खंड ९ - अध्याय ४१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणती सूताप्रत । महाभागा ऐकून पुराणें बहुत । मीं होतीं संशयभ्रंत । खेदपूर्ण स्थितींत ॥१॥
अन्य पुराणांचें करितां श्रवण । माझे संशय होतील हरण । ऐसा विचार करून । मीं आशा धरिली होती ॥२॥
आंत्या मुद्‍गल पुराण । ऐकिलें तुमच्या मुखांतून । त्यानें संशय दूर होऊन । सूता तूं मज कृताथ केलें ॥३॥
परी अद्यापि ह्रदयांत । एक संशय माझ्या असत तो दूर करून स्वस्थानाप्रत । जाई शांतिप्रदा झणीं ॥४॥
गणेशाचें रहस्य ज्ञात । होतें त्यासादि बुद्धिमतप्रित  । सर्वतिग तें मौद्‍ गलांत । महान आश्चर्य परात्पर ॥५॥
तदनंतर व्यासें रचिलें । भारत महाकाव्य भलें । धर्माधर्माचें जेथ झालें । ब्रह्मासायुज्यप्रद व्याख्यान ॥६॥
तेथ प्रथम गणनाथाचें पूजन । तैसेंचि केलें त्यानें स्मरण । परी गणेश्वराचें संपूर्णं वर्णन । ग्रंथांत त्यानें न केलें ॥७॥
भारत ग्रंथ संपूर्ण होत ।  महामुनि तैं कृतकृत्य स्थित । हें सारें संदेहातीत । काय हें कौतुक सांग मजला ॥८॥
शौनकाचा ऐकून प्रश्न । सूतें स्मरिला आपुला गुरु महान । तत्क्षणीं केलें आगमन । योगीश व्यासानें तेथें ॥९॥
त्यास पाहून हर्षसंयुक्त । शौन कादि मुनि तैसा सूत । उठून त्यांचें स्वागत करित । पूजा करून नमिती तयासी ॥१०॥
ते हात जोडून उभे राहती । तयांस जवळी बैसविती । व्यास अन्तर्ज्ञानें जाणती । सूत शौनकांचें मनोगत ॥११॥
म्हणोनी शौनकाचा प्रश्न । मनीं ठेवून सांगती वचन । विप्रा मी रचिलें भारत महान । यांत संशय कांहीं नसे ॥१२॥
त्यांत हा बुद्धिग ब्रह्मसंज्ञित । वर्णिला असे साक्षात । सिद्धिप्रद ब्रह्मरूप असत । मुख्य हाच संमत असे ॥१३॥
विकुंठादि लोक समस्त । कथिले मीं नाशिवंत । परी गणेशवर्णन विस्मरत । सिद्धिबुद्धिवरबळे मोहमग्न ॥१४॥
तेव्हां मीं अन्य ग्रंथार्थ उद्यत । तैं आकाशवाणी होत । ती मजला उद्देशून म्हणत । गणेशवर्णन पूर्ण करू नको ॥१५॥
गणेशानें जनांस मोहविण्यास । रचिली ही माया खास । प्रशस्त करूं नको संपूर्ण रूपास । व्यासा हे वचन स्मरावें ॥१६॥
मुद्‍गल मुनि मुख्यावांचून । अन्य मुनी असमर्थ करण्या वर्णन । गणपतीचें रूप स्पष्ट पूर्ण । ह्यांत कांहीं संशय नसे ॥१७॥
हें ऐकून मीं आकाशवाणीस नमित । मुद्‍गल पुराणीं झालों रत । म्हणून संशयहीन तूं सतत । मौद्‍गल पुराण भज भक्तीनें ॥१८॥
अन्य पुराणांत गणेशरूप वर्णित । ब्रह्यणस्पति बोधदायक उचित । तथापि विप्रादी होती मोहित । न जाणती गजाननासी ॥१९॥
सिद्धिबुद्धींचा वर मोहवित । त्या विप्रांसी जगतांत । परी मौद्‍गल पुराण जो वाचित । गणेश वरदानानें ॥२०॥
भक्तीनें मौद्‍गल पुराण वाचिती । अथवा जे प्रेमें ऐकती । तेच गणेश्वरास पाहती । पूर्णंरूपें जाणती तया ॥२१॥
अन्यथा हें शक्य नसत । म्हणून मौदगल भज तूं सतत । आवरें तैं कविदोषविरहित । सर्व पर वस्तु लाभशील ॥२२॥
ऐसें बोलून महापति । व्यास जेव्हां थांबती । तेव्हां धूम्रवर्ण तेथ अतिप्रीती । करिती अवचित आगमन ॥२३॥
त्यास पाहून ते समस्त । नमिती गणेशास भक्तियुक्त । पूजोनियां स्तवन करित । गाणेश सारे गणपप्रिय ॥२४॥
धूम्रवर्ण होऊन संतुष्ट म्हणत । स्वभक्तांसी हास्ययुक्त । सुखकारक वचन मोदयुक्त । माझ्या भक्तांनो ऐका ॥२५॥
कलियुगाचा प्रभाव समस्त । खंडिला संपूर्ण मीं सांप्रत । आतां निर्भय फिरा जगांत । मुनिमुख्यहो यापुढें ॥२६॥
ऐसें बोलून गणाधीश स्थापित । धरणी तळावर पुनीत । त्यांस धर्मयुक्त करित । मानवांसी कृपेनें ॥२७॥
त्या मुनिमुख्यांस आज्ञापित । मौद्‍गल माझें रहस्यद सतत । जपावें आनंदानें तैं त्वरित । तुमच्या वरा मीं होईन ॥२८॥
शित । असे मुद्‍गल पुराणांत । त्या पुराणाच्या पठणें ज्ञात । होईल अर्थ सविशेष ॥३०॥
जेथ मौद्‍गल पुराण वाचिती । अथवा भक्तीनें जन ऐकती । तेथ माझी नित्य वसती । भक्तिग्रहण लोलुपत्वें ॥३१॥
ब्रह्मपुराणांत वर्णित । बुद्धिस्थित रूप अंशतः असत । तेथ मीं निर्गुणाकृति संस्थित । ऐसें रहस्य जाणावें ॥३२॥
ब्रह्मांडपुराणीं प्रणवाकार । नानाविध क्रीडाकर । तेथ अंशें विश्वाकार । प्रभावें मीं असे ॥३३॥
गाणेशपुराणांत मी मूर्तिमंत । गजवक्त्रादि चिन्हयुक्त । त्यांचा ज्ञानप्रकाशक ज्ञात । सर्वदा प्रसन्न कृपाळू ॥३४॥
अन्य पुराणांत मीं वर्तत । शिव विष्णु आदि रूपांत । त्या कलांशे नानाभेदयुक्त । विहार करी स्वेच्छेनें ॥३५॥
मौद्‍गल पुराणीं मीं रत । योगरूप उपनिषदांत । माझ्या सर्व रूपांचा योग कीर्तित । विशेषें या पुराणीं ॥३६॥
त्याचें प्रकाशक पूर्ण । योगप्रकाशक संपूर्ण । म्हणोनि मौद्‍गल प्रिय जाण । त्या सम अन्य पुराण नसे ॥३७॥
सृष्टि प्रारंभी मज प्रार्थिती । मुनिअसत्तमहो भावभक्ती । तेव्हां मी वर दिला तयांप्रती । भक्तिविवर्धक भक्तिपूर्ण ॥३८॥
म्हणोनि मीं पूर्वी रचिलें । मौद्‍गल पुराण संपूर्ण भलें । मुद्‍गलाच्या ह्रदयीं स्फुरविलें । सर्वसौख्यप्रदायक ॥३९॥
मीं त्या योग्यास प्रेरणा देत । तैं तो हें दक्षप्रजापती सांगत संपूर्ण पुराण मोदयुक्त । तेव्हांपासून हें पुराण श्रेष्ठ ॥४०॥
तदनंतर शिवादि देव सेवित । मरीची आदि महर्षि भावयुत । शेषादिक नर समस्त । सेविती या पुराणासी ॥४१॥
मौद्‍गल पुराणावांचून । माझें यथार्थ रूप ज्ञान । अन्य कोणत्याही साधनें अपूर्ण यानेंच संपूर्ण सर्वप्रकाशक ॥४२॥
अन्यत्र माझें स्वरूप वर्णित । पूर्णभावें परी होत । मोह सिद्धिबुद्धिकृत भक्तिप्रत । ऐसें भय तेथ असे ॥४३॥
सृष्टिप्रारंभी मज प्रार्थिती । सिद्धिबुद्धि मज भावभक्ती । जगता मोहविण्याची शक्ती । ब्रह्मक्रीडार्थ आम्हां द्यावी ॥४४॥
तेव्हां मी तयांस वर देत । मौद्‍गल पुराण विरहित । मज न जाणतील निश्चित । विश्वें जैसीं ब्रह्में हीं ॥४५॥
म्हणून मज मुद्‍गलस्थित । भजा तुम्हीं एकचित्त । त्यायोगें भक्तिसंयुक्त । संचार करा हो निरंतर ॥४६॥
हयाहून अन्य न साधन । माझ्या प्राप्तिस्तव महान । सर्व सिद्धिलाभार्य पावन । द्विजसत्तम हें ऐका ॥४७॥
याच्या श्रयणमात्रें होत । नर कृतकृत्य जगांत । यांचें फळ वर्णनातीत । अपार असे मुनिजनही ॥४८॥
मुद्‍गलश्रवणें मीं संतुष्ट । महर्षींनो देईन सकल अभीष्ट । आतां वर मागा जो इष्ट । शंका सारी सोडोनियां ॥४९॥
शौनकादि तेव्हं प्रार्थिती । तुमची भक्ति आम्हांप्रती । द्यावी शांतिप्रद जी जगती । जें जें इच्छिलें तें तें प्राप्त होवो ॥५०॥
आम्हांसी गाणपत्य करी । सर्वांसी तूं उद्धरी । हाचि द्यावा वर जरी । प्रसन्न तूं आम्हांवरी ॥५१॥
तथाऽस्तु ऐसें म्हणत । गणेश ब्रह्मनायक तैं विचारित । व्यासादी सर्वांस ह्रदयावांछित । तोही सांगें तैसेंची ॥५२॥
ते सर्वही व्यक्तिगत । गणाध्यक्षास प्रार्थित । त्यांचे पुरवून मनोरथ समस्त । सूतासी म्हणे विघ्नप ॥५३॥
नंतर गणेश सूताप्रत । म्हणे सूता महाभागा सांप्रत । वर माग जो इच्छित । महापुण्य तूं केलें ॥५४॥
हया द्विजांस मुद्‍गल पुराण । तूं कथिलें हें महान । आतां तुझ्या भक्तिभावें प्रसन्न । पुरवीन तुझे मनोरथ ॥५५॥
त्यानें सांगितलें ईप्सित । गणेश तथाऽस्तु त्यास म्हणत । तदनंतर धूम्रवर्ण अंतर्धान पावत । गजानन स्वानंदस्थ ॥५६॥
ते संतुष्टचित्त समस्त । आपापल्य स्थानीं जात । मौद्‍गल पुराणाचा आश्रय घेत । गणेशासी भजती नेमें ॥५७॥
ही मुद्‍गलोक्तसंहिता असत । वेदप्रशस्त सर्वस्तुत । तेवीस हजार श्लोकयुक्त । तैसीच अर्ध शताधिक ॥५८॥
चारशे अठ्ठावीस अध्यास । नव खंडात्मक ही अमेय । सर्व सिद्धिमयी ख्यात ज्ञेत । गणेशभक्तांसी सर्वदा ॥५९॥
मुद्‍गलें ही संहिता कथिली सर्वांच्या हितास्तव भली । शब्दब्रह्म रह्स्ययुक्त झाली । साक्षात ब्रह्मप्रदायिनी ॥६०॥
आतां संपूर्ण ग्रंथाची । अवतरणिका वर्णितों साची । प्रथमखंडीं वक्रतुंडाची । कथा चौपन्न अध्यायांत ॥६१॥
पहिल्या अध्यायांत । शौनकसूतसंवाद ख्यात । दक्षनंदिविवाद उक्त । असे दुसर्‍या अध्यायीं ॥६२॥
तिसर्‍या अध्यायीं पार्वतीदेहत्याग । चवथ्यात दक्षचरित सुभग । पार्वतीप्रश्न विचार चांग असे पांचव्या अध्यायीं ॥६३॥
सहाव्यांत प्रकृतिपुरुषवरप्रदान । सातव्यांत तत्त्वकृतस्तुति वर्णंन । गुणेशवरप्रदान । आठव्यांत वाचावें ॥६४॥
नवव्यांत अष्टधा प्रकृतिवर्णन । दहाव्यांत नाना ब्रह्मांडवर्णन । पंचदेव वरप्रदान । अकराव्यांत वर्णिलें असे ॥६५॥
बाराव्यांत ब्रह्माविष्णुविवाद । तेराव्यांत पंचदेवविवाद । गणेशप्रादुर्भाव सुखद । चवदाव्यांत कथिला असे ॥६६॥
पंधराव्यांत गणेशप्रसन्नभाव । सोळाव्यांत असे अपूर्व । गणेशगीतासार गौरव । महत्त्वपूर्ण गणेशभक्तांत ॥६७॥
शिवपार्वती संवाद समाप्ती । सतराव्यांत त्याची उक्ती । मुद्‍गल देवदूत करिती । संवाद अठराव्या अध्यायीं ॥६८॥
एकोणिसाव्या अध्यायांत । अंगिरा मुद्‍गलसंवाद ख्यात । गणेशमुद्‍गलसमागम वर्णित । विसाव्यांत बोधप्रद ॥६९॥
एकविसाव्या अध्यायांत । गणेशस्तोत्रोत्तम वर्णन शोभत । मुद्‍गलवरप्रदान कथित । बाविसाव्या अध्यायीं ॥७०॥
तेविसाव्यांत शोभन । मत्सरासुरतपोवर्णन । मत्सरासुरसमागम मोहन । चोविसाव्या अथ्यायीं ॥७१॥
त्याच्या सेनेचें वर्णंन । पंचविसाव्या अध्यायीं असून । पाताळविजय त्याचा महान । सविसाव्यांत वर्णिलासे ॥७२॥
सत्ताविसाव्यांत इंद्र पराजय । मत्सरासुराचा विजय । अठ्ठाविसाव्यांत अजेय । मत्सरासुराचें चेष्टित ॥७३॥
शिवमत्सरासुरसमागम । एकोणतिसाव्यांत शोभन । शिवादींचा पराजय कथन । तिसाव्यांत वर्णिलें असे ॥७४॥
दत्तात्रेयसंगम एकतिसाव्यांत । वक्रतुंडप्रादुर्भाव नंतर होत । बत्तिसाव्या अध्यायांत । सुरस असे कथानक ॥७५॥
मत्सरासुरविचारवर्णन । तेहेतिसाव्यांत असून । देवासुरयुद्धवर्णन । चवतिसाव्या अध्यायीं ॥७६॥
शिवविजयाची कथा अद्‍भुत । वाचावी पस्तिसाव्यांत । सुंदरप्रियविषयप्रियवध होत । छत्तिसाव्यांत ती कथा ॥७७॥
सदतिसाव्यांत मनोरम । मत्सरासुराचा समागम । वक्रतुंडविनय अभिराम । अडतिसाव्या अध्यायांत ॥७८॥
तदनंतर वक्रतुंड अंतर्धान । पावले त्याचें वर्णन । एकोणचाळिसाव्यांत मनमोहन । ब्रह्मतपश्चरण चाळिसव्यांत ॥७९॥
दंभासुरराज्याभिषेक । एकेचालिसाव्या अध्यायीं वर्णन सुरेख । दंभासुरविजय विवेक बेचाळिसाव्या अध्यायीं ॥८०॥
दंभासुरदूतसंवाद । त्रेचाळिसाव्यांत श्रुतिसुखद । दंभासुरविचार बोधप्रद । चव्वेचाळिसाव्यात वर्णिलासे ॥८१॥
पंचेचाळिसाव्या अध्यायांत । दंभासुराची शांति होत । वामनवरप्रदान असे वर्णित । सेहेचाळीसाव्या अध्यायीं ॥८२॥
वामनचरिताचें वर्णन । सत्तेचाळिसाव्यांत प्रसन्न । ऋचीकगृहस्थाश्रम वर्णन । अठ्ठेचाळिसाव्यांत वाचावें ॥८३॥
याज्ञवल्क्य विश्वामित्रसमागम । एकूणपन्नासाव्यांत मनोरम । दिवोदासमहिमा अभिराम । पन्नासाव्यांत वर्णिलासे ॥८४॥
काशीशिववरप्रदान । एकावन्नाव्यांत त्याचें कथन । याज्ञवल्क्यनारायणसंप्रश्न । बावन्नाव्या अध्यायीं ॥८५॥
नारायणयाज्ञवल्क्यसंवाद । त्रेपन्नाव्यांत कर्णसुखद । वक्रतुंडचरित्र बोधप्रद । चौपन्नाव्यांत समाप्ति त्याची ॥८६॥
ऐसा हा प्रथम खंड । जेथ स्तविला वक्रतुंड । तदनंतर एकदंतकथा उदंड । दुसर्‍या खंडीं शोभली ॥८७॥
ब्रह्मसृष्टिप्रारंभ पहिल्या अध्यायांत । नारदशापानिवर्तन दुसर्‍यांत । तिसर्‍यांत नारदभक्तिवर्णन ख्यात । मधुकैटकवध चवथ्यांत ॥८८॥
पाचव्यांत स्वायंभुववरप्रदान । सहाव्यांत दक्ष कन्यावंश कथन । सातव्यांत भोगमोक्षवर्णन । दत्तचरित्र आठव्यांत ॥८९॥
प्रियव्रतराज्यप्राप्तिकथा । नवव्या अध्यायांत गाथा । दहाव्यांत द्वीपवर्णन तत्त्वता । भूगोलवर्णन अकराव्यांत ॥९०॥
सूर्यमंडळाचें वर्णन । नवग्रहरथादींचें कथन । ऊर्ध्वस्थ लोकांचें निरूपण । बारा ते चवदाव्यांत ॥९१॥
पंधराव्यांत सप्तपाताळ वर्णन । ऋषभ चरित सोळाव्यांत पावन । सतराव्यांत पुलह उपदेश असून । अठराव्यांत भरतमृगदेहत्याग ॥९२॥
चौरवध एकोणिसाव्यांत । विसाव्यांत जडभरतरहूगण भेटत । रहूगणांच्या सिद्धिप्राप्तीचें असत । वर्णन एकविसाव्यांत ॥९३॥
जडभरतचरित ध्रुवचरित । अक्रनुमें बावीस तेविसाव्यांत । पृथुयशोवर्णन पृथचरित । चोविस-पंचविसाव्यांत ॥९४॥
सव्विसाव्यांत प्राचीन ब्रर्हिषचरित । सत्ताविसाव्यांत प्रचेतसचरित । कश्यप सृष्टीचेम वर्णन ख्यात । अठ्ठाविसाव्या अध्यायांत ॥९५॥
एकोणतिसाव्यांत वसिष्ठतपवर्णन । तिसाव्यांत पराशरवरप्रदान । पराशरसुतोत्पत्ति कथन । एकतिसाव्या अध्यायांत ॥९६॥
गजासुरसैन्याचा वध । बत्तिसाव्यांत असे विशद । गजासुराचा करी वध । त्याचें वर्णन तेहेतिसाव्यांत ॥९७॥
चौतिसाव्यांत व्यासमहिमान । पस्तिसाव्यांत शुकोपाख्यान । छत्तिसाव्यांत गौतमचरितवर्णन । नृसिंहमाहात्म्य सदतिसाव्यांत ॥९८॥
वराहमाहात्म्या अडतिसाव्यांत । एकोणचाळीसाव्यांत वनोत्पत्ति कथित । अग्निमाहात्म्य चाळिसाव्यांत । च्यवनतपोवर्णन एक्केचाळिसीं ॥९९॥
बेचाळिसाव्यांत भृगुचरित । च्यवन माहात्म्य त्रेचाळिसाव्यांत । महासुर-राज्याभिषेक वर्णन ज्ञात । चव्वेचाळिसाव्या अध्यायीं ॥१००॥
पंचेचाळिसाव्यांत असे ख्यात । मदासुरस्वर्गविजय वृत्तान्त । तारकासुरसामवर्णन असत । सेहेचाळिसाव्या अध्यायीं ॥१०१॥
इंद्रतारकसमागमाचें वर्णन । सत्तेचाळिसाव्यांत असून । इंद्रपराजयकथन । अठ्ठेचाळिसावे अध्यायीं ॥१०२॥
शिवादि देव पराजय । मदासुराचा होत विजय । याचें वर्णन असे ज्ञेय । एकूणपन्नास-पन्नासांत ॥१०३॥
एक्कावन्नाव्यांत वृत्तान्त । सनत्कुमारदेवसमागमाचा असत । एकदंत प्रसन्नभाव वर्णित । बावन्नाव्या अध्यायीं ॥१०४॥
मदासुरपराजय त्रेपन्नाव्यांत । मदासुरशाअंतिप्राप्ति चौपन्नाव्यांत । मदासुरचरितसमाप्ति होत । पंचावन्नाव्या अध्यायीं ॥१०५॥
छप्पन्नाव्यांत विनायकाचा होत । प्रवेश काशीनगरींत । भ्रुशुंडीभक्तिवर्णन ख्यात  सत्तावन्नाव्या अध्यायीं ॥१०६॥
यमशाप वर्णन अठ्ठावन्नाव्यांत । एकोणसाठांत कुंडसंभवचरित । भ्रुशुंडीब्राह्मणत्व वर्णन असत । साठावें अध्यायीं ॥१०७॥
एकसष्टाव्यात भ्रुशुंडी बासष्टाव्यांत विनायक चरित । त्रेसष्टाव्यांत शनिसमागम ख्यात । विष्णु दैत्यवर्णन चौसष्टाव्यांत । पासष्टीं पुष्टिपतिउपाख्यान ॥१०८॥
तेथे अगस्त्याचा द्रव्यप्रयत्न । सहासष्टाव्यांत कृष्णराधा शापवर्णन । राधाकृष्ण गोलोक प्राप्तिकथन । वाचा सदुष्टाच्या अध्यायांत ॥१०९॥
अडुसष्टाव्यांत पुष्टिपति चरित । देवहूतिकर्दम शांति लाभत । त्याचें वर्णन पुढें असत । एकूणसत्तराव्या अध्यायीं ॥११०॥
सत्तराव्यांत चिंतामणिहरण । एक्काहत्तरीं कपिलवर प्रदान । ब्राहत्तराव्यांत गणासुरवधवर्णन । गणेश सत्तेचें प्रत्यंतर तें ॥१११॥
गृत्समदप्रल्हादांचा संवाद । समाप्त होई सुखप्रद । त्र्याहत्तरांत तें विशद । वृत्त असे द्वितीय खंडीं ॥११२॥
चौर्‍याहत्तराव्या अध्यायांत । चरित्रमाहात्म्य वर्णिलें असत । ऐशापरी देव एकदंत । स्तविला प्रामुख्यें दुसर्‍या खंडीं ॥११३॥
आतां तिसर्‍या खंडाची । अवतरणिका महोदरचरिताची । चर्चा रवि वालखिल्य प्रश्नाची । प्रथमाध्यायीं तृतीय खंडांत ॥११४॥
दुसर्‍या अध्यायांत । सूर्यास शांतिप्रदान लाभत । सूर्यवरप्रदान वृत्त तिसर्‍या अध्यायीं ही कथा ॥११५॥
चौथ्यांत कामचरित । पाचव्यात स्कंदमाहात्म्य वर्णित । मोहासुरराज्याभिषेक वृत्तान्त । वाचावा सहावे अध्यायीं ॥११६॥
मोहासुरविजय वर्णन । सातव्यांत असे त्याचें कथन । आठव्यांत देवर्षिवरप्रदान । मोहासुरज्ञानप्रदान नवव्यांत ॥११७॥
दहाव्यांत मोहासुरशांति । अकराव्यांत महोदर अंतर्धान पावती । नरनाराय विष्णु संवाद करिती । वर्णंन त्याचें बाराव्यांत ॥११८॥
नरनारायणमार्कंडेय समागम । तेराव्य अध्यायांत अभिराम । चौदाव्यांत मायावर्णन सकाम । पंधराव्यात कालगति वृत्त ॥११९॥
सोळाव्यांत युगधर्म वर्णन । सतराव्यांत कलियुग आख्यान । ब्रह्मचर्याश्रम वर्णन । अठराध्या अध्यायांत ॥१२०॥
आश्रमधर्म वर्णन एकोणिसाव्यांत । वर्णधर्मप्रकाश विसाव्यांत । देवपितृधर्म वर्णन ख्यात । एकविसाव्या अध्यायीं ॥१२१॥
बाविसाध्यांत मांधात्याचें चरित । अंबरीष चरित्र तेराव्यांत । चोविसाव्यांत असे वृत्त । मुचुकुंदचरिताचें ॥१२२॥
सगरभगीरथाचें चरित । पंचविसाव्यांत असे वर्णित । सव्विसाव्यांत रामचंद्र चरित । रामायण कथांश हा ॥१२३॥
सूर्यं वालाखल्पसंवाद समाप्ती । सत्ताविसाव्यांत त्याची उक्ती । अठ्ठाविसाव्यांत बुधोत्पत्ती । एकोणतिसाव्यांत चरित्र पुरूरव्याचें ॥१२४॥
तिसाव्यांतनहुषरित । एकतिसाव्यांत ययातिवृत्तान्त । बत्तिसाव्यांत धनकास व्रत । उपदेशिलें त्याची कथा ॥१२५॥
तेहेतिसाव्यांत वर्णन । कृतवीर्यव्रत प्राप्तीचें शोभन । कृतवीर्यचरित पावन । चौतिसाव्या अध्यायीं ॥१२६॥
सहस्त्रार्जुनास । निमंत्रण । पस्तिसाव्यांत त्याचें वर्णन । रेणुकाजमदग्निसंजीवनकरण । छत्तिसाव्या अध्यायीं ॥१२७॥
सदतिसाव्य आध्यायांत । परशुरामचरित प्रख्यात । हरिवंशाचें वर्णन वर्तत । अडतिसाव्या अध्यायीं ॥१२८॥
एकूणचाळिसाव्या अध्यायांत । विष्णुदेहधारणाचें वृत्त । चाळिसाव्यांत पांडवचरित । अपूर्ण असे कथिलेलें ॥१२९॥
युधिष्ठिरकृष्ण समागम । एकेचाळिसाव्यांत अभिराम । लक्ष्मीनारायणसंवाद परम । शोभनीय वेचाळिसाव्यांत ॥१३०॥
महालक्ष्मीस वरप्रदान । त्रेचाळिसाव्यांत त्याचें वर्णन । ज्ञानादि वरप्राप्तिकथनं । चव्वेचाळिसाव्या अध्यायीं ॥१३१॥
पूर्णानन्दावतारवर्णन । पंचेचाळिसाव्यांत त्याचें कथन । सेहेचाळिसाव्यांत कथन । असे ब्रह्मयज्ञाचें ॥१३२॥
ब्रह्मयज्ञांत वेदनिर्णय होत । त्याचें कथन सत्तेचाळिसाव्यांत । शुक्रशिष्यसुबोधसंवाद ख्यात । अठ्‍ठेंचाळिसाव्या अध्यायीं ॥१३३॥
एकूणपन्नासाव्या अध्यायांत । सुबोधभक्ति असे वर्णित । पन्नासाव्यांत युघिष्ठिरचरित । श्रवणफल एकावन्नाव्या अध्यायीं ॥१३४॥
चौथ्या खंडांत असे प्रख्यात । चतुर्थीव्र्ताचें माहात्म्य अद्‍भुत । प्रत्येक चतुर्थीची कथा पुनीत । सविस्तर वर्णिली असे ॥१३५॥
गजाननाचें हें चरित । वर्णन त्याचें चौथ्या खंडांत । अवतरणिका संक्षेपांत । आतां चतुर्थं थंडांची ॥१३६॥
चतुर्थी तिथी तप करित । पहिल्या अध्यायीं त्याचें वृत्त । शुक्ल कृष्ण चतुर्थी लाभत । वरदान दुसर्‍या अध्यायीं ॥१३७॥
प्रतिपदादिव्रतवर्णन तिसर्‍यांत । दशरथव्रतोपदेश चौथ्यांत । चतुर्थीविवेक वर्णन ख्यात । पांचव्या अध्यायीं चतुर्थ खंडीं ॥१३८॥
चन्द्रदर्शनदोषहरण । सहाव्यांत त्याचें वर्णन । सातव्यांत असे कथन । भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रताचें ॥१३९॥
आश्विन कार्तिक शुक्ल चतुर्थी । आठव्या नवव्यांत या व्रताची उक्तीं । मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीं । व्रत हें दहाव्या अकराव्यांत ॥१४०॥
माघ फाल्गुन चैत्रांत । वैशाख ज्येष्ठ आषाढांत । शुक्ल चतुर्थीचें व्रत । तेराव्या ते सतराव्या अध्यायीं ॥१४१॥
श्रावण शुक्ल चतुर्थी व्रत । तैसेंचि मलमास शुक्ल चतुर्थी व्रत । वर्णिलें असे अठराव्यांत । एकोणिसाव्यांत अनुक्रमें ॥१४२॥
माघ फाल्गुन चैत्रांत कृष्ण चतुर्थीचें व्रत । त्याचें माहात्म्य विसाव्यांत । एकवीस वाविसाव्या अध्यायीं ॥१४३॥
वैशाख ज्येष्ठ आषाढांत । श्रावण भाद्रपद आश्वित कृष्ण पक्षांत । चतुर्थी तिथीव्रत आख्यात । चोविसापासून अठ्‍ठाविसाव्यांत ॥१४४॥
कार्तिक मार्गशीर्ष पौषांत । कृष्ण चतुर्थी मलमासांत । एकोणतिसाव्यापासून असत । वर्णन बत्तिसाव्यापर्यंत त्याचें ॥१४५॥
शमीमूळ चतुर्थी व्रताचरण । तेहेतिसाव्यांत त्याचें वर्णन । वसिष्ठ दशरथ संवाद कथन । चौतिसाव्यांत समाप्ति त्याची ॥१४६॥
चतुर्थी उद्यापन निरूपण । पस्तिसाव्यांत त्याचें कथन । लोभासुरवप्राप्ति वर्णन । कथा ही छत्तिसाव्यांत ॥१४७॥
सदतिसाव्यांत शोभन । लोभासुरास इन्द्रपदप्राप्तीचें वर्णन । विष्णुपराजयाचें कथन । अडतिसाव्या अघ्यायांत ॥१४८॥
एकोणचाळिसाव्या अध्यायांत । लोभासुर ब्रह्मांड जिंकित । गजाननाचा प्रादुर्भाव होत । चाळिसाव्या अघ्यायीं ॥१४९॥
एकेचाळिसाव्यांत शुक्रोपदेश वर्णंन । आहे अत्यंत सुजाण । लोभासुर शांतिकथन । बेचाळिसाव्या अघ्यायीं ॥१५०॥
त्रेचाळिसाव्या अघ्यायांत । देवकृत स्तुतिवर्णन पुनीत । सिंदूरशिवाचा समागम होत । चव्वेचाळिसाव्या अघ्यायीं ॥१५१॥
शिवविचारवर्णन । पंचेचाळिसाध्यांत शोभन । शाक्ति मलमाहात्म्य महान । सेहेचाळिसाव्या अघ्यायीं ॥१५२॥
गणेशभक्ताधीनत्वाचें वर्णन । सत्तेचाळिसाव्यांत शोभन । शक्ति मलमाहात्म्य महान । सेहेचाळिसाव्या वाचावा ॥१५३॥
गणेश निर्माल्य माहात्म्य वर्णन । एकूणपन्नासाव्यांत शोभन । विघ्नासुराचें आश्रमगमन । असे पन्नासाव्या अघ्यायीं ॥१५४॥
एकावन्नाव्या अध्यायांत । गजाननचरिताचें महिमान असत । गजाननाचें संपूर्ण चरित । चवथ्या खंडी शब्दबद्ध ॥१५५॥
पाचव्या खंडांत विलसत । लंबोदराचें चरित । त्याची अवतरणिका सांप्रतपरिसावी सज्जनहो ॥१५६॥
असित नैध्रुव संवादीं तप वर्णन । पहिल्या अध्यायांत पावन । दुसर्‍यांत भस्मासुरवध कथन । तिसर्‍यांत क्रोधासुरास राज्यप्राप्ति ॥१५७॥
क्रोधासुरब्रह्माण्डविजय चौथ्यांत । देवर्षिवरप्रदान पाचव्यांत । सहाव्यांत देवासुर युद्धवर्णन असत । सातव्यांत क्रोधासुरसमागम ॥१५८॥
आठव्यांत क्रोधासुर शांति । नवव्यांत लंबोदर देवर्षिकृत स्तुती । वत्सरा सूरशांति । दहाव्या अघ्यायीं वर्णिली ॥१५९॥
अकराव्यांत लंबोदरब्रह्मवर्णन । शक्तस्वरूपावतार वर्णन । बाराघ्या अध्यायांत शोभन । तेराव्यांत शक्तिवरप्रदान ॥१६०॥
चौदाव्यांत शिवविष्णुगर्वहरण । वाचावें नंतर पावन । शक्तिविनायक माहात्म्य शोभन । शेषातिदुःख वर्णन सोळाव्यांत ॥१६१॥
सतराव्यांत शेषयोगोपदेश । अठराव्यांत शेषाख्यान वर्णन विशेष । मूषकदेवसमागम खास । एकोणिसाव्या अध्यायीं ॥१६२॥
मूषकगमायाकरासुरसमागम । विसाव्यात अभिराम । मूषकग अवतार चरित शोभन । असे एकविसाव्या अध्यायीं ॥१६३॥
बाविसाव्यांत शक्तिपुत्रचरित । गाणपत्यदीक्षा तेविसाव्यांत । गाणपत्यस्वरूप वर्णन असत । चोविसाव्या अध्यायीं ॥१६४॥
पंचविसाव्यांत शमीदंदार । वर लाभति त्याचें वर्णन सुंदर । शमीमंदार स्पर्शमहिमा उदार । सव्विसाव्यांत वर्णिलासे ॥१६५॥
सत्ताविसाव्यांत दूर्वोत्पत्ति कथा । तदनंतर दूर्वापत्रस्पर्शमहिमा सर्वथा । एकोणतिसाव्यांत वार्ता । त्रिशिरम चरित्राची ॥१६६॥
तिसाव्यांत दूर्वामाहात्म्य वर्णन । एकतिसाव्यांत तुळसीवर्जनकारण । बत्तिसाव्यांत तुलसीवरप्रदान । आकर्षंक जी कथा ॥१६७॥
तुलसी समर्पण वर्णंन तेहेतिसाव्यांत । चौतिसाव्यांत रुक्मांगद चरित । गृत्समद गणेश समागम होत । पस्तिसाव्या अध्यायीं ॥१६८॥
गृत्समदवरप्रदान । छत्तिसाव्यांत त्याचें वर्णन । गृत्समद नित्यकर्म वर्णन । सदतिसाव्यांत वाचावें ॥१६९॥
गृत्समदप्रोक्तमनसपूजा कथन । अडतिसाव्यांत मनमोहन । गृत्समदप्रोक्त ब्राह्मपूजा वर्णन । एकोणचाळिसाव्या अध्यायीं ॥१७०॥
चाळिसाव्या अध्यायांत । स्वानंदलोक वर्णन असत । स्वानंदस्थितीचें अद्‍भुत । वर्णन एकेचाळिसाव्यांत ॥१७१॥
बेचाळिसाव्या अध्यायांत । चिंतामणि अन्तर्धान पावत । भक्तिमार्ग वर्णन उक्त । त्रेचाळिसाव्या अध्यायीं ॥१७२॥
ध्यानदूर्वादिपूजा विधि वर्णन । चव्वेचाळिसाव्यांत असून । लंबोदर चरिताचें महिमान । पंचेचाळिसाव्या अध्यायीं ॥१७३॥
ऐसें हें लंबोदर चरित । पांचव्या खंडीं असे वर्णित । तें वाचितां लाभत । स्वानंद गणेश भक्तांसी ॥१७४॥
आतां ऐका अवतरणिका । सहाव्या खंडाची प्रवेशिका । विकट चरिताची प्रेरका । कथा असे हया खंडांत ॥१७५॥
प्रथमाध्यायीं शक्तिध्यान । दुसर्‍यांत शिवविष्णूंस वरप्रदान । कामासुर राज्यप्राप्ति वर्णन । तिसर्‍या अध्यायीं वाचावें ॥१७६॥
चवथ्यांत कामासुर विजय वर्णन । पांचव्यांत मुद्‍गल देव भेटीचें कथन । भ्रूशुंडी पंचदेव समागम पावन । कथिला महत्त्वें अध्यायीं ॥१७७॥
सातव्यांत स्वानंद क्षेत्रस्वरूप वर्णन । नंतर नाना क्षेत्र देवोत्पत्तिवर्णन । आठव्या अध्यायांत शोभन । वाचून आनंद गणेशभक्तां ॥१७८॥
मयूरेशद्वारयात्राविधि वर्णन । नवव्या अध्यायीं असून । दहाव्यांत द्वाररहस्य कथन । अकराव्यांत क्षेत्र प्रमाण वृत्त ॥१७९॥
मयूरेश क्षेत्रवास करित । त्याचें शुभाशुभ उक्त । बाराव्या अध्यायांत । कथा त्याची वर्णिली असे ॥१८०॥
मयूरेश दंडकारण्याप्रत । वरप्रदान अपूर्व देत । तेराव्यांत त्याचा वृत्तान्त । चौदाव्यांत द्वारयात्रा ॥१८१॥
देवागारद्वारयात्रा महिमान । पंधराव्यांत त्यांचें वर्णन । गर्भागार यात्रा माहात्म्य वर्णन । सोळाव्या अध्यायांत ॥१८२॥
मयूरेश क्षेत्रीं मरणप्राप्ती । सतराव्यांत त्याची ख्याती । गर्भगाराचें प्रमाण वर्णिती । मुद्‍गल अठराव्या अध्यायीं ॥१८३॥
एकोणिसाव्यांत क्षेत्रवासी चरित । मलत्यागयातनावृत्त कथित । यात्रार्थ प्रर्वश फलादि ख्यात । एकविसाव्या अध्यायीं ॥१८४॥
बाविसाव्यांत क्षेत्रसंन्यास वर्णन । गणेशकुंडचरित्र नंतर पावन । तेविसाव्यांत त्याचें कथन । नंतर ब्रह्मकमंडलु उत्पत्ति कथा ॥१८५॥
चोविसाव्या अध्यायांत । ब्रह्मकमंडलु तीर्थ चरित । असे वृत्त पंचविसाव्यांत । सविसाव्यांत वर्णन सप्ततीर्थाचे ॥१८६॥
ब्रह्मकमंडलूंत जीं तीर्थें वसत । त्यांचें वर्णन सत्ताविसाव्यांत । नग्न भैरव प्रशंसा वर्णित । अठ्ठाविसाव्या अध्यायीं ॥१८७॥
भ्रुशुंडीदेवेंद्रसंवाद । समाप्त होत । एकोणतिसाव्यांत विशद । मयूरेशक्षेत्रमाहात्म्य सुखद । सामाप्ति तिसाव्या अध्यायांत ॥१८८॥
एकतिसांव्यात विकट प्रादुर्भाव । देवदैत्यसमागम अपूर्व । बत्तिसाव्यांत विशेषभव । कामासुरपुत्राचा वध नंतर ॥१८९॥
तेहेतिसाव्यांत ती कथा असत । कामासुरविचार चौतिसाव्यात । कामासुर शांत होत । पस्तिसाव्या अध्यायीं ॥१९०॥
विकटावतार समाप्त । छत्तिसाव्या अध्यायांत । गुणेशावतार वृत्तान्त । सदतिसाव्यांत वर्णिलासे ॥१९१॥
अडतिसाव्या अध्यायांत । बालक्रीडा दर्णन असत । कमलासराचा वध वृत्तान्त । एकोणचाळिसाव्या अध्यायीं ॥१९२॥
विष्णु आदींची पराधीनता । चाळिसाव्यांत तत्त्वता । मयूरेशचरित वार्ता । एकेचाळिसाव्या अध्यायीं ॥१९३॥
बेचाळिसाव्या अध्यायांत । सूर्यावताराचें चरित । भानुविनायक चरित । त्रेचाळिसाव्यांत कथिलें असे ॥१९४॥
विकट वरद चरित । चव्वेचाळिसाव्यांत वर्णित । विकट चरित होत समाप्त । पंचेचाळिसाव्या अध्यायीं ॥१९५॥
विकट चरित असे पावन । सहाव्या खंडीं संपूर्ण । सातब्या खंडीं असे वर्णंन । विघ्नराज चरिताचें ॥१९६॥
त्यांत पहिल्या खंडांत । दितिशोकाचें वर्णन असत । शिवपार्वतीसमागम कथन । चौथ्या अध्यायीं शोभतसे ॥१९८॥
पाचव्यांत ममासुर राज्यभोग वर्णन । तदनंतर विघ्नराजप्रादुर्भाव ज्ञान । सहाव्या अध्यायांत वृत्त शोभन । सातव्यांत गर्वहरण ममासुराचें ॥१९९॥
ममासुराची शांति होत । विघ्नेशचरितक्षेत्र युक्त । वर्णन तें नवव्यांत । दहाव्यांत विष्णूचे अवतार ॥२००॥
अकराव्यांत असे वर्णन । लक्ष्मीविनायकाचें शोभन । शूर्पकर्णावतार वर्णंन । बाराव्यांत वाचावें ॥२०१॥
तेराव्या अध्यायांत । दत्तगीता असे प्रख्यात । चौदाव्यांत दितिवरप्रदान वर्णित । गणेशभक्तां सुखदायक ॥२०२॥
पंधराव्यात वर्णन । चतुर्भुजावतार विक्रमाचें शोभन । विघ्नराजचरित महिमान । सोळाव्यांत कथिलें असे ॥२०३॥
विघ्नराजाचें ऐसें चरित । सातवा खंड त्यानें शोभत । आठव्या खंडीं धूम्रवर्णं वृत्तान्त । परमादरें वाचावा ॥२०४॥
प्रथमाध्यायीं अहंची उत्पत्ति । तदनंतर त्यास राज्यप्राप्ति । ब्रह्मांडविजयाची ख्याति । द्वितीय तृतीय अध्यायांत ॥२०५॥
चवथ्यांत मुनिवार प्रदान । पाचव्यांत अहंकाराचें दमन । अहंकारासुरास ज्ञान । उपदेश सहाव्या अध्यायीं ॥२०६॥
अहंकार शांतिरूप वर्णंन । सातव्यांत वाचा पावन । धूम्रवर्णावतार समाप्ति कथन । असे आठव्या अध्यायीं ॥२०७॥
नवव्यांत धूम्रवर्णं महिमान । दहाव्यांत शिवात्मकावतार वर्णंन । अकराव्यांत पार्वतीगणेशचरित्र शोभन । गुणेशावतार बाराव्यांत ॥२०८॥
बाणासुरवरप्रदान तेराव्यांत । त्यापुढें बानासुरवर्णंसंभव चरित । बुद्धावतार पंधराव्यांत । मुद्‍गलपुराणीं सुरस असे ॥२०९॥
सोळाव्या अध्यायांत । धूम्रवर्णं कलीसी जिंकित । युगवरप्रदान ख्यात । सतराव्या अध्यायंत ॥२१०॥
युगप्रभावकर्मसिद्धिवर्णंन । अठराव्यांत प्रधान । समासवत्सरचरित कथन । एकोणिसाव्या अध्यायीं ॥२११॥
विसाव्यांत मलमासादिव्रत । वरप्रदान लाभत । धूम्रमहिमावर्णन असत । एकविसाव्या अध्यायीं ॥२१२॥
कार्तिकमास माहात्म्य ख्यात । असे बाविसाव्या अध्यायांत । वज्रपंजरकथन असत । तेविसाव्या अध्यायीं ॥२१३॥
मार्गशीर्षमाहात्म्य साधुचरित । चोविसाव्यांत असे वर्णित । विरोचनवधाचें वृत्त । पंचविसाव्या अध्यायीं ॥२१४॥
नाना जनांचें उद्धरण । सव्विसाव्यांत त्याचें वर्णन । शिवदत्तबोध महान । सत्ताविसाव्यांत वाचावा ॥२१५॥
अठ्ठाविसाव्यांत कथन । शुकगीतेचें शोभन । शिवभक्तिप्रदान वर्णन । असे एकोणतिसाव्या अध्यायीं ॥२१६॥
पुनरपि नानाजप उद्धरण । तिसाव्यांत असून । जालंधरवध कथन । एकतिसाव्या अध्यायांत ॥२१७॥
गालवसंशय दूर होत । बत्तिसाव्या अध्यायांत । श्रावाणमासाचें महिमान उदात्त । तेहेतिसाव्या अध्यायीं ॥२१८॥
दधीचिधौम्यसंवाद सुखद । पस्तिसाव्यांत बोधप्रद । मलमासमाहात्म्य सौख्यद । पस्तिसाव्यांत वर्णिले असे ॥२१९॥
संवत्सरव्रतमाहात्म्यवर्णन । छत्तिसाव्यांत शोभन । विभांडव्रतोपदेश कथन । सदतिसाव्या अध्यायीं ॥२२०॥
कल्याणाची दुर्घती । अडतिव्यांत त्याची उक्ती । बल्लाळेश्वराची महती । एकूनचाळिसाव्या अध्यायीं ॥२२१॥
चातुर्मास्यव्रतमहिमान । चाळिसाव्यांत पावन । कौंडिण्यब्रह्मसमागम शोभन । एकेचाळिसाव्यांत वर्णित ॥२२२॥
बेचाळिसाव्या अध्यायांत । गणेशनाम महिमा ख्यात । चतुर्थीरहस्य असे वर्णित । त्रेचाळिसाव्या ती कथा ॥२२४॥
सेहेचाळिसाव्या अध्यायांत । ब्राह्मणस्पत्ययज्ञमहिमाख्यात । त्रिविधजगदाधार निरूपित सत्तेचाळिसाव्या अध्यायीं ॥२२५॥
मासांचें माहात्म्य अठ्‍ठेचाळिसाव्यांत । तदनंतर गणेशह्रदय वृत्तान्त । एकूणपन्नासाव्या अध्यायांत । शेवटीं फलश्रुति वर्णन ॥२२६॥
ऐशी पन्नास अध्यायांत । धूम्रवर्णकथा आठव्या खंडांत । नवव्या खंडीं योगचरित । योगगीता यांत असे ॥२२७॥
प्रथमाध्यायीं स्वसंवेद्यरूपवर्णन । दुसर्‍यांत अयोगचरित कथन । तिसर्‍यांत गणेश स्वरूपवर्णन । चौथ्यांत पूर्णयोगचरित असे ॥२२८॥
चित्तभूमिनिरोधे सार्वभौमयोग । पाचव्यांत त्याचें वर्णन सुयोग । योगगीतेंत अंतरंग । प्रथमाध्याय हा अंसे ॥२२९॥
सहाव्या अध्यायांत । योगचित्तानुभव सुखशांतियुक्त । योगगीतेत हा असत । दुसरा अध्याय अंतर्गत ॥२३०॥
सातव्यांत योगास्थितिवर्णण । योगगीतेचा तृतीय अध्याय शोभन । आठव्यांत योग भ्रष्ठांचें निरूपण । चौथा अध्याय योगगीतेचा ॥२३१॥
नवव्या अध्यायांत वर्णंन । अज्ञान्यांचा क्रमयोगकथन । योगगीतेचा अध्याय पांचवा शोभन तदनंतर विभूतियोग ॥२३२॥
दहाव्यांत विभूतियोग वृत्त । सहावा अध्याय योगगीतेंत । अकराव्यांत तत्त्वविचार ख्यात । योगगीतेंत अध्याय सातवा हा ॥२३३॥
बाराव्यांत शुक्लकृष्णगति । योगगीतेंत आठव्यांत ती । क्षेत्रक्षेत्रज्ञ योगाची महती । तेराव्या अध्यायांत ॥२३४॥
योगगीतेच्या नवमाघ्यायांत । हा क्षेत्रक्षेत्रज्ञयोगयुक्त । चौदाव्या अध्यायीं प्रख्यात । नानामतांचा ऐक्ययो ॥२३५॥
तो योगगीतेंत दहाव्या अध्यायांत । वर्णिला असे महत्त्वयुक्त । पंधराव्यांत गणेशयोग वर्तत । योगगीतेंत अकरावा अध्याय ॥२३६॥
सोळाव्यांत भक्तिरहस्य वर्णन । योगगीतेचा अध्याय बारावा हा पावन । दक्षसिद्धिप्राप्तिवर्णंन । सतराव्या अध्यायीं असे ॥२३७॥
बारा अध्याय योगगीतेंत । असती नवमखंडातर्गंत । संस्कृत ९८९ श्लोकांत । ९६७ ओव्यांची योगगीता ॥२३८॥
अठराव्यांत गणेशस्वरूपवर्णंत । पुराणश्रवणादि विधिवर्णंन । एकोणिसाव्यांत असून । विसाव्यांत पुराणप्रशस्ति महिमा ॥२३९॥
एकविसाव्यात पारायणवर्णन । बाविसाव्यांत माघपारायण । तेविसाव्यांत ज्येष्ठमास पारायण । चोविसाव्यांत विकल्पविजय ॥२४०॥
पंचविसाव्यांत विकल्पप्रताप खंडन । सव्विसाव्यांत असे कथन । मुद्‍गलपुराणश्रवण महिमान । माघादिअर्ध मासांत ॥२४१॥
सत्ताविसाव्यांत श्रवणमहिमान । भाद्रपदासार्धैकमासांत पावन । अठ्ठाविसाव्यांत शोभन महोदरचरित माहात्म्य ॥२४२॥
वार्षिक मौद्‍गलश्रवण महिमान । एकोणतिसाव्यांत त्याचें वर्णन । मौद्‍गल नित्यश्रवण माहात्म्य कथन । तिसाव्या तें अध्यायीं ॥२४३॥
वक्रतुंडचरित श्रवणमहिमान । एकतिसाव्यांत परम पावन । एकदंतचरित माहात्म्य कथन । असे बत्तिसाव्या अध्यायीं ॥२४४॥
महोदरचरितमाहात्म्य वर्णन । तेहेतिसाव्यांत पावन । गजाननचरित्र श्रवणपठणमहिमान । चौतिसाव्या अध्यायांत ॥२४५॥
पस्तिसाव्यांत लंबोदरचरित । विकटखंड माहात्म्य छत्तिसाव्यांत । विघ्नराजखंड श्रवण माहात्म्य ख्यात । सदतिसाव्या अध्यायीं ॥२४६॥
धूम्रवर्णचरित अडतिसाव्यांत । नवमखंड माहात्म्य ख्यात । तें वाचा एकोणचाळिसाव्या अध्यायांत । चाळिसाव्यांत तेंच वर्णन असे ॥२४७॥
या एकेचाळिसाव्या अध्यायांत । पुराणसमाप्ति वर्णन असत । ऐशीं ही अवतरणिका समाप्त । श्रीगणेश प्रसन्न होवो ॥२४८॥
पंधरा मे एकोणिसशें एकूणसत्तर । वैशाख कृष्ण चतुर्थी थोर । अंगारकी संकष्टी पावनकर । एकोणीसशे एक शके ॥२४९॥
मंगळवारीं गणेशसुत । सरस्वतीचा तनय अर्पित सीताराम देसाईकुल जात । अनुवादपूजा श्रीगणेशचरणीं ॥२५०॥
जैसी जमली तैसी सेवा केली । श्रीगजाननचरणीं वाहिली । श्री विनायक अप्पांनी दिली । जोशी यांनी प्रेरणा ॥२५१॥
तैसीच स्फूर्ति आणि संयोजन । श्री अनिरुद्ध साबाजी राजाध्यक्ष यांनी करून । मजला उत्साह देऊन । करविली ही श्रीगणेशसेवा ॥२५२॥
मूळ संस्कृत मुद्‍गल पुराण । पुनरपि त्याचें मुद्रण । करण्या झटले रात्रंदिन । अप्पाशास्त्री जोशी सदा ॥२५३॥
तैसेचि अविरत प्रयत्न । केले राजाध्याक्षांनीं महान । उभयता झाले स्वानंदांत विलीन पूर्णहुति देण्यापूर्वी ॥२५४॥
परी तदनंतर श्री विनायकसुत । प्रत्यक्ष गणेश धीर देत । जोशी कुलोत्पन्न तो वाहत । धुरा कार्यवाहपदाची ॥२५५॥
श्री अमरेंद्र गाडगीळ कुलजात । अध्यक्षपद भूषवित । श्रीमुद्‍गल प्रकाशनांत । मंडळ प्रयत्नशील झालें ॥२५६॥
डाँ. त्र्यंबक ताम्हनकर, श्री . विजय देवधर । श्री. विनायक अनिरुद्ध पुत्र । तैसेचि श्री. माधव केळकर । प्राध्यापिका तोरसकर प्रयत्नशील ॥२५७॥
मंडळाचे सद्स्य गणेशभक्त । श्री. भा. मं. जोशी मोरगावस्थ । तैसेचि प्राध्यापक महाशब्दे मोरेश्वर व्याकरण पंडित । श्री. नेरूरकर साहाय्य देती ॥२५८॥
तैसेचि पेंडसेशास्त्री करिती । प्रचार गणेशभक्तीचा भावभक्ती । श्रीशंकरराव दाते साहाय्य होती । पुराणाच्या मुद्रणीं ॥२५९॥
श्री. पारखे श्रद्धायुक्त । कागद पुरविती मुद्‍गलपुराणकार्यार्थ । त्यांचें साहाय्य वर्णनातीत । तैसेंचि चिंचवड मोरया संस्थानाचें ॥२६०॥
श्रीमुद्‍गलेश्वर महाराज आले । मुद्‍गलमाहात्म्य सांगितलें । आर्थिक साहाय्यही केलें । या मराठी अनुवादास्तव ॥२६१॥
श्रीम, पेंडुरकर तैसे श्री. दादा पुराणिक । श्री. बेडेकर बाठिया सहायक । श्री. रावदसकर श्री. रायकर कार्यप्रेरक । द्रव्यसाहाय्य करोनियां ॥२६२॥
श्री. छेडा सौ. नाईक । श्री. बेडेकर बाठिया सहायक । श्री. रावदसकर श्री. रायकर कार्यप्रेरक । द्रव्यसाहाय्य करोनियां ॥२६३॥
भारत सरकारें साहाय्य केलें । संस्कृत ग्रंथ पुनः प्रकाशनार्थ भलें । श्री. ढवळे प्रकाशकांनी केलें । ग्रंथविक्रीस साहाय्य ॥२६४॥
तैसेचि असंख्य उदार हात गणेशप्रसादद्वारें साहाय्य करित । गणेशभक्तांनीं मुद्रणप्रत लेखनांत । स्वयंस्फूर्त मदत केली ॥२६५॥
ऐश्या रीती हा अधिकृत ग्रंथ । श्रीगणेश सांप्रदायांत । अनुवादिला प्राकृतांत । श्रीगुरुकृपेमुळें ॥२६६॥
मीं केवळ निमित्तामत्र । कर्ता करविता तो गणेश सर्वत्र । तयाच्या चरणीं भावार्त । शब्ददूर्वा या बाहिल्या ॥२६७॥
कवित्याची प्रौढी नसत । केवळ भक्तिभाव मनांव । गणेशभक्त गोड मानोत । मायबोलीत हा अनुवाद ॥२६८॥
वाचून हा ग्रंथ प्राकृत । इच्छा होवो मूळ संस्कृत । वाचीन ऐशी ह्रदयांत । समस्त वाचक भक्तांच्या ॥२६९॥
मूळ ग्रंथाचा प्रसाद । यांत कैसा यावा विशद । तरीही भावबळें सुखप्रद । होवो मराठी अनुवाद हा ॥२७०॥
या मुद्‍गल पुराणाचें वाचन । करून व्हावें गणेशज्ञान । योगगीता वाचून । योगानंद प्राप्त व्हावा ॥२७१॥
लाभोत ऐहिक पारलौकिक । सुख सारें येथ भाविक । सर्वत्रांस आनंददायक । होवो हा ग्रंथ सर्वदा ॥२७२॥
पाठका वाचका लाभावें इच्छित । या गणेशपुत्रास आत्मज्ञान उदात्त । लाभूनिया गणेशसेवेंत । जीवन सारें धन्य हावें ॥२७३॥
सारे होवोत सुखी निरोगी । सर्वांस लाभो भद्र जगीं । कोणीही नसो दुर्भांगी । विश्वामाजी गणेशकृपेनें ॥२७४॥
या ग्रंथाची पारायण पद्धत । अन्यत्र दिली असे ग्रंथांत । ती वाचून भाविक लाभोत । आत्मशांति सुखस्वानंद ॥२७५॥
श्रीगजानन जय गजानन । ऐंसा जप अविरत करून । हा अनुवाद रामनवमी दिनीं समर्पण । करितों श्रीमयूरेश्वरासी ॥२७६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले नवमे खण्डे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे पुराणसमाप्तिवर्णनं नामैक चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।


॥ इति श्रीमुद्‍गलपुराणे नवमः खंडः समाप्तः ॥

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP