खंड ९ - अध्याय ३२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाया नमः ॥ सूत कथा पुढें सांगत । पिप्पलाद नाम ब्राह्मण असत । तो शैवमार्गपरायण ख्यात । शंकरास भजे सर्वदा ॥१॥
गौतमी तीरावर वसत । तो क्रमानें योगस्थित । सहजसंस्थ त्यायोगें होत । स्वाधीनत्वपरायण ॥२॥
तदनंतर वेदार्थज योग जाणून । शांतिधर जो परम पावन । सहज मोहहीन तो पाहून । दुःखयुक्त तो झाला ॥३॥
तो पिप्पलाद गौतमाप्रत । जाऊन भक्तिभावें त्यास नमित । योगशांति प्राप्तीचा विचारित । ब्रह्मप्रद उपाय त्यासी ॥४॥
गौतम त्यास करी कथन । एकदंत चरिताचें महिमान । त्याच्या कृपेनें शांतियोग संपन्न । होशील तूं पिप्पलादा ॥५॥
जें जें मायाविकारयुक्त । मुनिसत्तमा तें तं एकशब्दें ज्ञात । मायाहीन तैसें जें स्थित्त । तें दंत्तसंज्ञ जाण विचक्षणा ॥६॥
ऐसें वेदांत वर्णित । त्यांच्या योगें तो एकदंत । त्यास भज तूं विधियुक्त । त्यानें शांति तुज लाभेल ॥७॥
ऐसें सांगून महायोगी । गौतम थांबात विरागी । पिप्पलाद त्यास वेगी । प्रणाम करून परतला ॥८॥
स्वाश्रमांत आपुल्या जाऊन । एकदंतास भजे एकमन । गणेश कृपेनें योग शांति लाभून । पावन झाला तो विप्र ॥९॥
तदनंतर नित्य वाचित । एकदंताचें चरित । मौद्‍गलपुराणस्थित । स्वतंत्र खंड हा असे ॥१०॥
गाणपत्यस्वभावें वाचित । मुद्‍गलपुराण एकदंत चरित । एकदा तो योगी वाचित । पुराण नित्यनियमानुसार ॥११॥
एकदंताच्या पुढयांत । तेथ एक पाल पडत । ती एकदंत चरित । ऐकती झाली अवचित ॥१२॥
ज्वरपीडित ती होती । परी अनायासें ज्वरातून मुक्ती । लाभून देहांतीं मुक्ती । लाभे गणेशसान्निध्य ॥१३॥
त्या गणनाथास पाहत । स्वयं ब्रह्मभूत ती पाल होत । ऐसें हें अति अद्‍भुत । वृत्त एकदांत चरिताचें ॥१४॥
याचें श्रवण करित । ते नरनारी ब्रह्मभूत । त्यांचें वर्णन वाचातीत । संक्षेपें कथिलें सर्वसिद्धिप्रद ॥१५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे एकदंत चरितमाहात्म्यवर्णंनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP