मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ३७ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ३७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३७ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः । विघ्नराजखंडाचें करितां श्रवण । जें फल लाभलें महान । त्याची कथा पुण्यपावन । सूत सांगती शौनकासी ॥१॥बिभीषणास लंकेचें राज्य प्राप्त होत । तो रामास पूजित । भक्तियुक्त त्यास स्तवित । तेथ प्रथम पूजन गणनाथाचें ॥२॥करावें लागलें ऐसा विचार । त्यास जाहला सुखकर । तो परी मनांत गणेशा ध्यात । सर्वपूज्य जो ब्रह्मनायक ॥३॥त्याचें उच्छिष्ट अन्य देव भक्षित । याचें तयास नवल वाटल । एकदां योगीश नारद तेथ येत । पूजीत त्यांस प्रणाम करून ॥४॥ह्रदयस्थ प्रश्न त्यास विचारित । गणेशउच्छिष्ट भोक्ते अन्य देव कसे होत । अग्रपूज्य प्रभाव यास वेदसंमत । कैसा प्राप्त जाहला ॥५॥तेव्हां नारद त्यास म्हणत । ब्रह्माकार शिवादिदेव असत । नानायोगप्रधारक ज्ञात । ब्रह्मे अन्नमुख पावक ॥६॥ऐसें वेद सांगती सुखेक । त्यांचा स्वामी गणेश मुख्य । ब्रह्मांच्या पालनभावें जागरूक । ब्रह्मणस्पति संज्ञा त्यास ॥७॥त्यांसी योगदानार्थ । देहधारी गजानन होत । गजाननादि चिन्हांनीं युक्त । विघ्नें सत्तात्मक ज्ञात ॥८॥त्यांचा स्वामी तो असत । विघ्नांनी जो खेळत । विघ्नें उपस्थित करून सतत । क्रीडा करी योगरूपधर ॥९॥म्हणून विघ्नराज शोभन । नांव त्याचें पावन । ब्रह्में विघ्नयुक्त असून । सत्यसंकल्पहीन तीं ॥१०॥पराधीन स्वभाव असत । त्यासी जाणतो सतत । स्वकीय म्हणून सुप्रीत । जन्म तो गणेश अवतारें ॥११॥त्या ब्रह्मांस आदरें देत । आपुला मुख्य योग शाश्वत । तेव्हां तीं विघ्नहीनत होत । वीर्ययुक्त तैसेची ॥१२॥म्हणून हा गणेश्वर पूर्ण । सर्वांच्या पूर्णत्वें युक्त शोभन । वेदांत सर्वादित्व लाभून । ज्येष्ठराजाच्या प्रभावें ॥१३॥ऐश्या त्या विघ्नेश्वरा सतत । शांतिदात्यास भज भक्तियुक्त । तोच विघ्नेश संशयातीत । कलांशानें विराजतो ॥१४॥गणेशभजनानें व्यभिचार । भक्तिमार्गात कैसा होणार । समूहांचा पति हा थोर । विष्णु मुख्यक देवांचा ॥१५॥ऐसें बोलून महायोगी स्मरण । करी गणेशाचें भजन । महाबुद्धि संत तो गात गायन । गेला स्वच्छंदें गणेशरत ॥१६॥विघ्नराजाचा खंड वाचित । नित्य नेमें मुद्गल पुराणस्थ । त्यायोगें शांतियुक्त । जाहला तो बिभीषण ॥१७॥गणेशास नित्य भजत । रामाशी ऐक्य त्याचें जाणत । एकदां तो राक्षसाधीश जात । सेतुबंधनाच्या जागीं ॥१८॥तेथ महोदरास पूजून । विघ्नराज खंडाचें करी वाचन । एक बेडकीण जलांत बसून । खंड उत्तम तो ऐके ॥१९॥त्यायोगें सुखयुक्त होत । तेवढयांत एक सर्प तिज पकडित । तिजला गिळून टाकित । मृत्यु ऐसा तिचा झाला ॥२०॥मृत्यू नंतर तिजला नेत । गणेशदूत स्वानंदपुरींत । त्या बेडकीस ब्रह्मभूत । करिती मोठया आनंदानें ॥२१॥ऐसें नकळात घडतांही श्रवन । विघ्नेश चरिताचें पावन । नाना जन फल लाभती प्रसन्न । ऐकून हा खंड सदा ॥२२॥भोग ऐहित भोगून । अन्तीं स्वानंदलोकीं गमन । करिती त्यांचा वृत्तान्त पूर्ण । वर्णन करण्या अशक्य असे ॥२३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशस्त्रे दक्षमुद्गलसंवादे विघ्नराजखंडश्रवणपठनमाहात्म्यवर्णानं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP