप्रदायक ॥१०॥
धूम्रवर्ण गणाधीशाचें भजन । करूनिया सर्व प्रयन्तें करून । मी पावलों शांति उत्तम पावन । यावीण अन्य मार्ग नसे ॥११॥
अन्यथा पूर्ण शांति न लाभत । कोणा सही हें निश्चित । वेदादी ते मुनींद्र म्हणत । जाण त्या विभूस यांत ॥१२॥
पुलस्त्य उपदेश मानून । मी नानायोग परायण । ब्रह्में अन्य सोडून । तन्निष्ठ झालों सर्वदा ॥१३॥
ऐसें बोलून महायोगी थांबात । आपुल्या स्थळीं परत जात । वरतंतू तेथ विचार करित । गणेशभजनीं रत झाला ॥१४॥
धूम्रवर्णात्मक खंड वाचित । नित्य जप करी भक्तियुक्त । विघ्नेश्वरास आनंदें ध्यात । पूर्णं शांतियुक्त तैं झाला ॥१५॥
तेव्हां योगींद्र सर्वज्ञ होत । गणेशकृपेनें तो मुक्त । एकदां तीर्थसंस्थ पूजित । धूम्रवर्णास श्रद्धेनें ॥१६॥
त्याच्या पुढें नित्य पठन । करी धूम्रवर्ण खंडाचें एकमन । कावळा एक तेथ बसून । जवळच्या एका वृक्षावरी ॥१७॥
त्या कावळयास पीडा असत । ती पुराणश्रवणें नष्ट होत । तो जाहला हर्षयुक्त । उडून गेला स्वच्छंदें ॥१८॥
अंतीं त्या पुण्यें जात । तो कावळा गणेशाप्रत । जाहला स्वयं ब्रह्मभूत । न कळत । ऐकून पुराण हें ॥१९॥
ऐसे नानाजन पावन । जाहले धूम्रवर्ण वरित ऐकून । ब्रह्मी भूत ते पावन । भोग भोगून जाहले ॥२०॥
ऐसें जे नाना जन लाभत । पुराणश्रवणाचें फळ असत । तें सारें वर्णना तीत । संक्षेपें तुज कांहीं कथिलें ॥२१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे मुद्‍गलदक्षसंवादे धूम्रवर्णचरितमाहात्म्यवर्णन नाम अष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP