खंड ९ - अध्याय ११

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥  दक्ष म्हणे मुद्‍गलासी । पूर्वीं ब्रह्मविचार तूं मजसी । कथिला तो करितां नरासी । योग लाभे हितावह ॥१॥
क्रियेंनें जो शुद्धचित्त । नर ब्रह्मपरायण वर्तत । तो कोणत्या विधीनें पाहत । ब्रह्मरूप सर्वत्र ॥२॥
मुद्‍गल तेव्हां तयास सांगत । बाह्मांतर क्रिया करून सतत । तत्त्वविचार मार्गें पाहत । नरोत्तम ब्रह्म शाश्वत ॥३॥
प्रजापते तुज तें सांगेन । संक्षेपानें तत्त्वज्ञान । योगिजनांचें आदि साधन । योगदायक जें असे ॥४॥
पृथ्वी आप तेज वारा । आकाश यांचा एकत्र पसारा । पंचभूतमय देहधारा । प्रकृती ती पंचधा ॥५॥
क्रियारूपा ती असत । नानाभेदपरायण वर्तत । आपणांस विभागून खेळत । विविधांत ती रत होय ॥६॥
भूतांची एकभावाख्य असत । पाचांची ज्ञानरूपिणी ज्ञात । प्रकृति ती ह्रदयसंस्थ । जीवभावधरा परम ॥७॥
तिच्या साहाय्यें ज्ञात प्राप्ता । नाना विवेकानें युक्त । तिच्या आधारें हें जग चालत । एकरूप ती ख्यात असे ॥८॥
त्यांच्या संयोगें प्रजानाथा ख्यात । ब्रह्म ऐसें वर्तत । क्रिया ज्ञान स्वरूपाख्या वर्तंत । द्वंद्वहीन परात्पर ॥९॥
तेंच पंचधा जन्मत । ऐक तें योगदायक पुनीत । स्थूल सूक्ष्मरूप आत्मप्रतीत । बिंदुसंज्ञ पांचवें ॥१०॥
समष्टि व्यष्टि भावें कथित । ब्रह्म द्विविध हें ज्ञात । पृथक्त्वानें स्वयं प्रकाशत । पांचात पांच भेदानें ॥११॥
स्थूल जागृन्मय ब्रह्म । तेंच द्विविध परम । विश्वाख्य व्यष्टिरूपें मनोरम । वैश्वानर समष्टिग ॥१२॥
अंडयांत विविध रूप दिसत । प्राणी जागृद्‍भावयुक्त । ते सर्वं विश्वात्मक ख्यात । त्यांचा बोध सांगेन ॥१३॥
सुगामर्थप्रकाशक । बोध तो असे ज्ञापक । क्रियात्मक देहांत निःशंक । क्रियारूप ते होती ॥१४॥
ज्ञानात्मक देहांत । ज्ञानरूपधर ते संमत । उभयांच्या योगभावाने होत । विश्वाख्य ते सारे ॥१५॥
बाह्म देहाची जितुकीं वितस्ति । तेवढी ज्ञागदेहाची स्थिति । हृदयांत जाणावी निश्चिती । त्याचें वर्णन पुढें ऐका ॥१६॥
विराट जागृत वैश्वानर । व्यापकात्मक देह हा समग्र । विश्वभावांत व्यग्र । राहतसे निश्चयें ॥१७॥
त्याचाही द्विविध देह विलसत । क्रिया ज्ञानभेदें सतत । त्यांच्या योगें असे ख्यात । वैश्वानर तो तन्मय ॥१८॥
विश्व वैश्वानरांचा संयोग । ब्रह्म तेंच सुयोग । जागृद्‍भवधर पूर्णग । स्थूल भूत प्रकाशक ॥१९॥
ऐसें हें स्थूलाचें तत्त्व । सांगितलें तुज अभिनव । तेथ तत्त्वविधि योगत्व । ऐक योग समाधिप्रद ॥२०॥
जें जन्ममृत्युयुक्त । नानाभावपरायण वर्तत । ‘त्वं’ पदाख्य प्रजानाथ । जाण तें सर्व भावगत ॥२१॥
जन्ममृत्युविहीन । जें एकरूप महान । ‘त’ त्पदाख्य तें पावन । सर्वात्मधारक परम असे ॥२२॥
त्यांच्या योगें ‘तत्त्व’ होत । तेंच असिपद पर असत । द्वंद्वभावविहीन वर्तत । द्वंद्वरूपप्रकाशक ॥२३॥
त्वंपद तें क्रियेनें युक्त । ज्ञानाख्य तत्पद असत । त्यांच्यायोगें विश्व होत । तत्त्वरूप यांत संशय नसे ॥२४॥
ऐश्यापरी वैश्वानराख्य जाण । त्वं तत्त्वसंज्ञित शोभन । क्रियाज्ञानांच्या योगें सुजाण । त्यांचें प्रकाशकारक ॥२५॥
आतां अन्य पुरातन । ऐक तत्त्वरूप दक्षा पावन । विश्वाख्य सर्व जंतू असून । सर्व नानाभावात्मक ॥२६॥
जन्ममृत्युयुत ज्ञात । त्वंपदधारक समस्त । वैश्वानर त्वंपद युक्त । ऐकरूपें व्यापक असे ॥२७॥
त्या उभयतांच्या अभेदभावें ख्यात । ब्रह्मतत्त्व तें सर्वगत । जागृद्‍भावधर पूर्ण वर्तत । स्थूल भावपरायण ॥२८॥
ऐसें नाना विभागांत । जाणावें तत्त्वरूप सतत । सूक्ष्मादींत प्रजानाथ । ब्रह्मसौख्यप्रदायक ॥२९॥
आतां सूक्ष्माचें वर्णन । योगमार्गसिद्धयर्थं करीन । शुद्धचित्त प्रभावें तें ज्ञान । तन्मयत्व पावेल ॥३०॥
बाह्म तें स्थूल विशेषें असत । जागृद्‍ अन्नमय ख्यात । आंतर स्वप्न भावाख्य वर्तत । सूक्ष्म तें जाण मानदा ॥३१॥
प्राण दशविध ख्यात । सूक्ष्मरूपांतरी स्थित । म्हणून मनास सूक्ष्म म्हणत । प्राणांत तें व्यवस्थित असे ॥३२॥
विज्ञान म्हणून सूक्ष्म असत । देहद्वंद्वंज्ञ उत्तम ज्ञात । मनांतरी तें स्थित । पूर्णरूप त्याच्यांत अन्य कांहीं नसे ॥३३॥
त्रिविध कोश संशुक्त । स्वप्न सूक्ष्म पंचरूप कथित । ब्रह्म सर्वांतरी स्थित । द्वंद्वमायाप्रचालक ॥३४॥
क्रियारूप देह असत । सूक्ष्मभूत मय ज्ञात । सर्वांतरीं सम्यक्‍ स्थित । कल्पित भोगकारक ॥३५॥
ज्ञानदेह समाख्यात । सदा एकभावधारक तो वर्तत । पूर्ववत्‍ सर्व व्हावें ज्ञात । सूक्ष्ममायाप्रकाशक ॥३६॥
भिन्नभावधर समस्त । जंतू होती स्वप्नगत । तैजस ऐसे ते ख्यात । शास्त्रीं क्रियाज्ञान प्रकाशक ॥३७॥
विराट हिरण्य गर्भसंज्ञित । व्यापक स्वप्नभावांत । नाना जंतूंचा प्रचालक असत । त्यांच्या अभेदें स्वप्नात्म ब्रह्म ॥३८॥
सूक्ष्ममाया प्रकाशत्वें ख्यात । सूक्ष्मनामें शास्त्रंत । पूर्ववत्‍ तत्त्वभाव ज्ञात । व्हावा सूक्ष्मग पर ऐसा ॥३९॥
शुद्धचित्त प्रभावें होत । साक्षात्कार जयाप्रत । आतां सुषुप्सिसंज्ञित । ब्रह्म त्याचें वर्णन करितों ॥४०॥
बाह्म जागृन्मय दक्ष असत । शरीर तें असे ख्यात । आंतरस्वप्न ऐसें ज्ञात । त्यांच्या योगें समात्मक ॥४१॥
ब्राह्मांतर एकभावाख्य । बाह्मांतरविवर्जित एक । आनंदकोशग साम्यपरैक । गुणात्मक भूतांनीं रचिले ॥४२॥
जागृताचा त्याग करून । नर स्वप्नांत करी गमन । त्यांच्या संधिदेशीं आश्रय पावून । गाढनिद्रा लागतसे ॥४३॥
तैसेंचि स्वप्न त्यागित । स्वयं जात जागृतींत । त्यांच्या संधिदेशीं वसत । ती अवस्था सुषुप्तीची ॥४४॥
जेथ नर गाढ झोपेंत मग्न । तो दक्षा ज्ञानयुक्त होऊन । न ओळखे स्वकीय भिन्न । स्वप्नही तेथ पाहतसे ॥४५॥
निद्रेचा आश्रय घेत । ती सुषुप्ति परम ख्यात । जागृति स्वप्नबोधनिर्मित । ती अवस्था सुषुप्ति ॥४६॥
ती द्विविध मायायुक्त । प्राज्ञ ईश्वरभावें असत । भिन्न देहधरांची ज्ञात । प्रज्ञानामें ती सुषुप्ति ॥४७॥
विराटाचें रूप धरित । नित्य ईश्वराख्य वर्णित । ब्रह्मरूप त्यांच्या योगें होत । तत्त्वसंज्ञ पूर्वीं रूप ॥४८॥
आतां तुरीय रूप वर्णन । संक्षेपें तुज करितीं कथन । नादरूपधर तें असून । भूततन्मात्र अभेदें ॥४९॥
तीन अवस्था आश्रित । साक्षिवत्‍ असे तिन्हींत । त्याचें अनुभवमाहात्म्य तुजप्रत । दक्षा हितार्थ सांगतों ॥५०॥
मीं जागृतींत भोग भोगिले । स्वप्नांत विविध दृश्य मीं पाहिलें । झोपेंत मला कांहीं न समजलें । ऐसें जो ‘मी’ म्हणतसे ॥५१॥
जेव्हां विश्वस्थ जागत । तेव्हां उभयविवर्जित । मानव जेव्हां झोप घेत । तेव्हांत तो हीन दोघांनीं ॥५२॥
सुषुप्तींत जेव्हां वर्तत । तेव्हां दोघांनी विवर्जित । ऐशा प्रकारें तीन अवस्थायुक्त । वर्णिला असे शास्त्रांत ॥५३॥
त्याचें तत्त्व तुज सांगेन । वैश्व तैजस प्राज्ञग महान । त्वंपदाख्य आख्यान । नादरूपधर प्रभूचें ॥५४॥
त्रिविराटमय तो ख्यात । तत्पदाख्य शास्त्रांत । त्यांच्या अभेद भावें तत्त्वरूप ज्ञात । अस्मितामय तोचि असे ॥५५॥
अवस्थांचा समयोग नांदत । नाद तुरीयधारक असत । सदा एकभावसंयुक्त । सर्वत्र तो विराजतो ॥५६॥
न बाह्म न आंतरस्थ । न उभयात्मक वसत । अहं ऐशा भावें कोशात्म ख्यात । अस्मिताख्य परमेश्वर ॥५७॥
आतां यापुढें बिंदुतत्त्व सांगेन । सुखसौख्यद जें पावन । पांचवें ब्रह्मसंज्ञ शोभन । देहांच्या देहग परम ॥५८॥
चारांत पूर्ण संस्थित । चारांनी सदा तें वर्जित । ऐशा तत्त्वविचारें होत । शमदमरायण योगी ॥५९॥
संकल्पज काम त्यागून । योगमय होत प्रसन्न । सर्वंत्र ब्रह्मसंस्थ दर्शन । पाहील यांत न संशय असे ॥६०॥
तत्त्वरूपधर पूर्णं होत । तत्त्वविचारें शाश्वत । आतां अन्य तत्त्वमार्ग सांगत । सर्वद जे सदा असे ॥६१॥
बिंदु त्वंपदसंज्ञस्थ । सोऽहं तत्पदग ज्ञात । त्यांच्या योगें प्रजानाथ । बोधतत्त्वमय जाणावा ॥६२॥
मनोवाणीविहीन असत । योग्यासी तो दिसत अतीत । बोध त्वंपदरूप युक्त । विबोध तत्पदज्ञापक ॥६३॥
त्यांच्या योगें स्वसंवेद्य होत । तत्त्वख्यात वेदांत । असत्‍ त्वंपद रूपांत । तत्पदस्थ सत्‍ असे ॥६४॥
त्यांच्या योगें समब्रह्म ख्यात । तत्त्वयोगप्रद जगांत । सम त्वंपद संज्ञस्थ । अव्यक्त तप्तदस्थित ॥६५॥
त्यांच्या योगें स्वानंदाख्य वर्तत । तत्त्व कीर्तित शास्त्रांत । स्वानंद तत्पदाख्य वर्तत । अयोग तत्पदांत ॥६६॥
त्यांच्या योगें परतत्त्व विलसत । पूर्ण योगमय परमश्रेष्ठ । सिद्धि त्वंपदगा वर्तत । बुद्धि विराजे तत्पदीं ॥६७॥
त्यांच्या योगें गणनाथ । तत्त्वरूप वर्णिला असत । ऐसें नाना मतें ख्यात । वेदांत अर्थ विचक्षणं त्या ॥६८॥
तत्त्वपदाचा अर्थ व्यकत । दक्षा विविध प्रकारांत । अनंतभाव संयुक्त । त्वंपद जाण सर्वदा ॥६९॥
अकल्पित तत्पद । त्यांच्या योगें पर विशद । ऐसें हें सार रहस्थप्रद । योगदायक सांगितलें ॥७०॥
हें रहस्य जाणत । तो सर्वत्र योग पाहत । ज्ञानचक्षूनें सतत । दक्ष प्रजापते हा तत्त्वविचार ॥७१॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गलए महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन तत्त्वविचारयोगो नाम एकादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP