खंड ९ - अध्याय २०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल पुराण पूर्ण ऐकून । कोणा कोणा लाभली सिद्धि संपूर्ण त्यांचें चरित्र अति पावन । सांग सूता संक्षेपें ॥१॥
सूत म्हणे सर्वादींत । दक्ष हें पुराण ऐकत । मुद्‍गल मुखांतून भावयुत । तो दोषविहीन शांत झाला ॥२॥
तदनंतर तो दक्ष करित । नियमें पठण याचें सतत । अवकाशानुसार वाचित । नित्य आदरें हें पुराण ॥३॥
अमुक अध्यायांचें वाचन । ऐसा नियम न ठेवून । भाद्रपद शुक्ल प्रतिपदेस पावन । उपोषण त्यानें केलें ॥४॥
त्या दिवशीं पारायणाची सुरुवात । चतुर्थीस तें करी समाप्त । तैसेंचि माघमासांत । ज्येष्ठमासीं पारायण करी ॥५॥
वार्षिक पारायणही करित । देवविप्रादींच्या सान्निधयांत । ऐशा क्रमानें जो भक्तियुक्त । गजानन परायण ॥६॥
मौद्‍गलास तो सेवित । अद्यापि गाणपत्य स्वभाववंत । त्यानेंच बोध केला जगांत । वसिष्ठादीस महामुने ॥७॥
प्रजापती मौद्‍गल नित्य वाचिती । ते अन्य विप्रास बोध देती । योगमार्गपरायण करिती । नानाभावें समायुक्त ॥८॥
ऐसें परंपराप्राप्त । सर्व प्राण्यांत हें झालें ज्ञात । ते नानाभावससमायुक्त । सेविती मौद्‍गल पुराण ॥९॥
दक्षयज्ञांत ज उपस्थित । ते शिव विष्णु आदि देव ऐकत । मौद्‍गल पुरान समस्त । योगद तैसें सर्वंसिद्धिद ॥१०॥
यज्ञ समाप्त होतां जाती । ते आपापल्या गृहाप्रती । तदनंतर शिव योगीश प्रार्थिती । मुद्‍गल मुनीस आदरें ॥११॥
मौद्‍गल पुराण करण्या श्रवण । इच्छा माझी असे पावन । तरी मम मंदिरीं येऊन । वाचन त्याचें करावें ॥१२॥
तेव्हां मुद्‍गल शिवमंदिरांत । जाऊन पारायण वाचित । तें ऐकण्या विष्णुमुख्य देव जात । पर्वतेश्वर कैलासावरी ॥१३॥
शिवासहित सर्व ब्रह्मादि ऐकत । संपूर्ण मुद्‍ग्लपुराण भावयुक्त । मुद्‍गल ओगिसागर वाचित । वार्षिक पारायण धन्य ते ॥१४॥
वार्षिक पारायण पूर्ण होत । तें श्रवण करून मुद्‍गल पुजित । त्यास निरोप देऊन मानित । कृतकृत्य स्त्रईसहित सगळे ॥१५॥
गणेश्वराचा जो अंश असत । तो शिवपुत्र तेथ स्थित । तोही गणपप्रिय जपत । मौद्‍गल पुराण निरंतर ॥१६॥
मूर्तिस्थ गणनाथाचें पूजन । महायश करी नित्यनेम । त्या मूर्तींच्या सन्निध वाचन । करी सदा या पुरानाचें ॥१७॥
विश्वनाथ शिव साक्षात । काशीपुरींत ढुंढीच्या पुढयांत । हें पुराण नियमानें वाचित । एवढें महत्त्व याचें असे ॥१८॥
माघ शुक्ल प्रतिपदेस प्रारंभून । उपोषणादि आचरून । चतुर्थीस समाप्त पारायण । केलें त्यानें त्या वेळीं ॥१९॥
तैसेंच मुद्‍गल शुकासहित । मयूरेशाच्या सान्निध्यांत । पारायण मोदें करित । ऐसे माहात्म्य या पुराणाचें ॥२०॥
तारक तो तारकाकृति जपत । नित्य गाणपत्य सान्निध्यांत । महाभक्त तो तारक होत । पुराणाच्या या पठणानें ॥२१॥
ज्येष्ठ मासांत स्वयं करित । शेषनाग पारायन भावयुक्त । मूषकस्थ गणेश सान्निध्यांत । नागासुरांच्यासह तेव्हां ॥२२॥
नित्यनेमें हें पुराण वाचित । सर्वभावसमन्वित । भक्तियुक्त तो महाभक्त । सर्वांचें हितकारक तेव्हां ॥२३॥
तैसाचि दत्त स्वयं साक्षात । ज्ञानेंशा तोषवाया करित । ज्येष्ठ मासांत पारायण भक्तियुक्त । या मुद्‍गल पुराणाचें ॥२४॥
तो नित्य जप याचा करित । नानायोगिसमायुक्त । शंकराच्या सान्निध्यांत । ऐसें थोर हे मुद्‍गल पुराण ॥२५॥
विष्णु भानु विधि शक्ति । इंद्र अग्नि प्रमुख देव सेवितो । मौद्‍गल हें परमप्रीती । आपापल्या निवासांत ॥२६॥
कश्यपाद्य मुनींद्र । सिद्धमुख्यादि योगींद्र । कपिलादि सुखप्रद । भक्तियुक्त सेविती हें पुराण ॥२७॥
सनकादिक संवर्त । योगी नऊ हे सतत । जपपर पूर्ण सेवित । मौद‍गल पुराण मोदानें ॥२८॥
नारद सदा गायन करित । त्रिभुवनांत संचार करित । विप्रा ह्या मौद्‍गलाचें नियमित । पठण करी सर्व सिद्धिद ॥२९॥
ऐसें नानाविध जन । सर्व मनु महर्षिगण । सेविती हें सिद्धिप्रद पावन । मुद्‍गल पुराण निरंतर ॥३०॥
व्यास महाभाग स्वयं वाचित । नित्य हें पुराण आदरयुक्त । गाणेश मौद्‍गल उभय सतत । पारायणीं पुराणें त्याच्या ॥३१॥
ऐसें मौद्‍गल पुराणश्रवण महिमान । वर्णनातीत दक्षा जाण । भाग्यवंत जे विशेषज्ञ जे विशेषज्ञ । ते सेविती मौद्‍गल पुराण सर्वदा ॥३२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवांदे पुराणप्रशस्तिमहात्म्यवर्णनं नाम विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP