मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ३३ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ३३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३३ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती महिमा अद्भुत । शौनक भक्तीने ऐकत । एकदंत चरित महिमान पुनीत । वर्णिंलें मागच्या अध्यायीं ॥१॥सांप्रत महोदर चरिताचें श्रवण । केल्यानें जे लाभे शोभन । त्या पुण्यफळाचें कथन । सूत करिती शौनकासी ॥२॥माध्यंदिन नाम महाभाग मुनि स्वधर्मरत । सर्वार्थकोविद तपयुक्त । तो शांतिप्राप्तर्थ जात । व्यासांच्याकडे एकदा ॥३॥त्या सर्वज्ञ मुनी स नमित । नंतर विनयपुर्णं विचारित । व्यासमुने या जगांत । शांत्यर्थ काय नरें करावें ॥४॥जो उपाय करिता होत । ब्रह्मीभूत जन भक्त । उपाय ऐसा मजप्रत । सांगावा कृपा करोनी ॥५॥संयोग अयोगें ब्रह्मभूत । व्यास सांगती नर या जगांत । त्यायोगें शांति लाभत । ती शांति सर्वसंमत असे ॥६॥तोच गणथाथ वर्तत । महोदरनामें ख्यात । त्यास भज तूं विधानयुक्त । तरी शांतिलाभ तुजप्रत ॥७॥संयोग अयोग तो गणेश असत । त्यांच्यायोगें जे जन्मत । ते भोग उदरीं सामावित । म्हणोनि हा गणेश महोदर ॥८॥ब्रह्मांत ब्रह्मसौख्य ख्यात । योगांत जें योगोद्भव वर्तत । तो भोग जेथ स्थित । तें हें जठर गणेशाचें ॥९॥जगतांच्या तैसें ब्रह्ययांच्या जठरांत । असे हा गणेश स्थित । भोगभोक्ता हाच सतत । त्यास न कोणी सामावूं शके ॥१०॥म्हणून वैदांत हा ख्यात । महोदर नामें विश्चित । एक हा त्यास तूं भजत । जरी भक्तिभावपूर्ण मतानें ॥११॥तरीच शांति तुज लाभेल । तुझें दुःख दूर होईल । ऐसें सांगून दचन अमल । महायोगी व्यास थांबल ॥१२॥योगींद्रसत्तमास त्या नमून । माध्यंदिन करी स्तवन । त्याची आज्ञा घेऊन । आश्रमांत आपुल्या तो परतला ॥१३॥महोदर चरित मुद्गलपुराणांत । तें तो विशेषें भजत । सेव्य योगपर होऊन ध्यात । महोदरासी नित्यनेमें ॥१४॥त्यायोगें गणाधीश प्रसन्न । संतुष्ट होऊन देत वरदान । सुशांतिप्रद योग महान । देई प्रभू तयाला ॥१५॥त्यायोगें शांतियुक्त । नित्य गणनायकास भजत । महोदर चरित्र वाचित । नित्यनेमें आदरें ॥१६॥महायोगी तो स्थापित । विघ्नपाची मूर्ति भावयुक्त । गणराजाचें पूजन सतत । करून पुराण वाचित दक्षा ॥१७॥महोदराचें चरित्र वाचित । त्या गणेशाच्या पुढयांत । तेथ बेडूक एक येत । दैवयोगें पुढयांत ॥१८॥तो तें पुराण ऐकत । त्यास अर्थ कांहीं न समजत । परी गणेस निर्माल्यांत । भयभीत बसून राहिला ॥१९॥ऐसा बहुत काळ जात । तेव्हां तो बेडूक मृत्यु पावत । त्यास नेण्या येत । गणेशदूत आनंदानें ॥२०॥त्यास घेऊन जात स्वानंदलोकांत । करितो मंडूला ब्रह्मभूत । एकदां ऐकतां तें फळ लाभत । महोदर चरित धन्य हें ॥२१॥ऐसें पाठाचें महिमान । परम अद्भुत महान । ऐसें नाना जन उद्धरून । गेले या महोदरचरित्र योगे ॥२२॥तो योगें भोग भोगून । अंतीं ब्रह्ममय अमृत होऊन । करिती स्वानंदलोकीं गमन । महोदर चरित खंड प्रभावें ॥२३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे दक्षमुद्गलसंवादे महोदरचरितमाहात्म्यवर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP